मुंबई ९ सप्टेंबर २०२२: आज मुंबईत असोचेम द्वारे बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कर्ज देणाऱ्या कंपन्यांच्या १७ व्या राष्ट्रीय शिखर परिषद आणि पुरस्कार सोहळ्यात युनियन बँक ऑफ इंडियाला मोठ्या बँकांच्या या खालील तीन श्रेणींमध्ये विजेते म्हणून घोषित करण्यात आले:
१. ओव्हरऑल चॅम्पियन
२. कर्ज देणे
३. कर्ज न देणे
असोचेम च्या १७ व्या राष्ट्रीय शिखर परिषदेत बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कर्ज कंपन्यांसाठीचा पुरस्कार हा समावेशक वाढ आणि शाश्वत विकासाचे मॉडेल ओळखण्याचा, पुरस्कृत करण्याचा आणि साजरा करण्याचा एक मार्ग आहे तसेच समाज आणि व्यवसायासाठी एकत्र मूल्य निर्माण करणारा नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आहे.