नाशिक दि. १२ (प्रतिनिधी) : पेटीएमची मालकीहक्क असलेल्या वन९७ कम्युनिकेशन्स ने नाशिक येथे सिटीलिंकसह शहरांतर्गत बस तिकिट बुकिंगवर त्वरित सूटची घोषणा केली आहे. सिटीलिंक ही नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने नाशिक शहरासाठी प्रदान केलेली सार्वजनिक वाहतूक बस सेवा आहे.
कंपनी आपल्या ऑनलाइन व्यासपीठावरून सर्व बस तिकिट बुकिंगवर ५ टक्के सूट देत आहे. पेमेंट वॉलेट पेटीएमचा ऑनलाइन प्रवास बुकिंग व्यवसाय पेटीएम ट्रॅव्हल नाशिकच्या रहिवाशांना पेटीएम अॅपद्वारे लोकल बस तिकिट खरेदी करण्यास मदत करेल.
नाशिकच्या रहिवाशांसाठी प्रवासाचा अनुभव विनासायास आणि सोयीस्कर बनवण्याचा पेटीएमचा उद्देश आहे. वापरकर्ते पेटीएम यूपीआय, पेटीएम वॉलेट, पेटीएम पोस्टपेड (बाय नाऊ, पे लेटर), नेटबँकिंग, क्रेडिट व डेबिट कार्डसच्या माध्यमातून व्यवहार करू शकतात.
याबाबत पेटीएमचे प्रवक्ता म्हणाले की, ‘’आमच्या वापरकर्त्यांना सुविधा आणि डिजिटल तिकिट सुलभतेने ऑफर करण्याचे आमचे ध्येय आहे. इंट्रा-सिटी बस तिकीट बुकिंगसह प्रवासी त्यांच्या दैनंदिन रोख व्यवहारासंदर्भातील अडचणी टाळू शकतात आणि पैशांची बचत करू शकतात. पेटीएम यूपीआय, पेटीएम वॉलेट, पेटीएम पोस्टपेड (बीएनपीएल), नेटबँकिंग, डेबिट आणि क्रेडिट कार्ड यांसारख्या पेमेंट पद्धतींच्या श्रेणीसह आम्ही पेमेंटची स्थिर सुविधा देखील देतो.”