आयकॉनिक व्हाइट विशेषत: तरूण प्रौढांसाठी असलेली आंतरराष्ट्रीय ग्रेन अॅड मिक्स व्हिस्की
मुंबई, सप्टेंबर २०२२ – अलाइण्ड ब्लेण्डर्स अॅण्ड डिस्टिलर्स (एबीडी) लि. या भारतातील सर्वात मोठ्या देशांतर्गत अल्कोबेव्ह कंपनीने नवीन व्हिस्की ‘आयकॉनिक व्हाइट’च्या लाँचची घोषणा केली. भारतीय अल्कोबेव्ह उद्योगासाठी नवीन पाऊल उचलत हा ब्रॅण्ड प्रथम कंपनीची मेटाव्हर्समधील उपस्थिती एबीडी मेटाबारमध्ये लाँच करण्यात आला आहे. त्यानंतर ब्रॅण्ड प्रत्यक्ष जगभरात राष्ट्रीय स्तरावर लाँच करण्यात येईल.
आयकॉनिक व्हाइटमध्ये आयातित स्कॉच माल्ट्ससह बॉरबॉन ओक कास्क्सचे उत्साहवर्धक मिश्रण असण्यासोबत निवडक मॅच्युअर्ड माल्ट व सर्वोत्तम भारतीय ग्रेन स्पिरिट्सचे मिश्रण आहे. मिश्रणातील फ्रुटी व नटी सुगंधामधून या व्हिस्कीमधील खासियतेचा अनुभव मिळतो.
एबीडी इंडियाने सर्वोत्तम व्हर्च्युअल रिअॅलिटी क्षेत्र एबीडी मेटाबारसह मेटाव्हर्समध्ये प्रवेश केला, जो ग्राहक व उत्साहींना उत्पादन शोधाचा वैविध्यपूर्ण अनुभव देतो. मोबाइल व डेस्कटॉप वापरासाठी सानुकूल करण्यात आलेला मेटाबार विशेषत: तरूणांमधील मेटाव्हर्सबाबत वाढत असलेली आवड आणि नवीन डिजिटल कृतींसह प्रयोग करण्याच्या त्यांच्या इच्छेला सादर करतो.
मेटाबारचा येथे अनुभव घेता येऊ शकतो –https://abdmetabar.com/
याप्रसंगी बोलताना एबीडीचे कार्यकारी उपाध्यक्ष शेखर रामामूर्ती म्हणाले, ‘’एबीडी येथे आमचा ‘थिंक डिफरण्टली’ हा मुलभूत विश्वास आहे. प्रत्यक्ष लाँच करण्यापूर्वी एबीडी मेटाबारमध्ये आयकॉनिक व्हाइटचे लाँच ग्राहकांना स्टोअर्समध्ये उपलब्ध होण्यापूर्वी ब्रॅण्डचा सर्वोत्तम अनुभव घेण्याची संधी देते. आमचा विश्वास आहे की, ही आगामी परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल आहे आणि एबीडीची या परिवर्तनामध्ये अग्रस्थानी असण्याची इच्छा आहे.’’
या लाँचबाबत बोलताना एबीडीचे प्रमुख धोरण व विपणन अधिकारी बिक्रम बासू म्हणाले, ‘’आयकॉनिक व्हाइट ही ब्लेण्ड, पॅकेजिंग व पोझिनशनिंगसाठी समकालीन व्हिस्की आहे. ही व्हिस्की तरूण प्रौढांचे लक्ष वेधून घेईल आणि किफायतशीर प्रिमिअम विभागामध्ये उपलब्ध आहे, ज्याचे आज सर्वाधिक ग्राहक आहेत. आम्ही येथे काहीतरी अत्यंत विशेष सादर करण्यासाठी आणि सर्वांची मने जिंकण्यासाठी आलो आहोत.’’
या लाँचबाबत बोलताना रिव्हरचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक सोहिनी पानी म्हणाल्या, ‘’’आयकॉनिक व्हाइट’चे उत्साहवर्धक मिश्रण तयार करण्याचा अनुभव आनंददायी होता. याची सुरूवात नावासह झाली. ‘आयकॉनिक’ आकर्षक व ट्रेण्डी आहे, तर ‘व्हाइट’ व्हिस्कीच्या विश्वातील अचंबित करणारे ट्विस्ट आहे. व्हिज्युअल क्षेत्र व संकल्पना ब्रॅण्डला प्रेमळ तरूण ग्राहकांचा उत्साहवर्धक सोबती बनवतात. यामध्ये सर्वोत्तम बाब म्हणजे आम्हाला काही महिन्यांपूर्वी एबीडी मेटाबार निर्माण करण्याची आणि व्यासपीठावर आयकॉनिक व्हाइटच्या लाँचप्रती काम करण्याची संधी मिळाली.’’
आयकॉनिक व्हिस्की ७५० मिली, ३७५ मिली व १८० मिली या तीन पॅक आकारांमध्ये उपलब्ध आहे आणि प्रथम मेटाव्हर्समध्ये लाँच करण्यात येईल, त्यानंतर प्रत्यक्ष पूर्व, उत्तर व दक्षिण भारतातील निवडक बाजारपेठांमध्ये लाँच करण्यात येईल.