फ्रॉम इंडिया पुस्तक प्रकाशित –
डॉ. अपर्णा गोविल भास्कर (बॅरियाट्रिक सर्जन)
मुंबई – जगभरात लठ्ठपणाने त्रस्त लोकांची संख्या वाढत आहे. अशा लोकांसाठी वजन कमी करण्यासाठी बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया फायदेशीर ठरत आहे. परंतु शस्त्रक्रियेनंतर व्यक्तीने आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक असते. आहारात योग्य प्रमाणात प्रथिने आणि इतर पोषक घटकांचा समावेश असलेल्या संतुलित आहारावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. जे शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचे वजन कमी करण्यास मदत करते. हे लक्षात घेऊन बेरिएट्रिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर आणि मरियम लकडावाला यांनी संयुक्तपणे ‘व्हेजिटेरियन बॅरिएट्रिक रेसिपीज- अ ग्लोबल कुक बुक फ्रॉम इंडिया’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे.