३ वर्षांत १०० कोटी रूपयांच्या व्यवसायाचे उद्दिष्ट
मुंबई, सप्टेंबर २०२२ : महाराष्ट्रातील आघाडीचा ज्वेलरी ब्रँड असलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’ने ‘सिल्वोस्टाईल – फॅशन नेक्स्ट’ या आपल्या ब्रँडला पुन्हा नव्याने सादर केले आहे. तरूण पिढी आणि त्यांच्या फॅशन संबंधी कल लक्षात घेता सादर करण्यात आलेला हा ब्रँड ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या ३५ दालनांमध्ये शॉप-इन-शॉप पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये सिल्वोस्टाईल – फॅशन नेक्स्ट एक्सक्लुझिव्ह बुटिक्स आणि ई-कॉमर्स स्टोअरचा समावेश असेल. चांदीचे दागिने आणि सेमी फाईन फॅशन ज्वेलरीच्या माध्यमातून तीन वर्षात १०० कोटी रूपये व्यवसायाचे ब्रँडचे उद्दिष्ट आहे.
सध्याच्या काळात भारतात तसेच जागतिक पातळीवर चांदीच्या दागिन्यांना मोठी मागणी आहे. ‘सिल्वोस्टाईल – फॅशन नेक्स्ट’चे उद्दिष्ट हे ग्राहकांना पसंतीस उतरेल असे चांदीचे डिझाईन व फॅशन ज्वेलरी ब्रँड म्हणून प्रस्थापित करणे हे आहे. या ब्रँडच्या माध्यमातून सध्याचा कल लक्षात घेता तरूण पिढीसाठी किफायतशीर दरात आकर्षक डिझाईन्स सादर केले जाणार आहेत. याच्या उत्पादन संचामध्ये नेकलेसेस, पेंडंट सेट्स, रिंग्स, ब्रेसलेट, ईअर रिंग्स हे प्रेशियस व सेमी प्रेशियस स्टोन्ससह उपलब्ध असतील.
सिल्वोस्टाईल हा भारतात साधारण २०१३-१४ मध्ये कोणत्याही रिटेल ज्वेलरीद्वारे सादर केला गेलेला दिशादर्शक असा सिलव्हर ज्वेलरी ब्रँड होता. बॉलीवूड सेलिब्रिटीज तसेच चित्रपटांशी सहयोगासह देशभरात विपणन मोहिमांद्वारे याला यश मिळाले. सलमान खानच्या बजरंगी भाईजान या लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटामध्ये भगवान हनुमानाचे पेंडंट चांदीमध्ये सादर केले. हे बॉलीवूड चित्रपटासाठी तयार करण्यात आलेले पहिले ज्वेलरी उत्पादन होते.
‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले की, ‘सिल्वोस्टाईल – फॅशन नेक्स्ट’ ही ‘सिल्वोस्टाईल’ ब्रँडची नवी आवृत्ती असून ती महामारी पश्चासत काळाशी आणि नवीन पिढीच्या गरजांशी सुसंगत आहे. हे जगभरातील लोकांच्या चांदीच्या दागिन्यांशी निगडित गरजांची पूर्तता करेल. आम्ही ही नवीन उत्पादने ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या भारत, दुबई व यूएसए येथील स्टोअर्समध्ये सादर करण्यास उत्सुक आहोत. याशिवाय आम्ही तरूण पिढीला एक अद्वितीय दागिने खरेदीचा अनुभव देण्यासाठी एक्सक्लुझिव्ह सिल्वोस्टाईल – फॅशन नेक्स्ट बुटिक्स सुरू करणार आहोत. चांदीच्या दागिन्यांना आज मोठी मागणी आहे आणि आजच्या काळाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आमच्याकडे योग्य उत्पादने आहेत, अशी आम्हाला खात्री आहे.