तैवानमध्ये गेल्या २४ तासात तीन वेळा भूकंप आला आहे. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जपानमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. तैवानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पूर्व भागातील तायतुंग काऊंटी भूकंपाचं मुख्य केंद्र आहे, शनिवारी याच भागात ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रविवारी सकाळी ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला. यानंतर रविवारी दुपारी ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला आहे.
भूकंपामुळे तैवानमधील अनेक रस्त्यांना तडे गेले आहेत, पूल कोसळले आहेत. युली येथे एक दुकान पडलं असून, चार लोक खाली दबले आहेत. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पूल कोसळले असल्याने काही वाहनंदेखील खाली कोसळल्याची माहिती मिळत आहे. डोंगली स्थानरावर ट्रेन रुळावरुन खाली उतरली, स्थानकाचं छतही कोसळलं आहे. युएस पॅसिफिर त्सुनामी वॉर्निग सेंटरने, या भूकंपानंतर तैवानामध्ये त्सुनामी अलर्ट जारी केला आहे.