कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची अखेर जीवन-मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून त्यांचे आज निधन झाले. बुधवारी सकाळी 10 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 58 वर्षांचे होते. 10 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एका हॉटेलमध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता, त्यानंतर त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते कोमात होते. बुधवारी पुन्हा त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
मागील 42 दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वृत्त येत होते. मात्र अखेर त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळगावी कानपूरमध्ये नव्हे तर दिल्लीतच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
या दु:खद घटनेदरम्यान त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी आधीच यमराज आणि मृत्यूचा उल्लेख केला आहे. राजू यांचा हा व्हिडिओ खूप जुना आहे. या व्हिडिओमध्ये ते म्हणत आहे की, ”नमस्कार, आयुष्यात असे काम करा की यमराज जरी तुम्हाला न्यायला आला तरी त्याला सांगा तू म्हशीवर बस. आपण चालत आहात, बरे वाटत नाही. तू चांगला माणूस आहेस, थोर माणूस आहेस, म्हणून तुम्ही म्हशीवर बसा.’ त्यांचा हा व्हिडिओ कॉमेडी अंदाजात केलेला जरी असला तरी लोक आता हा व्हिडिओ पाहून त्यांची आठवण काढत आहेत.
2 महत्त्वाच्या घडामोडी
1. राजू श्रीवास्तव कानपूरचे रहिवासी होते. मात्र 22 सप्टेंबर (गुरुवारी) रोजी दिल्लीत सकाळी 9.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
2. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथसह अनेक दिग्गजांनी व्यक्त केला शोक.. मोदी म्हणाले- राजू यांनी आपले जीवन विनोदाने उजळून टाकले.
राजू यांचे हीरो बनण्याचे स्वप्न होते आणि ते पूर्ण करण्यासाठी ते 1982 मध्ये मुंबईत आले होते.. त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी ऑटोरिक्षा चालवली. एकेदिवशी त्यांच्या ऑटोत स्वार असलेल्या व्यक्तीने त्यांना पहिल्या स्टेज परफॉर्मन्सची संधी दिली. यातून त्यांची 50 रुपये कमाई झाली होती.
राजू बहुतेक वेळा अमिताभ यांची नक्कल करायचे आणि त्यांच्यासारखे दिसायचा प्रयत्न करायचे. नंतर हीच त्यांची ओळख बनली. 1988 मध्ये ‘तेजाब’ या चित्रपटात काम करण्याची त्यांना संधी मिळाली. हीरो होते अनिल कपूर. आणि जॉनी लिव्हरसोबत राजू ही या चित्रपटात झळकले.
1994 मध्ये दूरदर्शनवरील टी टाइम मनोरंजन या शोमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली. यानंतर ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमध्ये राजू तिसरा स्थानी राहिले. इथून त्यांची लोकप्रियता वाढू लागली. त्यानंतर त्यांनी कॉमेडी का महामुकाबला, कॉमेडी सर्कस, देख भाई देख, लाफ इंडिया लाफ, कॉमेडी नाईट विथ कपिल, द कपिल शर्मा शो आणि गँग्स ऑफ हंसीपूर सारखे कार्यक्रम केले.
17 चित्रपटांमध्ये काम केले, शेवटचा चित्रपट फिरंगी होता
राजू यांनी 17 चित्रपटांमध्ये काम केले. त्यांची सुरुवात तेजाब या चित्रपटापासून झाली. तो काळ टिपिकल हीरो चित्रपटांचा होता, ज्यात लोक मुख्य नायकाला पाहण्यासाठी टॉकीजमध्ये जात असत. पण यादरम्यान एका सामान्य चेहऱ्याने लोकांचे स्वतःकडे लक्ष खेचले. नाव राजू
ट्रेडमिलवर व्यायाम करताना कोसळले होते, यांच्या हृदयात आढळले होते 100 टक्के ब्लॉकेज
राजू यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. कामानिमित्त दिल्लीतील पक्षातील काही बड्या नेत्यांना भेटण्यासाठी ते दिल्लीत पोहोचले होते. 10 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या साऊथ एक्स येथील कल्ट जिममध्ये ते सकाळी वर्कआउट करत होते. यादरम्यान ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना छातीत दुखू लागले आणि ते खाली कोसळले होते. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
11 ऑगस्ट रोजी राजू यांच्यावर तातडीने अँजिओग्राफी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या हृदयात 100 टक्के ब्लॉकेज असल्याचे आढळून आले होते. ही परिस्थिती अतिशय गंभीर असल्याने डॉक्टरांनी राजू यांच्या हृदयात दोन स्टेंट लावले होते. 13 ऑगस्ट रोजी राजू यांचा एमआरआय काढण्यात आला होता. त्यामध्ये त्यांच्या मेंदूची एक नस दबली गेल्याचे समोर आले होते. राजू यांच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकष्टा केली. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.
राजू नेहमी त्यांच्या फिटनेसकडे लक्ष देत असे आणि ते फिटदेखील होता. 31 जुलैपर्यंत ते सतत शो करत होता, अनेक शहरांमध्ये त्यांचे शो होणार होते.
कानपूर ते मुंबई असा केला प्रवास
राजू श्रीवास्तव यांचे खरे नाव सत्य प्रकाश श्रीवास्तव होते. त्यांचा जन्म 25 डिसेंबर 1963 रोजी कानपूरच्या नयापुरवा येथे झाला होता. 1993 मध्ये त्यांनी कॉमेडीच्या दुनियेत प्रवेश केला. 1980 मध्ये ते कानपूरहून घरातून पळून मुंबईत आले होते. घराच्या भिंतीवर चढून शेजारच्या घरात उडी मारली आणि तेथून थेट मुंबईकडे धाव घेतली. आता नाव कमावल्यावरच परत येईन, असे ते ओरडत गेले होते, असे त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितले.
येथे जाणून घ्या कधी काय झाले?
10 ऑगस्ट रोजी राजू यांना दिल्लीत आला होता हृदयविकाराचा झटका राजूचे पीआरओ गर्वित नारंग म्हणाले, “राजू श्रीवास्तव दिल्लीत गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यांच्या भेटीची वेळ ठरलेली होती. ते हॉटेलमध्येच थांबले होते. खोलीत थोडा वेळ राहिल्यानंतर बुधवारी सकाळी ते जिममध्ये गेले. तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्याच दिवशी संध्याकाळी डॉक्टरांनी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी केली, पण त्यांचा मेंदू प्रतिसाद देत नव्हता. नाडी देखील 60-65 च्या दरम्यान होती.”
कानपूरचे माजी आमदार सतीश निगमही राजू यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी एम्समध्ये पोहोचले होते. उन्नाव सदरचे आमदार पंकज गुप्ता यांनी फोनवरून त्यांची प्रकृती जाणून घेतली. त्याचे अपडेट्स पीएमओ आणि मुख्यमंत्री कार्यालयातून सातत्याने घेतले जात होते.
राजू श्रीवास्तव यांनी एकूण 16 चित्रपट आणि 14 टीव्ही शोमध्ये काम केले होते.
13 ऑगस्ट रोजी बिग बींनी पाठवला होता मेसेज
अमिताभ बच्चन यांनी राजू श्रीवास्तव यांनी लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी एक खास ऑडिओ संदेश पाठवला होता. यामध्ये अमिताभ म्हणाले होते – उठ राजू, खूप झाले, अजून खूप काम करायचे आहे. आता उठ… आम्हा सर्वांना हसायला शिकवं.” हे रेकॉर्डिंग राजू यांना ऐकवले गेले होते.
17 ऑगस्ट – गजोधर-संकठाचे किस्से ऐकवले गेले
राजू यांचा भाऊ आणि कॉमेडियन दीपू श्रीवास्तव म्हणाले, “दादाची प्रकृती मंदावली होती. त्यामुळे कुटुंबाचे रेकॉर्ड केलेले ऑडिओ संदेश त्यांना ऐकवण्यात आले. त्यांना गजोधर आणि संकटाचे किस्सेही त्यांच्याच आवाजात सांगण्यात आले.
हा फोटो लाफ्टर चॅलेंज शो मधला आहे. या शोमधून राजू श्रीवास्तव खूप प्रसिद्ध झाले.
10 वर्षांत तीनदा झाली होती अँजिओप्लास्टी
राजू श्रीवास्तव यांची 10 वर्षांत तीनदा अँजिओप्लास्टी झाली होती. पहिली अँजिओप्लास्टी 10 वर्षांपूर्वी मुंबईच्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात झाली होती. त्यानंतर 7 वर्षांपूर्वी पुन्हा मुंबईच्याच लिलावती रुग्णालयात ते यासाठी दाखल झाले होते. त्यानंतर 11 ऑगस्ट 2022 रोजी डॉक्टरांनी त्यांची तिसऱ्यांदा अँजिओप्लास्टी केली होती.
अमिताभचा ‘दीवार’ बघून हीरो बनायला आले होते मुंबईत
लोकसभेचे तिकीट परत केले, मोदींनी प्रचारात उतरवले
2014 च्या लोकसभा निवडणुकीत सपाने राजू श्रीवास्तव यांना तिकीट दिले होते. त्यांनी ते परत केले होते. पक्षाचे स्थानिक घटक पाठिंबा देत नसल्याचे त्यांनी सांगितले होते. मार्च 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांना स्वच्छ भारत अभियानात सहभागी होण्यास सांगितले.