अल्युरियन प्रोग्राममध्ये यांचा समावेश आहे:
– अल्युरियन स्वॉलोबल कॅप्स्यूल – जगातील पहिला आणि प्रक्रियारहित असलेला एकमेव गॅस्ट्रिक बलून, जो वजन कमी करण्यासाठी वापरला जातो.
– अल्युरियन व्हर्च्युअल केयर सूट (व्हीसीएस) – अल्युरियन आयरिस एआय प्लॅटफॉर्मने चालित असून यामध्ये अल्युरियन मोबाईल ऍप, कनेक्टेड स्केल व हेल्थ ट्रॅकर आहे, जो रुग्ण व आरोग्यसेवा प्रॅक्टिशनर्स या दोघांनाही वास्तविक माहिती पुरवतो.
मुंबई, ७ सप्टेंबर २०२२: स्थूलपणाची समस्या कायमची संपुष्टात यावी यासाठी समर्पितपणे काम करणारी कंपनी अल्युरियनने अल्युरियन स्वॉलोबल कॅप्स्यूल भारतात दाखल केली आहे. हे असे एकमेव मेडिकल वेट-लॉस डिव्हाईस आहे, ज्याला सेंट्रल ड्रग्स स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने मान्यता दिली आहे. सीडीएससीओ हे भारतामध्ये आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालनाच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय नियामक प्राधिकरण आहे.
डॉ. शंतनू गौड यांनी अल्युरियनची स्थापना करताना एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले होते – स्थूलपणाची समस्या संपुष्टात आणणे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून अंडरग्रॅज्युएट शिक्षण पूर्ण केल्यावर डॉ. गौड यांनी हार्वर्ड मेडिकल स्कुलमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असताना २००९ साली ही कंपनी सुरु केली. आपले भागीदार आणि माजी हार्वर्ड प्रोफेसर डॉ. राम छुट्टानी यांनी अल्युरियन प्रोग्रामसाठी व्हिजन विकसित केले. अल्युरियन स्वॉलोबल कॅप्स्यूल आणि त्यासोबत रुग्णापासून दूर असताना देखील त्याच्यावर/तिच्यावर लक्ष ठेवता येईल असा अल्युरियन व्हर्च्युअल केयर सूट हे अल्युरियन आयरिस एआय प्लॅटफॉर्ममार्फत चालवले जातात, ज्यामध्ये अल्युरियन मोबाईल ऍप, कनेक्टेड स्केल आणि हेल्थ ट्रॅकर यांचा समावेश आहे.
भारतामध्ये स्थूलपणाची समस्या हाताळणे
नुकत्याच करण्यात आलेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार (२०१९-२०२१) २०१६ आणि २०२१ यादरम्यान भारतामध्ये महिलांमध्ये स्थूलपणाचे प्रमाण २१% वरून २४% वर पोहोचले आहे तर पुरुषांमध्ये ते १९% वरून २३% इतके वाढले आहे. आरोग्याला अपायकारक अशा खाण्याच्या सवयी, बैठी जीवनशैली आणि सुरक्षित, प्रभावी उपचारांचा अभाव यामुळे स्थूलपणामध्ये वाढ होत असून, त्यातून मधुमेह व हृदय विकार अशा गंभीर समस्या देखील उद्भवू शकतात.
|
वजनात झालेली ९५% घट १ वर्ष कायम राखली जाते.2 |
प्लेसमेंटमध्ये १५ मिनिटांची आउटपेशंट व्हिजिट असते जी एखाद्या दुपारच्या जेवणाच्या सुट्टीमध्ये संपूर्णपणे गोपनीय पद्धतीने केली जाऊ शकते. |
अल्युरियन प्रोग्रामसाठी पात्र ठरण्यासाठी रुग्णांचा बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) किमान २७ असलाच पाहिजे.
भारतामध्ये आरोग्य विम्यामध्ये अल्युरियन प्रोग्रामची अंशतः रीएम्बर्समेंट मिळते, त्यामुळे लाखो लोक याचा लाभ घेऊ शकतात. ५० पेक्षा जास्त देशांमधील १००००० पेक्षा जास्त रुग्णांवर अल्युरियन स्वॉलोबल कॅप्स्यूलने उपचार करण्यात आले आहेत. अल्युरियनमुळे वजन कमी होते, वजन कायम राखले जाते आणि टाईप२ मधुमेहापासून सुटका मिळते.3 |
फक्त डाएटिंग करून ज्यांना आपली वजन कमी करण्याची उद्दिष्ट्ये गाठता येणे शक्य नाही किंवा शरीरावर चिरा देऊन केली जाणारी सर्जरी किंवा एन्डोस्कोपी करणे ज्यांना शक्य नाही किंवा तशी इच्छा नाही अशा लोकांसाठी अल्युरियन प्रोग्राम योग्य आहे.* वजन वाढण्याशी संबंधित सह्व्याधी, जसे, मधुमेह, वंध्यत्व किंवा हृदय विकार यासारख्या आजारांवरील उपचार म्हणून देखील हा प्रोग्राम योग्य ठरतो.
अवघ्या १५ मिनिटांच्या क्लिनिक व्हिजिटमध्ये रुग्ण अल्युरियन स्वॉलोबल कॅप्स्यूल गिळू शकतो/शकते. ही एक सुरक्षित आणि तात्पुरती वेगन कॅप्स्यूल असते ज्यामध्ये एक डिफ्लेटेड गॅस्ट्रिक बलून असतो. ही कॅप्स्यूल पोटात पोहोचल्यावर प्रोफेशनल कॅथेटरच्या साहाय्याने ५५० मिली लिक्विड वापरून बलून फुगवतो. यासाठी कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया, एन्डोस्कोपी किंवा ऍनेस्थेशिया यांची आवश्यकता नसते. बलून योग्य स्थितीत आहे याची खात्री करून घेण्यासाठी फक्त एक साधा एक्सरे करावा लागतो. जवळपास एका ईडलिंबूच्या आकाराचा हा बलून रुग्णाच्या पोटातील जागा व्यापतो, पोट भरल्याची भावना निर्माण होते आणि खाण्याचे प्रमाण कमी होते. हा बलून भुकेची भावना कमी करतो आणि जवळपास १६ आठवड्यांमध्ये त्याचा फुगवटा आपोआप कमी होतो व बलून शरीरातून नैसर्गिक पद्धतीने बाहेर पडतो.
अल्युरियन एक जागतिक पातळीवरील ब्रँड असून ५८ पेक्षा जास्त देशांमध्ये पोहोचला आहे. अल्युरियन प्रोग्राममार्फत १,००,००० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत आणि जगभरातील ६०० क्लीनिक्सच्या सहयोगाने या प्रोग्रामच्या वापरामुळे सर्व अल्युरियन रुग्णांनी मिळून १० लाख किलोंपेक्षा जास्त वजन कमी केले आहे.
अल्युरियनचे संस्थापक व सीईओ डॉ. शंतनू गौड यांनी सांगितले, “मी भारतीय वंशाचा असल्यामुळे अल्युरियनसाठी भारताचे महत्त्व निश्चितच विशेष आहे. स्थूलपणा आणि मधुमेहाची समस्या संपुष्टात आणण्यात मदत करण्यासाठी आमचे क्रांतिकारी तंत्रज्ञान भारतात आणणे हा माझ्या व्यक्तिगत मिशनचा एक भाग आहे. अनेकांना वेगवेगळ्या कारणांमुळे वजन कमी करण्याची निकड भासत असते, लग्नाची तारीख जवळ येत असते किंवा व्यस्त व ताणतणावांनी भरलेल्या जीवनशैलीमुळे वजन वाढलेले असते किंवा नुकताच काहीतरी आजार होऊन गेलेला असतो किंवा मूल व्हावेसे वाटत असते किंवा एखाद्या ऑपरेशनच्या आधी वजन कमी करणे गरजेचे असते, अशा अनेक प्रश्नांचे एकच उत्तर अल्युरियन प्रोग्राम आहे. भारतातील लाखो रुग्णांसाठी हा प्रोग्राम उपयुक्त ठरू शकतो.”
अल्युरियन्स व्हर्च्युअल केयर सूट हा अल्युरियन प्रोग्राममधील महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये अल्युरियन मोबाईल ऍप, कनेक्टेड स्केल आणि हेल्थ ट्रॅकर या सर्वांना एकाच “डिजिटल छत्राखाली” एकत्र आणण्यात आले आहे. रुग्णापासून दूर असताना देखील त्याच्या/तिच्या तब्येतीवर लक्ष ठेवता येणे, टेलिहेल्थ आणि केयर टीमसोबत सुरक्षितपणे मेसेजिंग करता येणे अशा सुविधा यामुळे मिळतात. केयर टीम्सना रुग्णांसोबत संपर्क साधता यावा आणि त्यांचा डेटा सुरक्षितपणे पाहता यावा यासाठी या सॉफ्टवेयर प्लॅटफॉर्ममध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आला आहे.
फक्त डाएट किंवा व्यायाम यांच्या तुलनेने अल्युरियन प्रोग्राममुळे २.५ पट जास्त प्रमाणात वजन कमी केले जाऊ शकते. महत्त्वाची बाब म्हणजे, हा प्रोग्राम रुग्णांना त्यांच्या जीवनशैलीमध्ये बदल घडवून आणण्यात मदत करतो, असे बदल जे बलून शरीरातून निघून गेल्यानंतर देखील कायम राहतात.
मोहक बॅरिऍट्रिक्सचे डॉ मोहित भंडारी हे बॅरियाट्रिक व एन्डोस्कोपिक वेट-लॉस सर्जन आहेत आणि त्यांनी भारतामध्ये अल्युरियन प्रोग्राम सादर करण्यात पुढाकार घेतला आहे. ते म्हणतात, “शहरी भारतीयांमध्ये दर चारपैकी तीन व्यक्ती स्थूल आहेत, देशात स्थूलपणा वाढत आहे. एशिया पॅसिफिक क्षेत्रातील एक सर्वात अनुभवी बॅरियाट्रिक सर्जन म्हणून मी आजवर १७,००० बॅरियाट्रिक सर्जरीज् केल्या आहेत, मी असे मानतो की वजन व्यवस्थापन या प्रक्रियेला नावे ठेवण्यापेक्षा अतिशय सर्वसामान्यपणे त्याकडे पाहिले गेले पाहिजे आणि अल्युरियन प्रोग्राम हे त्या दिशेने उचलले गेलेले एक सकारात्मक पाऊल आहे.”
अल्युरियनचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि संस्थापक भागीदार डॉ. राम छुट्टानी म्हणाले, “रुग्णांना श्रेणीतील सर्वोत्तम अनुभव प्रदान करणे आणि त्यांची सुरक्षितता अबाधित राखणे याला आम्ही सर्वात जास्त प्राधान्य देतो. अल्युरियन प्रोग्रामचे गुण आणि सुरक्षा संशोधनांमधून सिद्ध झाले आहेत,4 हा प्रोग्राम रुग्णांना त्यांचे सरासरी १० ते १५% वजन जवळपास १६ आठवड्यांमध्ये कमी करण्यात मदत करतो.” 1
अल्युरियनचे मुख्य वाणिज्यिक अधिकारी श्री. बेनोआ चार्डोन यांनी सांगितले, “अल्युरियन प्रोग्राममधून प्रदान केले जाणारे लाभ आणि रुग्णांच्या अपेक्षा यांच्यातील उत्तम मिलापाचा परिणाम म्हणून अल्युरियनला सर्व बाजारपेठांमध्ये मिळत असलेले यश आणि दुसरीकडे भारतात स्थूलपणाचे वाढते प्रमाण यामुळे या देशात आमच्या प्रोग्रामला चांगले यश मिळेल याची आम्हाला खात्री आहे.”