मुंबई/नवी दिल्ली, 06 सप्टेंबर, 2022: विशेष पाईप निर्माता, स्वस्तिक पाईप्स लिमिटेडच्या वतीने आज एनएसई इमर्जकडून प्रारंभीक सार्वजनिक प्रस्तावाला (इनिशियल पब्लिक ऑफर-आयपीओ) मंजुरी मिळाल्याची घोषणा झाली. अलीकडेच एनएसई इमर्जकरिता ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टची नोंदणी करण्यात आली. या प्रस्तावच्या आकारमानात बुक-बिल्डिंग प्रक्रियेमार्फत प्रत्येकी ₹ 10/- दर्शनी मूल्याचे पूर्ण पेड अप समभागाच्या 62.51 लाख इक्विटी समभागाचा समावेश राहील.
प्रारंभीक सार्वजनिक प्रस्तावाद्वारे 62.51 लाख समभाग जारी करण्याची कंपनीची योजना आहे. या प्रस्तावाच्या जवळपास 40 टक्के क्यूआयबी आरक्षित राहतील, तर सुमारे 20 टक्के एचएनआय आणि 35 टक्के रिटेल गुंतवणुकदारांसाठी असेल. कंपनीच्या वतीने कॉर्पोरेट कॅपिटल व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेडला प्रस्तावाचा लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर स्कायलाईन फायनान्शियल सर्विस प्रायव्हेट लिमिटेडला प्रस्तावाचा रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले.
संदीप बन्सल, अनुपमा बन्सल, शाश्वत बन्सल आणि गीता देवी अगरवाल हे स्वस्तिक पाईप्सचे प्रवर्तक आहेत. ही कंपनी टी. टी. स्वस्तिक बॅन्ड हाय क्वालिटी मिड स्टील/कार्बन स्टील ईआरडब्ल्यू ब्लॅक गॅलव्हनाईज्ड पाईप्स/ट्यूब्जचे 1973 पासून अग्रेसर निर्माता आणि निर्यातक आहे. त्यांचे मासिक 20,000 मेगाटन निर्मिती क्षमता असलेले अत्याधुनिक स्वरूपाचे दोन निर्मिती प्रकल्प हरियाणा आणि उत्तर प्रदेशात आहेत. मागील काही वर्षांपासून कंपनी सोलार मोडयूल माऊंटींग स्ट्रक्चर, स्टील ट्यूब्यूलर पोल्स, जीआय स्ट्रक्चर ऑफ रूरल इलेक्ट्रीफिकेशन इत्यादीच्या वैविध्यपूर्ण निर्मितीत सक्रिय आहे.
त्यांच्या प्रमुख ग्राहकांत रिलायन्स इंडस्ट्रीज, भेल (BHEL), कोल इंडिया, डीएमआरसी, ईआयएल, हिंदुस्तान झिंक, एलअँडटी, नालको, एनटीपीसी, एबीबी लिमिटेडचा समावेश आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण ग्राहक युएसए, युके, युएई, ऑस्ट्रेलिया, कतार, जर्मनी, बेल्जियम, मॉरिशियस, इथिओपीआ आणि कुवेत अशा अनेक देशांत आहेत. मार्च 2022 संपलेल्या आर्थिक वर्षासाठी कंपनीची उलाढाल रू. * कोटी आणि वजावटीपूर्वीचा लाभ रू. * कोटींच्या घरात नोंदवण्यात आला.
मीडियासंबंधी चौकशीकरिता संपर्क साधा