जीएसपी एसएल आर 525 एसई म्हणून उपलब्ध असलेल्या पायरीप्रॉक्सिफेन आणि डायाफेन्थ्यूरॉनच्या सिनर्जिस्टिक सस्पो इमल्शन सुत्रीकरण बनवणारी भारतातील पहिली कृषि-रासायनिक कंपनी.
राष्ट्रीय, 5 सप्टेंबर 2022: जीएसपी क्रॉप सायन्स या कृषि-रासायनिक व्यवसायातील एक अग्रणी कंपनी असून, तिने त्याच्या आरअँडडी केंद्रात भारतातील पहिले एसई सुत्रीकरण बनवले असून, तिला औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाच्या अंतर्गत एक उपविभाग असलेल्या, कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट्स, डिझाईन्स अँड ट्रेडमार्क्सच्या कार्यालयाद्वारा त्याच्या पायरीप्रॉक्सिफेन आणि डायाफेन्थ्यूरॉनच्या सिनर्जिस्टिक सस्पो इमल्शन सुत्रीकरणासाठी (जीएसपी एसएलआर 525 एसई सुत्रीकरण म्हणून ब्रँड असलेले) एक विशेष पेटंट मिळाले आहे.
एका महत्त्वाच्या संपादनात, कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट्स आणि डिझाईन्सने जीएसपी क्रॉप सायन्सच्या नावाने त्याच्या कीटकनाशक सुत्रीकरणासाठी एक आदेश जारी केला, जे देशातील पांढऱ्या माश्यांच्या घातक परिणामांवर नियंत्रण आणू शकत होते. जीएसपी क्रॉप सायन्स भारतात स्थानिक पातळीवर डायाफेन्थ्यूरॉन टेक्निकलचे उत्पादन करणारी पहिली भारतीय कृषि-रासायनिक कंपनी आहे. तसेच, जीएसपी एका एसई सुत्रीकरणात डायाफेन्थ्यूरॉन + पायरीप्रॉक्सिफेनचे विशेष संयोजन बनवणारी देखील पहिलीच कंपनी आहे.
पांढऱ्या माश्या कृषि संवर्धन, फलोत्पादन आणि वनीकरण पीक वनस्पतींमधील उत्पन्नाच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हानीसाठी कारणीभूत असल्याकारणाने, त्या देशाच्या कृषि क्षेत्रासाठी एक मोठी समस्या बनल्या आहेत. सांख्यिकीनुसार, भारतातील सुमारे 1.35 हेक्टर क्षेत्रातील नारळ आणि तेल पाम पांढऱ्या माश्यांमुळे क्षतिग्रस्त झाले. तसेच, कापूस कापणीवर प्रक्रिया करण्याच्या शेतांच्या क्षमतेत ते गंभीरपणे अडथळा आणते.
जीएसपीचे नावे कीटकनाशक सुत्रीकरण एसएलआर 525 एसई शेतकऱ्यांदरम्यान एक विश्वसनीय ब्रँड आहे आणि घातक अशा पांढऱ्या माश्यांच्या नियंत्रणासाठी पहिली निवड आहे. हे कापसाचा नाश करणाऱ्या घातक अशा पांढऱ्या माश्यांच्या जीवनातील सर्व टप्प्यांवर नियंत्रण आणते आणि परिणामकारकपणे हाताळते. हे त्याच्या जलद आणि एकसमान पसरण्याच्या आणि ट्रान्सलमिनर कृतिमुळे रोपाच्या पृष्ठभागावर परिणामकारक ठरते. हे एक पाण्यातील द्रावण असल्याने, ईसी सुत्रीकरणात वापरल्या जाणाऱ्या सॉल्वेंट्सचे पर्यावरणावर होणारे हानिकारक परिणाम दूर करते.
जीएसपी क्रॉप सायन्स प्रा. लि., भारतातील अग्रगण्य कृषि-रसायनांच्या उत्पादकांपैकी एक आहे. हे भारतीय कृषि आणि शेतकरी समुदायासाठी कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके (पीक संरक्षण उपाय) आणि वनस्पती नियामकांची “तांत्रिक” आणि “सुत्रीकरणाची” एक व्यापक श्रेणीचे उत्पादन करते.
या पेटंटच्या उपलब्धीवर, जीएसपी क्रॉप सायन्स प्रा. लि.चे मनेजिंग डायरेक्टर, “भावेश शाह म्हणाले,आमच्या आरअँडडी आणि कायदेशीर टीमच्या मदतीने सुमारे आठ वर्षे रक्त, घाम आणि अश्रू गाळल्यानंतर, जीएसपीला उत्पादनाच्या एका संयोजनासाठी पेटंट देण्यात आले, जे शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. आमचे उत्पादन एसएलआर 525 जे भाज्या आणि कापसावरील पांढऱ्या माशीच्या हल्ल्याशी सर्व टप्प्यांवर लढण्यास मदत करते – हे भारतीय बाजारपेठेतील अशा प्रकारचे पहिलेच आहे. आम्ही येत्या काही वर्षात या रेणूद्वारा जवळपास रु. 400 कोटींचा वार्षिक महसूल निर्माण करण्याचे उद्दिष्ट राखतो. या उत्पादनाची बाजारपेठ आणखी वाढेल अशी आमची अपेक्षा आहे.”
तथापि, एक विशेष पेटंट मिळवणे जीएसपी क्रॉप सायन्ससाठी कठीण होते. जीएसपीने “पायरीप्रॉक्सिफेन 5% आणि डायाफेन्थ्यूरॉन 25%च्या सिनर्जिस्टिक सस्पो इमल्शन सुत्रीकरण” वर 27 जानेवारी 2014 रोजी तात्पुरता पेटंट अर्ज क्र. 284/मुम/2014 दाखल केले होते, ज्यानंतर सुत्रीकरण आणि जैव-गुणकारिता डेटासह डिसेंबर 2014 मध्ये त्याचेच संपूर्ण तपशील (सुत्रीकरण, विषारीपणा आणि जैव-गुणकारिता) दाखल केले. यासाठी सुत्रीकरणाच्या विकासाचे कार्य वर्ष 2015 मध्ये सुरु झाले आणि जून 2017 मध्ये 9(3) च्या अंतर्गत नोंदणीसाठी सीआयबीकडे दाखल करण्यात आले होते. या सुत्रीकरणासाठी ऑगस्ट 2018 मध्ये 9(3)च्या अंतर्गत सीआयबी मंजुरी मिळाली.
अपेक्षेनुसार, विविध प्रतिस्पर्ध्यांद्वारा सात मंजुरी-पूर्व विरोध सादर करण्यात आले होते. पुढे, एक माघारी घेण्यात आले आणि उरलेल्या सहा जणांचे ऐकण्यात आले आणि दिल्ली येथील पेटंट कार्यालयात सप्टेंबर 2021 मध्ये कंट्रोलरसमोर युक्तिवाद करण्यात आला. 8 एप्रिल 2022 रोजी, अखेरीस क्र. 394568 असलेले पेटंट मंजूर करण्यात आले, जे दरवर्षी वेळेवर नूतनीकरण शुल्क भरण्याच्या अटीवर, दाखल करण्याच्या (27/1/2014) तारखेपासून 20 वर्षांपर्यंत वैध राहील.
एप्रिल 2022 मध्ये, एका प्रतिस्पर्ध्याने पेटंट चुकीच्या मार्गे देण्यात आले या आधारावर जीएसपीच्या पेटंटच्या समोर दिल्ली उच्च न्यायालयात हे प्रकरण नेले. माननीय न्यायाधीशांसमोर या प्रकरणावर युक्तिवाद करण्यात आला आणि शेवटी पेटंट इन-पार्ट परत पेटंट ऑफिसमध्ये परत गेल्यावर, केवळ मंजुरी-पूर्व विरोधाच्या वेळी युक्तिवाद केलेल्या अंतिम मंजुरी आदेशात तीन गहाळ मुद्द्यांवर टिप्पण्या मागवल्या गेल्या (न्यायाधीशांनी पुनर्विचाराचा कोणताही आग्रह धरला नव्हता). अखेर 25 ऑगस्ट 2022 रोजी, कंट्रोलरने नवीन मंजुरी आदेश जारी केला,ज्यात पूर्वीच्या मंजुरीची यथास्थिती कायम ठेवण्यात आली.
भावेश शाह असे मानतात की जीएसपी क्रॉप सायन्स आर्थिक वर्ष 22-23 मध्ये या पांढऱ्या माशीच्या व्यवसायात त्याच्या बाजारपेठेच्या हिश्श्याला मोठ्या प्रमाणात वाढवू शकते. ते म्हणाले, “यामुळे आम्हीया अद्वितीय सुत्रीकरणासाठी मिळालेल्या विशेष पेटंटच्या मंजुरीसह जीएसपीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त असलेल्या तांत्रिक कल्पकता आणण्याच्या क्षमतेच्या सामर्थ्याचे प्रात्यक्षिक दाखवू शकतो, आणि तसेच हे पेटंट असलेले उत्पादन विशेष रूपाने उपलब्ध करण्यासाठी एक खास वितरण वाहिनी उभारण्यासाठी एक मजबूत पुढाकार देखील उपलब्ध झाला आहे, ज्यामुळे आमच्या वितरण प्रणालीचा विस्तार करत आणि एका व्यापक स्तरावर आमच्या पोर्टफोलिओ स्वीकृतीस मजबूत करण्याची संधी मिळाली आहे.”
1200 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असणारी आणि गुजरात, आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये चार उत्पादन केंद्रे असणारी जीएसपी क्रॉप सायन्सची 70 पेक्षा जास्त ब्रँडेड उत्पादने आहेत , ज्यांचे भारतात 5,000 वितरक, 30,000 पेक्षा विक्रेते आणि 34 डेपोंच्या नेटवर्कद्वारा विपणन केले जाते आणि 25 देशांना निर्यात केले जाते.