शिक्षण हा सर्वांचा मूलभूत अधिकार आहे. आणि त्यामुळेच आपल्या देशात सर्व शिक्षण अभियान राबवले जातात. या अंतर्गत मुलांना मोफत शिक्षण देणे आणि काही सुविधा देखील पुरवल्या जातात. प्राथमिक शाळांचा दर्जा उंच व्हावा यासाठी अनेक प्रयत्न, अनेक उपक्रम राबवले जातात. त्यामुळे प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना पोषक आहार देखील पुरवला जातो. मात्र प्राथमिक शाळेत पुरवला जाणारा हा पोषक आहार खरच आपल्या आरोग्यास पोषक आहे का ? हे तपासणं फार महत्त्वाचे आहे.
कारण असाच एका प्राथमिक शाळेतून धक्कादायक प्रकार समोर आलाय. गोंदिया जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अंजोरा येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून पुरवल्या जाणाऱ्या अन्नामध्ये भातात चक्क आळ्या आणि सोंडे असल्याचे आढळून आले. ही बाब विद्यार्थ्यांच्या लक्षात येताच विद्यार्थ्यांनी अन्न बाहेर टाकलं.
मात्र या पोषण आहारामध्ये जर आळ्या, सोंडे निघत असेल तर या विद्यार्थ्यांच्या जीवितला खूप मोठा धोका निर्माण होत आहे. शाळेतील शिक्षकांच्या देखरेखी खाली भोजन शिजवले जातात मात्र या ठिकाणच्या शिक्षकांनी लक्ष दिलं नाही का ? असा सवाल देखील उपस्थित राहतो मधल्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना भोजन वाटप करण्यात आलं मात्र या शिजवलेल्या भोजनात अळ्या निघाल्याने विद्यार्थ्यांनी हे अन्न बाहेर टाकून दिला आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना यापासून विषबाधा होणं किंवा त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होणे टळलं.