ठाणे दि.२३ (प्रतिनिधी) : चाइल्ड हेल्प फाउंडेशन आणि फिलान्ट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील सेगतपाडा आणि वनगर्ज गावासाठी ‘नॅशनल गिव्ह समथिंग अवे डे’ निमित्त देणगी मोहिमिचे आयोजन केले होते. या मोहिमेत चाइल्ड हेल्प फाऊंडेशनचे ३० स्वयंसेवक सहभागी झाले होते ज्यांनी पालघर जिल्ह्यातील सेगतपाडा आणि वनगर्ज गावातील १०२ लोकांना कपडे, रेनकोट, छत्र्या, पादत्राणे, स्टेशनरी आणि इतर अनेक वस्तू दान करून मदत केली.
‘नॅशनल गिव्ह समथिंग अवे डे’ निमित्त डोनेशन ड्राइव्ह उपक्रमाविषयी बोलताना, चाइल्ड हेल्प फाउंडेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी शाजी वर्गीस म्हणाले की, “समुदाय म्हणून देणे आणि मदत करण्याचे महत्त्व ही मानवजातीची सर्वात मोठी ताकद आहे. गरजूंना मदत करणे आणि समाजाची उन्नती करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. हीच जबाबदारीची भावना देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात रुजवायची आहे ती म्हणजे तुमच्या जुन्या वस्तू दान करा, ज्या तुमच्यासाठी जुन्या असतील आणि उपयोगाच्याही नसतील, पण दान दिल्यास गरजूंना मोठी मदत होऊ शकते. ”
दरवर्षी ‘नॅशनल गिव्ह समथिंग अवे डे’ जगभरात साजरा केला जातो. तुमची स्वतःची एखादी वस्तू दान करणे हा यामागचा उद्देश आहे ज्याचा उपयोग गरजू लोकांना करता येईल.