वैशिष्टे:-
• पब्लिक इश्यू २९ सप्टेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होऊन ४ ऑक्टोबर रोजी बंद होणार
• अर्जासाठी किमान लॉट साइज १२०० समभाग आहे. किमान आयपीओ अर्जाची रक्कम १.२३ लाख रूपये
• या इश्यूमधून उभारण्यात आलेल्या निधीचा वापर विस्तार योजनांसाठी केला जाईल. त्यात कारखाना आणि मशिनरीचा ताबा, चालू भांडवलाच्या गरजा पूर्ण करणे, व्यावसायिक कार्यांसाठी सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टे इत्यादींचा समावेश आहे
• कंपनीकडे मोठ्या प्रमाणावरील उत्पादने देणारे ई-कॉमर्स पोर्टल www.cotandcandy.com आहे
• कंपनीने मुलांच्या मनोरंजनाच्या उद्योगातील काही लोकप्रिय आणि मोठ्या ब्रँड्ससाठी उत्पादन आणि वितरण परवाने घेतले आहेत
• आर्थिक वर्ष २१-२२ साठी कंपनीने १०.५४ कोटी रूपयांचे महसूल नोंदवले असून निव्वळ नफा ५४ लाख रूपये आहे
• इंटरएक्टिव्ह फायनान्शियल सर्व्हिसेस लि. ही इश्यूसाठी लीड मॅनेजर आहे
मुंबई, सप्टेंबर २०२२: पेस इ-कॉमर्स व्हेंचर्स लि. (Pace E-Commerce Ventures Ltd) – मुलांचे फर्निचर, बेडिंग, हाऊसवेअर्स आणि अत्यावश्यक गोष्टींच्या वन स्टॉप सोल्यूशनचा पब्लिक इश्यू २९ सप्टेंबर रोजी जनतेसाठी खुला होणार आहे. कंपनीला बीएसई एसएमई एक्स्चेंजच्या व्यासपीठावर आपला पब्लिक इश्यू आणण्यासाठी मान्यता मिळाली आहे. कंपनी प्रारंभीच्या पब्लिक ऑफरिंगद्वारे ६६.५३ कोटी रूपये उभारण्यासाठी प्रयत्नशील असून त्याद्वारे आपल्या विस्तार योजनांना वित्तपुरवठा करेल. त्यात कारखाना आणि मशीनखरेदी, चालू भांडवलाच्या गरजा पूर्ण करणे, कंपनीच्या व्यावसायिक कार्यांसाठी सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टे यांच्यासाठी भांडवली खर्चाचा समावेश आहे. या इश्यूसाठी इंटरएक्टिव्ह फायनान्शियल सर्व्हिसेस लि. हा लीड मॅनेजर आहे. पब्लिक इश्यू ४ ऑक्टोबर रोजी बंद होईल.
प्रारंभीच्या पब्लिक ऑफरिंगमध्ये ४० लाख नवीन समभाग जारी केले जातील आणि प्रत्येकी १० रूपये दर्शनी मूल्याचे प्रति समभाग १०३ रूपये किंमतीत (प्रति समभाग ९३ रूपयांच्या अधिमूल्यासह) २४.५९ लाख समभाग विकण्याची ऑफर दिली जाईल, ज्यातून ६६.५३ कोटी रूपये उभारले जातील. अर्जासाठी किमान लॉट आकारमान १२०० समभाग आहे, म्हणजे प्रति अर्ज १.२३ लाख रूपये होतील. आयपीओसाठी रिटेल वितरण ५० टक्के आहे. जारी करण्यात आल्यानंतर कंपनीतील प्रवर्तक कंपनीचे समभाग सार्वजनिक इश्यू जारी करण्यापूर्वी असलेल्या ९१.१२ टक्क्यांवरून ६५ टक्क्यांपर्यंत येतील.
सार्वजनिक इश्यूमधून आलेल्या रकमांचा वापर कंपनीच्या विस्तार योजनांना वित्तपुरवठा करण्यासाठी केला जाईल. कारखाना आणि उपकरणांच्या खरेदीसाठी ९.७३ कोटी रूपये वापरले जातील, २०.८६ कोटी रूपये दीर्घकालीन चालू भांडवलाच्या गरजांसाठी आणि १० कोटी रूपये सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापरले जातील.
या विकासाबाबत बोलताना श्री. शैवल गांधी, व्यवस्थापकीय संचालक आणि सीएफओ, पेस ई-कॉमर्स व्हेंचर्स लि. म्हणाले की, “पुणे, भारत येथे २०१५ साली स्थापना झाल्यापासून कॉट अँड कँडी खूप मोठा पल्ला गाठून पुढे आली आहे. आम्ही सर्वप्रथम सुरूवात केली तेव्हा आमच्या दर्जा, आराम, सुरक्षितता आणि शैली यांच्यातील ऑफर्समुळे आम्ही जगातल्या कानाकोपऱ्यात गेलो आणि एक खास श्रेणी तयार केली. त्यामुळे कॉट अँड कँडी फक्त अशी उत्पादने देत नाही जी सुरक्षित आणि आरामदायी आहेत परंतु ती स्टायलिश, मजेशीर आणि तुमच्या मुलांच्या गरजांनुरूप बनवलेली आहेत. आम्ही आता संपूर्ण देशातील ग्राहकांना सेवा देतो आणि आमची आवड आमच्या स्वतःच्या ऑनलाइन स्टोअरच्या खरेदीपर्यंत वाढली आहे आणि तुम्हाला एक सुंदर अनुभव देऊ शकतो याचा मला आनंद आहे. आम्हाला आशा आहे की, प्रस्तावित पब्लिक इश्यूनंतर आम्हाला अशा प्रकारे आमचे वाढीचे धोरण आखता येईल की त्यातून सर्व भागधारकांना उत्तम मूल्य मिळेल आणि सातत्याने दर्जेदार उत्पादनेही देता येतील.”
पेस ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेडची स्थापना २०१५ मध्ये झाली असून ही कंपनी मुलांचे फर्निचर, हाऊसवेअर्स आणि अत्यावश्यक गोष्टी पुरवते. या कंपनीच्या उत्पादनांमध्ये बेड्स आणि क्रिब्स, सिटिंग आणि लाऊंजिंग, साठवणूक आणि ऑर्गनायझर्स, प्लेरूम फर्निचर, डबे आणि बास्केट्स, डेकोर आणि अॅक्सेसरीज, मुलांचे बेडिंग, बाळांचे बेडिंग, बाळ आणि मुलांच्या अत्यावश्यक गोष्टी, डायनिंगसाठी अत्यावश्यक गोष्टी आणि होमवेअर, स्पोर्टस् राइड ऑन्स आणि आऊटडोअर, कला आणि क्राफ्ट, गेम्स आणि पझल्स, स्कूटर्स आणि राइड ऑन्स, डॉल्स एक्शन फिगर्स आणि सॉफ्ट टॉइज अशी वेगवेगळी उत्पादने ठेवते. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय पुणे, महाराष्ट्र येथे तर कॉर्पोरेट कार्यालय अहमदाबाद, गुजरात येथे आहे.
कंपनीचे इ कॉमर्स पोर्टल www.cotandcandy.com असून त्यातून विविध वर्गांमधील वेगवेगळी उत्पादने दिली जातात. कंपनीने ऑन डिमांड प्रिंटिंग आणि उत्पादनांचे उत्पादन बी२सी आणि बी२बी ग्राहकांसाठी सुरू केले आहे. पेस ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेडने किड्स एंटरटेनमेंट उद्योगातील अत्यंत लोकप्रिय व मोठ्या ब्रँड्सची उत्पादन आणि वितरण परवाने घेतले आहेत.
या आयपीओनंतर कंपनीचे पेड अप समभाग भांडवल १८.५३ कोटी रूपये आहे ते २२.५३ कोटी रूपयांवर जाईल. या इश्यूमध्ये कंपनीच्या आयपीओनंतरच्या २८.६७ टक्के पेड अप समभाग भांडवलाचा समावेश आहे. आर्थिक वर्ष २१-२२ साठी कंपनीने १०.५४ कोटी रूपयांचा महसूल नोंदवला आहे आणि ५४ लाख रूपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. ३१ मार्च २०२२ रोजीनुसार कंपनीचे निव्वळ मूल्य २६.४९ कोटी रूपये, आरक्षित आणि अतिरिक्त रूपये ८.१७ कोटी रूपये होते आणि एकूण मालमत्ता ३२.४२ कोटी रूपये होती.