केमस्टोअर महाराष्ट्रातील भिवंडीमधील व्ही-लॉजिसच्या अत्याधुनिक वेअरहाऊसमध्ये आहे
मुंबई, सप्टेंबर, 2022 : व्ही ट्रान्स (इंडिया) लि. या सर्वसमावेशक वेअरहाउसिंग, 3 पीएल सोल्यूशन्स आणि परिपूर्ण एकात्मिक लॉजिस्टिक्स पुरवठादार असलेल्या व्ही लॉजिसतर्फे केमस्टोअर हे अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या जागतिक दर्जाच्या सुविधेची घोषणा केली आहे. केमस्टोअर ही सुपर-स्पेशलाइझ्ड रासायनिक साठवणूक उपाययोजना आहे. या माध्यमातून जागतिक स्तरावर सर्वोत्तम सुरक्षा मानके प्रदान करण्यात येतात. ही जागतिक दर्जाची सुविधा देशातील आघाडीच्या वेअरहाऊसेसपैकी एक आहे. या सुविधेमध्ये नॅशनल बिल्डिंग कोड (एनबीसी) 2016 आणि नॅशनल फायर प्रोडेक्शन असोसिएशन (एनएफपीए) या दोहोंचे पूर्ण अनुपालन केलेले आहे. अनेक धोकादायक वर्गांमधील विविध रसायनांची साठवणूक करण्यासाठी या सुविधेमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा आहेत आणि काटेकोर सुसंगततेचे पालन करण्यात येते. नियमांनुसार ही सुविधा महामार्ग, निवासी भाग, शाळा, नदी यापासून लांब असून एनएच-3 मानकोली भिवंडी येथे आहे. अत्यंत सुरक्षा उपाययोजनांसह घातक रसायनांची साठवणूक करण्यासाठी या सुविधेचे क्षेत्रफळ 2,18,350 चौ. फुट इतके आहे. आम्ही आपत्कालीन सेवेसाठी वेद हॉस्पिटलशी भागीदारी केली आहे, जे या सुविधेपासून 12 किमी अंतरावर आहे. अग्निशमन केंद्र केम स्टोअरपासून 20 किमी अंतरावर आहे.
सर्व प्रकारची घातक रसायने सहजपणे व सुरक्षितपणे साठविण्यासाठी ही केमिकल इंडस्ट्री मानकांचे काटेकोर अनुपालन करून उभारण्यात आली आहे. या सुविधेमधील शेल्फ अवजड रॅकिंग यंत्रणेने उभारण्यात आल्या असून त्यांची पद्धतशीर रचना करण्यात आली आहे, जेणेकरून मटेरिअलची इष्टतम क्वांटिटी साठवता येईल.या वेअरहाऊसच्या मध्यभागी 46 फुट इतकी उंची आहे आणि पूर्ण कार्यक्षमतेने ही जागा वापरली जाते. नैसर्गिक प्रकाश व हवा खेळती राहावी यासाठी वेअरहाऊसमध्ये स्मार्ट उष्णतारोधक व वायूविजन राखण्यात आले आहे. या वेअरहाऊसमध्ये सेंट्रल रूफ मॉनिटरिंग सिस्टिम आहे, जेणेकरून आतील तापमान प्रमाणात राखता येईल आणि हवा खेळती राहण्यास याचा उपयोग होतो. आग लागली असता येथून बाहेर पडण्यासाठी तसेच अग्निशमन उपकरणे आत आणण्यासाठी आणि दुसऱ्या वाहनांची ये-जा करण्यासाठी या सुविधेच्या चारही बाजूंनी प्रवेश मार्ग उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारच्या वातावरणात काम करता यावे यासाठी या सुविधेच्या दोन्ही बाजूंना 26 फुट व 20 फुट रुंद छत आहे. या सुविधेमध्ये अखंडित व स्वयंचलित डॉक-टू-रॅक मूव्हमेंट आहे. येथे आर्टिक्युलेटेड फोर्कलिफ्ट, बॅटरीवर चालणारी फोर्कलिफ्ट, बॅटरीवर चालणारा पॅलेट ट्रक आणि हायड्रॉलिक पॅलेट ट्रक आहे.
वेअरहाऊसमधून गळती होऊन प्रदूषण होऊ नये यासाठी या ठिकाणी वेगळा नियंत्रण खड्डा आहे, ज्यात साठवणूक व विल्हेवाट यांचे व्यवस्थापन करण्यासाठी 4 लाख लिटरची टाकी आहे. वेअरहाऊसमध्ये सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी, शेतीसाठी वापरण्यासाठी किंवा शौचालयात घरगुती वापरासाठी सांडपाणी प्रक्रिया संयंत्र बसवले आहे. नैसर्गिक दाबाचा वापर करण्यासाठी व बॅकअप मोटरसह पाणीपुरवठा करण्यासाठी या ठिकाणी वेगळी पंप रूम आहे. आगीच्या अंतर्गत व बाह्य अग्निसंपर्कापासून सुरक्षिततेसाठी आणि मोठ्या ओपनिंग्जचे संरक्षण करण्यासाठी पाण्याचा पडदा निर्माण करणारी यंत्रणा येथे आहे. रासायनिक उत्पादनांच्या साठवणुकीचा विचार करता या संपूर्ण परीघात ड्रेंटर बसविलेले आहेत. या स्टोअरमध्ये सर्वोत्तम सुरक्षितता मानकांसाठी व्हीईएसडीए (व्हेरी अर्ली स्मोक डिटेक्ट अॅपरॅटस) भरले आहेत.
व्ही लॉजिसने खालील अनुपालन केले आहे
विविध प्रकारच्या रसायनांची साठवणूक सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गुंतागुंतीची व महत्त्वाची असते. खोलीतील तापमान व इतर रसायनांशी असलेली सुसंगतता यासारख्या साठवणुकीच्या सर्व आवश्यकतांची पूर्तता करण्यासोबतच योग्य प्रशिक्षण व योग्य पर्यवेक्षण नसलेल्या व्यक्तींसाठी ही रसायने हाताळणे व आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज असणे याबाबत अडचण निर्माण निर्माण होऊ शकते. या संदर्भात व इतर निकषांबद्दल केम स्टोअर इतर वेअरहाउसेसच्या तुलनेने अधिक चांगले आहे आणि या क्षेत्रातील एक सर्वोत्तम वेअरहाउस आहे.
*ग्रामपंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र*
• अग्निशमन दलाकडून ना हरकत प्रमाणपत्र – महाराष्ट्र शासन
• गुड डिस्ट्रिब्युशन प्रॅक्टिस सिस्टिम सर्टिफिकेट
• मुंबई वेस्ट मॅनेजमेंट मेंबरशिप प्रमाणपत्र
• आयएसओ 9001 2015 प्रमाणपत्र
• आयएसओ 14001 2015 प्रमाणपत्र
• आयएसओ 45001 2018 प्रमाणपत्र
• एमपीसीबी रेड कॅटेगरी लायसन्स
• फॅक्टरी लायसन्स
यावर प्रतिक्रिया देताना व्ही-ट्रान्स (इंडिया) लि.चे कार्यकारी संचालक आणि व्ही-लॉजिसचे सीईओ श्री. रोनक शाह म्हणाले, “केमस्टोअरसह आमच्या सेवांचे विस्तारीकरण करताना आम्हाला आनंद होत आहे. केम स्टोअर हे सुपर-स्पेशलाइझ्ड रासायनिक साठवणूक आहे, जिथे जागतिक पातळीवर सर्वोत्तम सुरक्षा मानके पुरविली जातात. केमस्टोअरसह आम्ही बांधकाम, डिझाइन, प्रशिक्षण व विकास आणि आग, विल्हेवाट सुरक्षितता आणि इतर आवश्यक उपायांसाठी सुरक्षितता मानकांसह रसायनांच्या सुरक्षित आणि परिपूर्ण अनुपालनासाठी एक मापदंड तयार केला आहे. रसायनांचे सुरक्षित आणि भूमिगत साठवणूक प्रदान करण्यासाठी आणि आमचे क्लायंट आमच्याकडे त्यांचा माल सोपवल्यानंतर निश्चिंत होतील, याची खात्री करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. रसायन क्षेत्रात भविष्यात काय होऊ घातले आहे हे पाहण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो, जेणेकरून आम्ही त्या घटकांशी जुळवून घेऊ शकू आणि समाजाप्रती अधिक योगदान देऊ शकू.”