15 सप्टेंबर 2022 रोजी प्रस्ताव खुला आणि 19 सप्टेंबर 2022 रोजी प्रस्ताव बंद
13 सप्टेंबर, 2022: अन्नपूर्णा स्वादिष्ट ही कोलकाता-आधारित एफएमसीजी कंपनी असून आज त्यांच्या वतीने एनएसई इमर्जवर बुक-बिल्डिंग मार्गाने त्यांच्या आगामी सार्वजनिक प्रस्तावाकरिता रू 68-70 प्रति समभाग किंमत निश्चित करण्यात आली आहे.
प्रस्ताव सबसक्रीप्शनकरिता 15 सप्टेंबर 2022 रोजी खुला होईल आणि 19 सप्टेंबर 2022 रोजी बंद होईल. कंपनी बुक-बिल्डिंग प्रस्तावामार्फत 43.22 लाख इक्विटी समभाग देऊ करणार आहे. किमान 2000 समभागांचे अॅप्लिकेशन करण्यात येईल, आणि त्यानंतर त्याच पटीत असेल. वाटप निश्चित केल्यानंतर समभाग एनएसई एसएमई इमर्जवर सूचीबद्ध असणार आहेत. हा प्रस्ताव कंपनीच्या प्रस्ताव-पश्चात पेड-अप कॅपिटलच्या 26.32% असेल.
कॉर्पोरेट कॅपिटल व्हेंचर्स प्रा. लि. हे प्रस्तावाचे लीड मॅनेजर आणि स्कायलाईन फायनान्शियल सर्विसेस प्रा. लि. हे प्रस्तावाचे रजिस्ट्रार असतील. प्रस्ताव-पश्चात कंपनीचे पेड-अप इक्विटी कॅपिटल रू. 12.10 कोटींवरून रू. 16.42 कोटींपर्यंत वाढेल.
बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार शंकर शर्मा यांनी कंपनीच्या पूर्व-आयपीओ निधी फेऱ्यात गुंतवणूक केली आहे. शंकर शर्मा हे स्वत:च्या क्षमतेत समोर आले आहेत. त्याशिवाय, अमित भारतीय, पूर्व भागीदार, जीएमओ सिंगापूर पीटीई’ने देखील स्वत:च्या क्षमतेत गुंतवणूक केली आहे. एनएव्ही कॅपिटल इमर्जिंग स्टार फंड आणि राजस्थान ग्लोबल सिक्युरिटीज यांच्यासह दिग्गज संस्थात्मक गुंतवणुकदारांनी कंपनीच्या पूर्व-आयपीओ डावात गुंतवणूक केली आहे.
कंपनीची दोन निर्मिती युनिट्स आसनसोल आणि सिलीगुडी येथे आहेत. अन्नपूर्णा स्वादिष्टची सिलीगुडी प्रकल्पाची नियमित निर्मिती क्षमता 10 मेगा टन फ्रायमची आहे. जॅकपॉट, चटपटा मून, बलून, फिंगर, रॅन्म्बो, मेकअप बॉक्स, धमाका, पूचका, जंगल अॅडव्हेंचर्स, रिंगा, बचपन का प्यार, कुरचुरे, क्रिम फील्ड केक वॅनिला, क्रिम फिल्ड केक लिची इत्यादी ब्रँड नावांखाली उत्पादने विकण्यात येतात. या कंपनीत जवळपास 235 कर्मचारी आहेत आणि 225 कर्मचारी करारावर कार्यरत आहेत.
विस्तार योजना
कंपनीच्या वतीने कोलकात्यापासून 60 किमी अंतरावर वसलेल्या गुरप आणि धूलागडमध्ये ग्रीनफिल्ड प्रोजेक्ट उभारण्यात आला. गुरूप युनिटचे क्षेत्रफळ जवळपास 70,000 चौ. फू. इतके असून रस्कसाठी वार्षिक क्षमता प्रति दिवस 10 मेगा टन याप्रमाणे असून केककरिता प्रति दिवस 5 मेगा टन इतकी आहे. गुरूप युनिटमध्ये पूर्वउद्योग एकीकरण (बॅकवर्ड इंटीग्रेशन) करिता प्रति दिवस 100 मेगा टन क्षमतेची पिठाची गिरण वसवण्यात आली आहे. या युनिटची अंदाजे किंमत ₹17.09 कोटी असून त्याला आयपीओ कामकाजामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येईल. पश्चिम बंगालमध्ये साधारण 75,000 चौ. फू. जागेवरील धूलागड फूड पार्कमध्ये आणखी एक अत्याधुनिक स्वरूपाचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. ज्याची क्षमता फ्रायमकरिता प्रति दिवस 16 मेगा टनइतकी असून वेफरसाठी प्रति दिवस 1.5 मेगा टन याप्रमाणे आहे. या युनिटचा अंदाजे खर्च ₹4.64 कोटी याप्रमाणे राहील. धूलागड आणि गुरप येथील नवीन सुविधाकेंद्र आर्थिक वर्ष 23 च्या चौथ्या तिमाहीपर्यंत सुरू होईल असा अंदाज आहे.
वित्तीय
अन्नपूर्णा स्वादिष्ट’चा महसूल मार्च 2019 मध्ये 11.67 कोटी होता, तो मार्च 2022 मध्ये वाढून रू. 61.04 कोटींपर्यंत पोहोचला. तर एकूण नफा मार्च 2019 मध्ये वाढून रू. 0. 28 कोटींवरून मार्च 2022 वरून रू. 2.40 कोटीपर्यंत पोहोचला आहे. कंपनीचे मार्च 2022 मधील नमूद दीर्घकालीन कर्ज रू. 3.47 कोटींच्या घरात होते. डेट-इक्विटी रेशीयो केवळ 1.26 आहे. आर्थिक वर्ष 23 च्या पहिल्या तिमाहीत, रू. 28.99 कोटींच्या उलाढालीवर रू. 1.31 कोटींचा एकूण नफा कमावला.
मुख्य माहिती
प्रस्ताव खुला – 15 सप्टेंबर, 2022
प्रस्ताव बंद – 19 सप्टेंबर, 2022
किंमत पट्टा – बुक बिल्डिंग प्रस्तावामार्फत फ्लोअर किंमत ₹68-70
बोली – किमान 2,000 शेअर आणि त्यानंतर 2,000 समभागांच्या पटीत
प्रस्ताव उद्दिष्ट – पश्चिम बंगालमध्ये अतिरिक्त युनिट स्थापित करणे आणि पूर्व तसेच ईशान्य राज्यांत उत्पादन श्रेणीचा विस्तार करणे.
सूचीबद्ध – एनएसई इमर्ज
कंपनीविषयी अधिक जाणून घ्या, भेट द्या http://www.annapurnasnacks.in.