जागतिक हृदय दिनानिमित्त, फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल, वाशी यांनी हॉस्पिटलमध्ये कार्डिओपल्मोनरी रिसीटेशन (CPR) प्रशिक्षण कार्यक्रमासोबतच मोफत कार्डियाक कन्सल्टेशन आणि ऑटो रिक्षा चालकांना ईसीजी देखील आयोजित केला होता. या मोहिमेदरम्यान गुरुवारी झालेल्या प्रशिक्षणात महापे, घणसोली, वाशी रिक्षा असोसिएशनमधील 100 हून अधिक ऑटोचालक सहभागी झाले होते. दिवसभराच्या कार्यक्रमात या ऑटो चालकांनी सीपीआर तंत्राची चार सत्रे घेतली. फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने रस्ते अपघाताच्या वेळी प्राथमिक उपचाराबाबतही या गटांना मार्गदर्शन केले – वाशी येथील इमर्जन्सी मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. प्रीतम गायकवाड, कन्सल्टंट कार्डिओलॉजी डॉ. प्रशांत पवार, तसेच हॉस्पिटलच्या नर्सिंग स्टाफ यामिनी पाटील, सोनम जुईकर आणि निशिकांत चकोले. .