• कंपनीने आजतागायत 95 देशांमध्ये 1,50,395 युनिट्स पाठवले
सप्टेंबर 2022 : देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या कार निर्मात्यांपैकी एक असलेल्या किआ इंडीयाने आज जाहीर केले की त्यांनी आंध्र प्रदेशातील त्यांच्या अत्याधुनिक अनंतपूर प्लांटमधून 1.5 लाख निर्यातीचा आंकडा पार केला आहे. आत्तापर्यंत, कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपले पहिले उत्पादन लाँच केल्यानंतर लगेचच, सप्टेंबर 2019 पासून 95 देशांमध्ये तिच्या अतिशय लोकप्रिय असलेल्या सेल्टॉस, सोनेट आणि केरेन्ससह 1,50,395 युनिट्स पाठवले आहेत. ही कामगिरी कंपनीच्या ‘मेक इन इंडिया’ प्रयत्नांचाच परिपाक आहे आणि भारतात जागतिक दर्जाची उत्पादने बनवण्याच्या आणि त्यांना जगभरात नेण्याच्या त्यांच्या दृष्टीला यातून बळकटी मिळत आहे.
किआ सेल्टॉस ने एकूण निर्यातीमध्ये 72% योगदान दिले आहे, त्यानंतर किआ सोनेट आणि किआ केरेन्स हे नव्याने लॉन्च केलेल्या ब्रॅंडचे नंबर लागते. कंपनीने 2022 च्या पहिल्या आठ महिन्यांत 54,153 युनिट्स पाठवले आहेत, ज्यामुळे ते वर्षातील सर्वात मोठे युटिलिटी व्हेईकल (युव्ही) निर्यातदार बनले आहे. किआ इंडिया 2021 मध्ये सर्वात जास्त युव्ही निर्यातदार देखील होती.
किआ इंडियाचे मुख्य विक्री अधिकारी म्युंग-सिक सोहन म्हणाले, “कियासाठी जागतिक स्तरावर भारत ही धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि एक मजबूत विक्री, उत्पादन आणि आर अँड डी हब बनण्याची त्यात पूर्ण क्षमता आहे. आमचा अत्याधुनिक अनंतपूर प्लांट किआ नेटवर्कमधील सर्वात महत्वाचे निर्यात केंद्रांपैकी एक आहे आणि आमचे कार्य येथे सुरू झाल्यापासून आम्ही केवळ देशातच नव्हे तर परदेशातही दर्जेदार उत्पादने पुरवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. युव्ही जगभरात लोकप्रिय होत आहेत आणि आम्हाला आनंद होत आहे की आमच्या मेड इन इंडिया युव्हींना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा भारताच्या उत्पादन कौशल्याचा खरा दाखला आहे आणि जगभरातील ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारी उत्कृष्ट उत्पादने तयार करण्याची आमची क्षमता अधोरेखित करतो.”
सेल्टॉस, सोनेट आणि आता केरेन्स यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमालीची लोकप्रियता मिळाल्याने भारतात उत्पादित केलेल्या किआ उत्पादनांना जगभरात जोरदार मागणी आहे. सप्टेंबर 2019 मध्ये सेल्टॉस पाठवण्यास सुरुवात केल्यापासून, किआ इंडीया ने मध्य पूर्व, आफ्रिका, मध्य आणि दक्षिण अमेरिका, मेक्सिको आणि आशिया पॅसिफिकमध्ये कार निर्यात केल्या आहेत. मुख्य बाब म्हणजे ऑगस्ट 2022 मध्ये, कंपनीने 8,174 युनिट्स पाठवून, आतापर्यंतची सर्वोच्च मासिक निर्यात नोंदवली आहे.