मुंबई, सप्टेंबर, 2022: जिल्हा प्रशासनाचा एक प्रगतीशील उपक्रम म्हणून, रिसायकलिंगच्या अतीशय सकारात्मक परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील अभ्यागत परिसरात (व्हिजीटर्स एरिया) रीसायकल केलेल्या टेट्रा पॅक कार्टनपासून बनविलेले बेंच स्थापित करण्यात आले आहेत. हे बेंच एकत्रीत कृतीच्या सामर्थ्याबद्दल एक भक्कम असा संदेश देतात.
जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी सुश्री निधी चौधरी तसेच अतिरीक्त जिल्हा दंडाधिकारी डॉ.विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाने आज हा उपक्रम संपन्न झाला. टेट्रा पॅक कार्टन सारख्या रीसायकल करता येण्याजोग्या कचऱ्याचे बेंच आणि डेस्क यांसारख्या नवीन वस्तूंच्या संपत्तीमध्ये कसे रूपांतर करता येते हे दाखवून दिले.
सुश्री निधी चौधरी म्हणाल्या, “मुंबई उपनगरात, आम्ही या ग्रहाचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि या मोहिमेमध्ये रीसायकलिंग हे एक शक्तिशाली साधन असू शकते यावर माझा ठाम विश्वास आहे. आमच्या आवारात रीसायकल केलेल्या टेट्रा पॅक कार्टनपासून बनवलेल्या या बेंचमुळे आम्हाला आनंद होत आहे, आणि आशा आहे की ते नागरिकांना प्रथम पर्यावरणपूरक रीसायकल करण्यायोग्य उत्पादने निवडण्यासाठी आणि नंतर रीसायकल करण्यास मदत करण्यासाठी त्यांचा कचरा विलग करण्यास प्रेरित करतील.”
सुश्री चौधरी यांनी त्यांच्या सह आयुक्त असतांनाच्या कार्यकाळात MCGM येथे कचरा व्यवस्थापनाबाबत कायदे अंमलात आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आणि आता मुंबई उपनगरातही त्यांनी सौरऊर्जा पॅनल बसवले आहेत. त्या त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात 3 Rs (रीयुज, रिफ्युज आणि रीसायकल) चे मोठ्या प्रमाणात समर्थन करतात.
कचऱ्याचे चांगले विभाजन आणि रीसायकलींग करून, टाकून दिल्या जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण 85-90% कमी करणे शक्य आहे. जिल्ह्याने गेल्या काही वर्षांत कचऱ्याचे स्रोत वेगळे करणे आणि रीसयकलींग साठी अनेक उपाय केले आहेत. रीसयकलींग केलेल्या टेट्रा पॅक कार्टनपासून बनविलेले हे बेंच ग्राहकांसाठी त्यांच्या जीवनात रीसयकलींगचा अवलंब करण्याचे मूर्त उदाहरण आहेत.
एक जबाबदार कॉर्पोरेट म्हणून, टेट्रा पॅक 2010 पासून मुंबईत गो ग्रीन विथ टेट्रा पॅक मोहीम नावाचा ग्राहक जागरूकता कार्यक्रम राबवत आहे. या कार्यक्रमांतर्गत, 54 रिलायन्स रिटेल स्टोअर्स वापरलेल्या कार्टनसाठी ड्रॉप ऑफ पॉइंट म्हणून काम करतात, ज्यामुळे ग्राहकांना कार्टन सहजपणे रिसायकल करता येतात, RWAs, शाळा, चर्च आणि इतर 150 हून अधिक स्थानांद्वारे पुढे त्याचे समर्थन केल्या जाईल. गेल्या काही वर्षांमध्ये, कार्यक्रमाने 9.5 दशलक्ष कार्टन गोळा करण्यात आणि रीसायकल करण्यात मदत केली आहे, जवळपास 400 डेस्क आणि एक लाखाहून अधिक रीसायकल उत्पादने कमी विशेषाधिकार असलेल्या शाळांना दान केली आहेत. याशिवाय, मुंबईतील विविध गृहनिर्माण सोसायटी, उद्याने आणि इतर सार्वजनिक ठिकाणी 300 हून अधिक गार्डन बेंच भेट देण्यात आले आहेत.