मुंबई : बंडखोर शिंदे सरकारमधील बंडखोर मंत्री संजय बांगर यांच्या गाडी वरील कथित हल्ल्याप्रकरणी आता शिंदे सरकार कठोर कारवाई करण्याच्या मुड मध्ये असून ठाकरे गटातील शिवसेना कार्यकर्त्यांवर जबर जरब बसविण्यासाठी कठोरात कठोर कारवाई करण्याचे दिल्ली वरून आदेश दिल्याचे समजते.
अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालाय. बांगर यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी 15 ते 20 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यात आलाय. हल्ला केलेल्या शिवसैनिकांचा पोलीस सोध घेत आहेत.
संतोष बांगर यांच्या वाहनावर अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीमध्ये शिवसौनिकांकडून हल्ला करण्यात आला होता . संतोष बांगर यांच्या गाडीच्या काचावर फोडण्यात आल्या. पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी दंगा विरोधी कायदा आणि सुमोटो कारवाई करत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक वानखडे यांनी दिली आहे.