· प्रत्येकी रु. १,००० /- च्या दर्शनी मूल्याचे (“फेस व्हॅल्यू”) सुरक्षित एनसीडी.
· एनसीडी विक्रीमध्ये ५० कोटी रुपयांच्या बेस इश्यू साइजचा समावेश आहे, ज्यात रु. ५० कोटींपर्यंतओव्हरसबस्क्रिप्शन कायम ठेवण्याचा पर्याय आहे, म्हणजे एकूण मूल्य रु. १०० कोटींपर्यंत.
· क्रिसिल रेटिंग्ज लिमिटेडद्वारे क्रिसिल ए-/स्थिर आणि ॲक्युइट रेटिंग्ज अँड रिसर्च लिमिटेडद्वारे ॲक्युइट ए+/स्थिर असे रेटिंग दिले आहे.
· प्रभावी वार्षिक उत्पन्न प्रतिवर्ष ११.०१% पर्यंत.#
· विक्री ०५ सप्टेंबर २०२२ रोजी खुली होणार असून २२ सप्टेंबर २०२२ रोजी बंद होईल*
· एनसीडीज बीएसई आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (‘एनएसई’) (एकत्रितपणे, “शेअर बाजार”) वर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.
मुंबई, सप्टेंबर २०२२: कर्ज देण्याच्या व्यवसायात कार्यरत असलेल्या आणि भारतातील एमएसएमई क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणाऱ्या यू ग्रो कॅपिटल लिमिटेड, एनबीएफसीने प्रत्येकी रु. १,०००/- दर्शनी मूल्याच्या रेटेड, सुरक्षित, वरिष्ठ, सूचीबद्ध, हस्तांतरणीय, रिडीम करता येणाऱ्या अपरिवर्तनीय कर्जरोख्यांची (नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स) विक्री करण्याची घोषणा केली आहे. ही विक्री ०५ सप्टेंबर २०२२ रोजी खुली होईल आणि २२ सप्टेंबर २०२२ रोजी बंद होईल.
या विक्रीचा बेस इश्यू आकार ५० कोटी रुपये आहे, ज्यात ५० कोटी रुपयांपर्यंत ओव्हरसबस्क्रिप्शन कायम ठेवण्याचा पर्याय आहे, म्हणजे हा एकूण रु. १०० कोटीपर्यंत आहे. एनसीडी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे आणि एनएसई हा या विक्रीसाठी नियुक्त केलेला शेअर बाजार आहे. एनसीडीला क्रिसिल रेटिंग्ज लिमिटेडने क्रिसिल ए-/स्थिर आणि ॲक्युइट रेटिंग्ज अँड रिसर्च लिमिटेडने ॲक्युइट ए+/स्थिर असे रेटिंग दिले आहे.
या इश्यूचा कार्यकाळ I, II, III या मालिकेसह सुरक्षित एनसीडीजसाठी १८ महिने, २७ महिने आणि ३६ महिने इतका आहे. श्रेणी I (संस्थात्मक गुंतवणूकदार), श्रेणी II (बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदार) श्रेणी III (एचएनआय गुंतवणूकदार) आणि श्रेणी IV (किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदार) यांमधील एनसीडी धारकांसाठी प्रभावी उत्पन्न (वार्षिक) १०.५२% ते ११.०१% पर्यंत आहे. व्याज पेमेंट पद्धती त्रैमासिक आणि मासिक आहेत. श्रेणी I, II, III आणि IV मधील एनसीडी धारकांसाठी मॅच्युरिटीनंतरची रक्कम १०००/- रुपये आहे.
या विक्रीतून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा उपयोग पुढील कर्जपुरवठा, विद्यमान कर्जांच्या व्याजाची आणि मुद्दलाची परतफेड आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी केला जाईल.
३० जून २०२२ पर्यंत, वित्तीय स्टेटमेंट्सनुसार त्याचा सीआरएआर २७.९३% इतका होता.
The terms of each series of Secured NCDs, offered under Issue are set out below:
Series | I | II | III * |
Frequency of Interest Payment | Quarterly | Quarterly | Monthly |
Minimum Application | ₹ 10,000 (10 NCDs) across all Series | ||
Face Value/ Issue Price of NCDs (₹/ NCD) | 1,000/- | 1,000/- | 1,000/- |
In Multiples of thereafter (₹) | ₹ 1000/- (1 NCD) | ||
Tenor | 18 Months | 27 Months | 36 Months |
Coupon (% per annum) for NCD Holders in Category I, II, III | 10.15% | 10.35% | 10.50% |
Effective Yield (per annum) for NCD Holders in Category I, II, III & IV | 10.52% | 10.74% | 11.01% |
Mode of Interest Payment | Through various modes available | ||
Amount (₹ / NCD) on Maturity for NCD Holders in Category I, II, III & IV | 1,000/- | 1,000/- | 1,000/- |
Maturity / Redemption Date (Months from the Deemed Date of Allotment) | Date occurring on expiry of 18 (Eighteen) months from the Deemed Date of Allotment | Date occurring on expiry of 27 (Twenty Seven) months from the Deemed Date of Allotment | Date occurring on expiry of 36 (Thirty Six) months from the Deemed Date of Allotment |
Put and Call Option | NA | NA | NA |
* Company shall allocate and allot Series III NCDs wherein the Applicants have not indicated the choice of the relevant NCD Series.
संडे कॅपिटल ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि टिप्सन्स कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे या विक्रीचे लीड मॅनेजर्स आहेत; लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे रजिस्ट्रार आहेत आणि आयडीबीआय ट्रस्टीशिप सर्व्हिसेस लिमिटेड या विक्रीचे डिबेंचर ट्रस्टी आहेत.