नवी दिल्लीः JioPhone 5G च्या यूजर्संना खूपच उत्सूकता आहे. कंपनीकडून नवीन फोनच्या लाँचिंगची तारीख अजून कन्फर्म करण्यात आली नाही. परंतु, या फोनची फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स ऑनलाइन लीक होणे सुरू झाले आहेत. Kuba Wojciechowski (@Za_Raczke) आणि ९१ मोबाइल्सच्या लीकनुसार, जिओ फोन ५जीचे कोडनेम गंगा आणि मॉडल नंबर LS1654QB5 आहे. जिओचा अपकमिंग फोन ४जीबी रॅम सोबत येईल. यात स्नॅपड्रॅगन ४८० चिपसेट दिली जाईल. कंपनी या फोनला LYF सोबत पार्टनरशीपमध्ये लाँच करू शकते. याची मार्केटिंग Jio Phone True 5G मॉनिकर सोबत होईल.
मिळतील हे फीचर आणि स्पेसिफिकेशन
लीक झालेल्या माहितीनुसार, कंपनी JioPhone 5G मध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस एलसीडी पॅनल ऑफर करते. हा डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये सॅमसंगचे ४जीबी LPDDR4X रॅम आणि ३२ जीबीचे इंटरनल स्टोरेज दिले जावू शकते. प्रोसेसर म्हणून यात कंपनी स्नॅपड्रॅगन ४८० चिपसेट देवू शकते. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये तुम्हाला एलईडी फ्लॅश सोबत ड्युअल रियर कॅमेरा सेटअप पाहायला मिळू शकतो.
या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सरचा समावेश आहे. सेल्फीसाठी यात ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. हा फोन अँड्रॉयड 12 आउट ऑफ द बॉक्स वर काम करतो. सोबत यात कंपनी जिओ अॅप्स सोबत प्री लोडेड गुगल मोबाइल सर्विस सुद्धा देवू शकते. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी दिली जावू शकते. ही बॅटरी १८ वॉट ची फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनची किंमत ८ ते १२ हजार रुपये दरम्यान असू शकते.