ठाणे , दि. 12 (प्रतिनिधी) : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि कर्नाटक सरकारच्या वतीने टीसीएस रूरल आयटी क्विझच्या २३व्या आवृत्तीमध्ये भाग घेण्यासाठी नोंदणी देशभरात सुरु झाली आहे. हा कार्यक्रम बंगलोर टेक समिट २०२२ चा एक भाग म्हणून या क्विझचे आयोजन केले जाईल.
या क्विझमध्ये ऑनलाईन टेस्ट्स आणि व्हर्च्युअल व फिजिकल क्विझ शो देखील असतील. छोट्या शहरांमधील व जिल्ह्यांमधील आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना यामध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. शहर महानगरपालिकांच्या हद्दीच्या आत असलेल्या शाळा यामध्ये सहभागी होऊ शकत नाहीत.
टीसीएस रूरल आयटी क्विझमध्ये विविध क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाच्या वापरावर लक्ष केंद्रित केले जाते, यामध्ये तंत्रज्ञान पर्यावरण, व्यापार, लोक, नवे ट्रेंड्स आणि लीजेंड्स यांचा समावेश आहे. इंटरनेटचे जग व अनोख्या वेबसाईट्स, आयटी बझवर्ड्स, एक्रोनिम्स, आयटी क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम व्यक्ती, कम्युनिकेशन कंपन्या, सॉफ्टवेयर उत्पादने आणि आयटीचा इतिहास हे विषय या क्विझमध्ये अंतर्भूत केले जातात. या क्षेत्रांवर आयटीचा प्रभाव पडला आहे त्यांना देखील या क्विझमध्ये समाविष्ट केले जाते, उदाहरणार्थ, शिक्षण, मनोरंजन, पुस्तके, मल्टिमीडिया, संगीत, सिनेमा, इंटरनेट, बँकिंग, जाहिरात, खेळ, गेमिंग, सोशल नेटवर्किंग आणि मोबाईल्सचे जग.
टीसीएस रूरल आयटी क्विझमध्ये संपूर्ण देशभरात आठ रिजनल फायनल्स होतात. प्रत्येक रिजनल फायनलच्या विजेत्याला बंगलोरमध्ये नोव्हेंबर महिन्यात होणार असलेल्या राष्ट्रीय अंतिम फेरीसाठी आमंत्रित केले जाईल. सर्व रिजनल विजेत्यांना प्रत्येकी १०,००० रुपयांचे व उपविजेत्यांना प्रत्येकी ७,००० रुपयांचे गिफ्ट व्हाउचर्स दिले जातील. टीसीएस रूरल आयटी क्विझच्या भाग्यशाली राष्ट्रीय विजेत्याला/विजेतीला १,००,००० रुपयांची टीसीएस एज्युकेशन स्कॉलरशिप आणि राष्ट्रीय उपविजेत्याला/उपविजेतीला ५०,००० रुपयांची स्कॉलरशिप व इतर अनेक बक्षिसे देऊन गौरवण्यात येईल. विद्यार्थ्यांना १८ सप्टेंबर २०२२ पूर्वी नोंदणी करावी लागेल.