• हे स्वदेशी बनावटीचे कनेक्टेड बेड एकात्मिक सातत्यपूर्ण जीवनावश्यक निरीक्षणासह असून रूग्णांची सुरक्षा, काळजी कार्यक्षमता आणि क्लिनिकल परिणाम मोठ्या प्रमाणात सुधारतात
• इंटेलिजेंट कनेक्टेड बेड ही एक अब्ज भारतीयांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी जागतिक दर्जाची कनेक्टेड आरोग्य सेवा यंत्रणा तयार करण्याच्या भारताच्या प्रवासातील सर्वात महत्त्वपूर्ण यश आहे.
भारत, २०२२: भारतातील पहिली कॉन्टॅक्टलेस रिमोट पेशंट मॉनिटरिंग (RPM) कंपनी डोझी आणि दक्षिण आशियातील हॉस्पिटल बेड्स आणि संबंधित फर्निचरची सर्वात मोठे उत्पादक मिडमार्क इंडिया हे देशामध्ये सखोल स्थान मिळवत प्रामुख्याने नॉन आयसीयू वातावरणासाठी रुग्णालयातील खाटांमध्ये रुग्णांचे निरीक्षण स्वयंचलित आणि एकत्रित करण्यासाठी भारतातील पहिले कनेक्टेड बेड प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी एकत्र आले आहेत. हे खास अभियांत्रिकी केलेले इंटेलिजेंट कनेक्टेड बेड्स हॉस्पिटल्सना एचडीयू, स्टेप-डाउन आयसीयू आणि इतर कोणत्याही नॉन- आयसीयू वॉर्डमध्ये अखंडपणे रुग्णांच्या तब्बेतीवर लक्ष ठेवण्यास सक्षम करतील. त्यामुळे कार्यात्मक क्षमता आणि डिजिटल परिवर्तन याद्वारे रुग्णांची सुरक्षा वाढेल आणि सुधारित वैद्यकीय परिणाम दिसून येतील.
अभ्यासातून असे दिसून आले आहे की नॉन आयसीयू वातावरणात सतत देखरेख केल्याने रुग्णाची अधिक चांगली काळजी घेता येते आणि वेळेवर वैद्यकीय हस्तक्षेप आणि मदत पुरविण्यामध्ये स्पष्ट परिणाम दिसून येतो. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान डोझीचे एम्बेडिंग अत्याधुनिक कॉन्टॅक्टलेस सेन्सर्स आणि एआय समर्थित अल्गोरिदम आणि मिडमार्कच्या हॉस्पिटल बेड प्लॅटफॉर्मसह जागतिक गुणवत्ता मानकांचे पालन करण्याचा परिणाम आहे.
रूग्णालयातील रूग्ण रूग्णालयातील बेडवर बराच वेळ घालवतो. त्यामुळे क्लाउड-सक्षम एआय समर्थित अल्गोरिदमसह अत्याधुनिक कस्टम सेन्सर अचूकपणे एकत्रित करू शकणारे हॉस्पिटल बेड डिझाइन करणे ही रुग्णांचे देखभाल निरीक्षण डिजिटली करण्याची आणि स्वयंचलनाची सर्वात कार्यक्षम आणि प्रभावी पद्धत आहे. क्लाउड-सक्षम एआय आणि अर्ली वॉर्निंग सिस्टीम (EWS) सह समर्थित डोझीच्या पेटंट कॉन्टॅक्टलेस सेन्सर्ससह मिडमार्कचे उत्कृष्ट डिझाइन विचार भारतातील अत्याधुनिक कनेक्टेड रुग्णालयांना शक्ती देण्यासाठी आधारस्तंभ ठरेल.
हा इंटेलीजंट कनेक्टेड बेड हृदयाचे ठोके, श्वसन दर, रक्तदाब, ऑक्सिजन संपृक्तता, ईसीजी आणि तापमान यासारख्या महत्त्वाच्या घटकांचे निरीक्षण करू शकतो. हे बेड अर्ली वॉर्निंग सिस्टम (EWS) देखील पुरवितात. त्यामुळे संबंधित आरोग्य सेवा पुरविणाऱ्याना वेळेवर हस्तक्षेप करण्यासाठीची सूचना मिळते. ही महत्वाची माहिती आरोग्यसेवा व्यावसायिकांना डेटा समर्थित, जलद वैद्यकीय निर्णय घेण्यास मदत करू शकते. पुढे हे कनेक्टेड बेड सेंट्रल कमांड सेंटर्स आणि हॉस्पिटलच्या हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम (HMIS) मध्ये एकत्रित केले आहेत.
संपूर्ण हॉस्पिटल परिसंस्थेमध्ये अखंडपणे एकात्मिक होणाऱ्या कनेक्टेड हॉस्पिटल बेडचे फायदे अनेक पटींनी आहेत. रूग्ण निरीक्षण सेन्सर्स थेट बेडमध्ये एम्बेड केलेले असल्यामुळे कनेक्टेड बेड रूग्णांच्या हालचालींना रूग्णालयात अत्यंत कार्यक्षम बनवतात.
डोझीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मुदित दंडवते म्हणाले, “आमचे तंत्रज्ञान मिडमार्कच्या हॉस्पिटल बेड पोर्टफोलिओशी एकत्रित करून आम्ही अत्याधुनिक कनेक्टेड बेड तयार केले आहेत. हे बेड रुग्णालयांना अखंड प्लग-अँड-प्ले अनुभव देण्यास सक्षम करून आपल्या रूग्णांना महत्वपूर्ण जागतिक दर्जाचा अनुभव सादर करतात. त्यायोगे भारताला जागतिक कनेक्टेड आरोग्य नकाशावर आणून दर्जेदार आरोग्यसेवा देण्याच्या पद्धतीत आम्ही निश्चितपणे लक्षणीय बदल पाहणार आहोत.”
मिडमार्क इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुमीत अग्रवाल म्हणाले, “एक निश्चित उद्देश लक्षात घेऊन रचना केलेल्या डिझाइनद्वारे अधिक चांगली काळजी घेतली जाते. मिडमार्क इंडिया सात दशकांहून अधिक काळापासून भारतात खोलवर रुजलेली आहे आणि आरोग्य सेवा वितरण प्रश्न त्यांनी चांगल्या प्रकारे समजून घेतले आहेत. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि सर्वांसाठी सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवेचा अनुभव देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. डोझीच्या सहकार्याने इंटेलिजेंट बेड प्लॅटफॉर्मचा विकास हा या वचनबद्धतेचा परिणाम आहे. आमचा ठाम विश्वास आहे की कनेक्टेड केअर हे उद्याचे भविष्य आहे. त्यामुळे केवळ संपर्क आणि कार्यक्षमता सुधारेल एवढेच नाही तर परिणामांवरही प्रभाव पडेल. आम्ही डिजिटल परिवर्तनाचा भाग बनण्यास उत्सुक आहोत.”
डोझीला अलीकडेच डिसेंबर २०२१ मध्ये त्याच्या गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीसाठी (QMS) इंटरटेककडून ISO 13485:2016 प्रमाणपत्र मिळाले आहे. हे प्रमाणपत्र ISO/IEC 27001:2013, माहिती सुरक्षा व्यवस्थापन सह गुणवत्ता प्रवासाचा एक भाग आहे.