Mumbai 29th September 2022: जगभरांत हृदयाशी संबंधित समस्या वेगाने वाढत आहेत, भारतही त्याला अपवाद नाही. अगदी दोन दशके आधी हृदयविकाराचा झटका हा साधारणपणे वयस्कांमध्ये दिसून येत असे. वयाच्या चाळीशी पूर्वी हृदय विकाराचा झटका येणे ही एक दुर्मिळ घटना असे. पण आता परिस्थितीत वेगाने बदल झाला आहे आणि चाळीशी पूर्वी हृदयविकार होण्यार्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. भारतातील वयस्कांमध्ये हृदयरोगा विषयी हा सुध्दा आणखी एक घटक आहे. पण दुसरा घटक म्हणजे भारतातील जन्मजात होणार्या हृदयाच्या समस्यांचे काय ? जन्मजात हृदयाशी संबंधित समस्या सुध्दा भारतात सर्वसाधारणपणे होतांना दिसतात. जन्मजात हृदयाची समस्या असण्याच्या संपूर्ण भारतातील केसेसची संख्या ही २ लाखांहून अधिक असून यांतील जवळजवळ ४० हजार मुले ही अशा समस्या घेऊन जन्माला येतात त्यांच्यावर अगदी जन्माच्या पहिल्या वर्षातच योग्य शस्त्रक्रिया करावी लागते.
स्थापना झाल्यापासून मागील ५ वर्षांच्या कालावधीत नारायणा हेल्थ द्वारा व्यवसापन करण्यात येत असलेल्या हाजी अली येथील एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल कडून मुंबईतील ७५०० हून अधिक हृदयाशी संबंधित समस्या असलेल्या मुलांवर त्यांच्या पेडिॲट्रिक कार्डिॲक ओपीडी मध्ये उपचार करण्यात आले असून त्याच बरोबर महाराष्ट्र आणि आसपासच्या राज्यात आयोजित करण्यात आलेल्या हृदयरोग तपासणी कँम्प्स मध्ये पेडिॲट्रिक कार्डिओलॉजिस्ट्स कडून १० हजारांहून अधिक मुलांची तपासणी करण्यात आली, त्याच बरोबर त्यांच्यासह ३४००मुलांवर योग्य उपचार आणि शस्त्रक्रियाही करण्यात आल्या आहेत. ८०० ग्रॅम वजना पेक्षा कमी किंवा वेळे आधी जन्म घेतलेल्या अगदी १ दिवसाच्या बाळावर शस्त्रक्रिया किंवा ट्रान्सकॅथेटर उपचार केल्याची अनेक उदाहरणे आहेत. या क्षमते मध्ये मुलांना त्यांच्या हृदयाशी संबंधित समस्यांवर उपचार केले जातात, यामध्ये केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील अन्य राज्यांसह परदेशातील जसे मध्ये पूर्वेतील देश आणि येमेन, इराक, नायजेरिया, इथिओपिया, तांझानिया, केनिया आणि युगांडा सारख्या देशातील मुलांवरही उपचार केले गेले आहेत.
जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने नारायणा हेल्थ कडून व्यवस्थापन करण्यात येत असलेल्या एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल मधील पेडिएट्रिक कार्डिओलॉजिस्ट आणि पेडिएट्रिक कार्डिॲक सर्जन्स यांनी एकत्र येऊन चर्चासत्राचे आयोजन केले होते, यावेही मुलांमधील हृदयरोगा पासून बचाव करण्यासाठी महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त अशा समस्यांवर तसेच लवकर निदान आणि उपचारांचे महत्त्व, उपचारांचे उपलब्ध पर्याय आणि जन्मजात हृदयरोगांविषयीचे दीर्घकालीन उपाय या विषयांवर चर्चा केली. सर्व डॉक्टरांनी यावेळी पालक, साधारण जनता आणि पेडिएट्रिशियन्स यांच्या मध्ये जागरुकता निर्माण करण्यावर भर दिला. जेणेकरुन लगेच उपचार करुन आणि दीर्घकालीन उपायांमुळे या सीएचडी मुळे त्रस्त मुलांना त्यांचे सामान्य जीवन जगणे शक्य होईल. यावेळी त्यांनी आरोग्यपूर्ण आणि चपळ जीवनशैली, चांगल्या खाद्यसवयी या लहान मुलांमध्ये कशा रुजवाव्यात यावर भर दिला, ज्यामुळे भविष्यातील हृदयरोग कमी होतील ही मुले मोठी होऊन आरोग्यपूर्ण जीवनशैली जगू शकतील.
नारायणा हेल्थ चे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. देवी प्रसाद शेट्टी यांनी यशस्वी निष्कर्शांसाठी लवकर निदान आणि उपचारांवर जोर दिला, कारण जन्मजात हृदयाशी संबंधित समस्यांवर उशीर केल्यास ते अधिक जटील होऊ शकतात.