दिनांक 05/09/22 ला. दादर मधल्या BFL FITNESS INSTITUTE यांनी FITNESS जगतातील नामवंत शिक्षकांचा सत्कार करुन जागतीक शिक्षक दिन साजरा केला.
व्यायामशाळेत आणि विविध खेळांमध्ये लागणारे Fitness Trainers घडवण्याची जबाबदारी ह्या शिक्षकांवर असते, त्यांची अभ्यासु आणि प्रयोगशील वृत्तीच त्यांचा विद्यार्थी trainersना तयार करत असते. अश्या महत्त्वाचा fitness जगतात उत्तमोत्तम Trainers खेळाडु, तसेच सामान्य लोकांना निरोगी सुदृढ ठेवण्याची जबाबदारी असलेले trainers तयार करणे आणि विविधप्रकारे भारतिय Fitness जगताचा दर्जा वाढवण्याचे काम हे शिक्षक करत असतात. त्यांचा ह्या महत्त्वाच्या योगदानाला दाद म्हणनु वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या शिक्षकांचा सन्मान BFL FITNESS instistute ने केला.
डाॅ. धनंजय मोरे, श्रीमती श्वेता बसिन, डाॅ. ब्रिजेश पांडे, श्रीमती माधुरी रुईया, Strongest Man मनोज मोरे, D.Y Patil BSc Sports चे कौस्तुभ शेडजाळे, बास्केटबाॅल कोच श्री. केविन लालु, सलिम पटेल, युध्यकला मास्टर सेलवान तमिळ आणि इतर अनेक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
BFL Fitness Institute ही संपूर्ण वैज्ञानिक अनुषंगाने प्रशिक्षण देणारी संस्था आहे. Certified Personal TrainerStrength & Conditioning Course, Nutritionist Course आणि योग शिक्षकाचे course BFL Fitness Institute मध्ये आहेत.
BFL Fitness Institute चे संस्थापक आणि सर्वेसर्वा श्री. बीन्नी श्रीधरन संबोधन करताना म्हणाले “Sports & Fitness जगतातील अनामवीर आणि पडद्या मागच्या प्रतिभावंतांना नेहमीच श्रेय दिले गेले पाहिजे”. अशाच प्रतीभावंतांना एकत्र आणुन वैज्ञानिक दृष्टीकोन ठेऊन भारतिय Fitness जगताचा दर्जा वाढवत जाण्याच्या उद्दीष्टांनी BFL Fitness Institute कार्यरत आहे.