आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवा’ ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी प्रदर्शनाच्या ५-६ दिवस आधीच तिकीट खिडकी उघडली आहे. ‘ब्रह्मास्त्र’चे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले असून सुरुवातीचे आकडे पाहता या चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळू शकते, असा अंदाज आहे.
ब्रह्मास्त्र’ ची आगाऊ तिकिट विक्री शुक्रवार, २ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे आणि सुरुवातीची आकडेवारी ही चित्रपट निर्मात्यांसाठी नवीन आशा वाढवणारी आहे. ‘ब्रह्मास्त्र’ची आतापर्यंत ११ हजारांपेक्षा जास्त तिकिटे विकली गेल्याचे सांगण्यात येत आहे. हे आकडे पाहता बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची चांगली सुरुवात होऊ शकते, असे मार्केटिंगमधील जाणकारांचे म्हणणे आहे.‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट हिंदीसह दक्षिणेच्या अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणारा बिग बजेट चित्रपट आहे, ज्यामध्ये आलिया-रणबीर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर रोमान्स करणार आहेत. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले आहे. त्यामुळे कमाईच्या बाबतीत हा चित्रपट आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ला मागे टाकतो का याची सर्वांना उत्सुकता आहे.
‘