• शालेय विद्यार्थ्यांवर लक्ष्य करणा-या या उपक्रमाचा भारतातील तरूणांमध्ये विम्याबाबत जागरूकतेला चालना देण्याचा मनसुबा
• हा उपक्रम पोहोचला भारतातील ११० हून अधिक शहरांमधील १,५०० हून अधिक शाळांमधील ३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत
मुंबई, सप्टेंबर १२, २०२२: एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी या भारतातील आघाडीच्या खाजगी क्षेत्र जनरल इन्शुरन्स कंपनीने एचडीएफसी एर्गो इन्शुरन्स अवेअरनेस अवॉर्ड ज्युनिअर क्विझ २०२२’च्या ७व्या पर्वाच्या लाँचची घोषणा केली. हा उपक्रम जागरूकता निर्माण करणारे व्यासपीठ आहे, ज्याचा विद्यार्थ्यांना वयाच्या सुरूवातीच्या टप्प्यामध्ये आर्थिक सुरक्षिततेचे महत्त्व सांगण्यासाठी त्यांच्यामध्ये विमा साक्षरतेला चालना देण्याचा मनसुबा आहे.
विद्यार्थ्यांमध्ये विमा जागरूकता पसरवण्याचे महत्त्व लक्षात घेऊन एचडीएफसी एर्गोने २०१६ मध्ये इन्शुरन्स क्विझ ही संकल्पना आणली, ज्यामुळे विद्यार्थ्यांना लहान वयातच विम्याबद्दल सक्रियपणे शिकता यावे आणि त्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याच्या गरजेबद्दल त्यांना शिक्षित करण्यास मदत होईल. यावर्षी, ११० हून अधिक शहरांतील १,५०० हून अधिक शाळांमधील ३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत इन्शुरन्स क्विझ पोहोचली आहे. २ सप्टेंबर २०२२ पासून सुरू होणाऱ्या या देशव्यापी प्रश्नमंजुषेमध्ये इयत्ता आठवी आणि नववीतील २,६०० विद्यार्थी सहभागी होत आहेत.
या प्रश्नमंजुषा स्पर्धेबाबत बोलताना एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रितेश कुमार म्हणाले, “२०२१ मध्ये भारतात विम्याचे प्रमाण ४.२ टक्के होते, जे जागतिक सरासरी ७.० टक्क्यांपेक्षा कमी आहे. विम्याचे प्रमाण कमी असण्यामागील प्रमुख कारण म्हणजे विम्याबाबत कमी जागरूकता. आम्ही विम्याबाबत जागरूकतेचा प्रसार करण्याच्या मनसुब्यासह इन्शुरन्स क्विझ सुरू केली. तरुण वयात, विद्यार्थ्यांना सक्षम केले जाऊ शकते आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी विम्याचे महत्त्व शिकवले जाऊ शकते. आमचा विश्वास आहे की, हे व्यासपीठ आपल्या देशाच्या भावी पिढीला विम्याबद्दल जागरूक करेल आणि अशा प्रकारे एक सुरक्षित देश निर्माण करण्यास योगदान देईल.”
या अद्वितीय उपक्रमाने आतापर्यंत ६ लाखांहून अधिक तरूणांमध्ये विम्याच्या संकल्पनेसह जागरूकता निर्माण केली आहे. २०१६ मध्ये फक्त मुंबई शहरामध्ये सुरू झालेली ही क्विझ आता देशभरातील ११० हून अधिक शहरांपर्यंत पोहोचली आहे. या क्विझला तीन फेऱ्यांमध्ये विभागण्यात आले आहे – सिटी, झोनल व फायनल्स. सिटी फेरीमधील विजेते झोनल फेऱ्यांसाठी पात्र ठरतात आणि झोनल फेऱ्यांचे विजेते ग्रॅण्ड फिनालेमध्ये एकमेकांशी स्पर्धा करतात. या क्विझ स्पर्धेच्या विविध स्तरांवर जिंकण्यासाठी ७.५ लाख रूपयांची बक्षीसे आहेत. ग्रॅण्ड फिनालेचे आयेाजन २७ सप्टेंबर २०२२ रोजी करण्यात येईल, या दिवशी कंपनीचा २०वा वर्धापन दिन आहे.