थायलंडच्या रत्न व आभूषणांना भारतातून वाढती मागणी म्हणून, थायलंडच्या वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या, डिपार्टमेंट ऑफ इंटरनॅशनल ट्रेड प्रमोशन (डीआयटीपी), जेम अँड ज्वेलरी इन्स्टिट्यूट ऑफ थायलंडचे (जीआयटी) प्रतिनिधी आणि थाई ट्रेड सेंटर, मुंबई यांनी संयुक्तपणे, ७ ते ११ सप्टेंबर दरम्यान बँकॉकमध्ये होणाऱ्या ६७ व्या बँकॉक जेम्स अँड ज्वेलरी फेअर च्या आयोजनाला प्रोत्साहन म्हणून “लेट्स गो टू बँकॉक” या विशेष रोड शोचे मुंबईत आयोजन केले.
या रोड शो आणि व्यापार मेळासाठी भारतीय ज्वेलर्सच्या मोठ्या मेळाव्यास आमंत्रित करण्यात आले होते. प्रदर्शनाच्या यंदाच्या आवृत्तीतून २५,००० हून अधिक अभ्यागतांचा प्रतिसाद आणि १,२०० दशलक्ष थाई बाटची कमाई अपेक्षित भारताच्या लॅब ग्रोन डायमंड अँड ज्वेलरी प्रमोशन कौन्सिल (LGDPC) आणि DITP मध्ये देखील दोन्ही देश एकमेकांच्या विशेष संसाधनांचा वेगाने कसा फायदा घेऊ शकतात यावर एक करार झाला. LGDJC 10,000 कोटी किमतीचे लॅब ग्रोन डायमंड्स, गोल्ड, सिल्व्हर आणि रुबीज थायलंडला निर्यात करेल आणि त्या बदल्यात थायलंड त्यांचे माणिक,चांदी आणि पांढरे सोने भारताला निर्यात करेल. हे दोन्ही देशांतील मूळ रहिवाशांना एकमेकांच्या डोमेन कौशल्याचा संपूर्णपणे नमुना घेण्यास आणि कदर करण्यास मदत करेल. थायलंडच्या रत्न व आभूषणांच्या निर्यातीसाठी, विशेषतः चांदीच्या दागिन्यांसाठी भारत ही प्रमुख बाजारपेठ आहे. गेल्या वर्षीपासून या निर्यात व्यापारात +१५८.२१ टक्क्यांच्या दराने वेगवान वाढ सुरू आहे.
अनेक सहस्राब्दीपूर्वी जन्मलेल्या अनोख्या संस्कृतीची पार्श्वभूमी हा दोन्ही देशांना सांधणारा मुख्य दुवा आहे. अलिकडच्या वर्षांत म्हणूनच हे दोन्ही शेजारी देश विविध क्षेत्रात उत्कृष्ट बहुपक्षीय आणि व्यावसायिक संबंध वृद्धींगत झाल्याचे अनुभवत आहेत. डीआयटीपीच्या अलीकडील अहवालानुसार, थायलंडची रत्ने आणि दागिन्यांची निर्यात (सोने वगळता) जानेवारी ते जून २०२२ दरम्यान ३,८८४.२१ दशलक्ष अमेरिकी डॉलर इतकी झाली आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत ४०.९६ टक्क्यांनी वाढली आहे. अमेरिका, हाँगकाँग आणि जर्मनी या सारख्या प्रमुख बाजारपेठांपैकी भारतीय बाजाराने सर्वाधिक निर्यात मूल्य निर्माण केले आहे, हिरे, रत्न, मोती, दागिने, सिंथेटिक खडे, मौल्यवान धातू आणि इतर यासारख्या उत्पादनांच्या निर्यातीत भारताने एकूण १४९.२१ टक्के वाढ साधली आहे. अनेक वर्षांपासून बीजीजेएफ मेळ्याला भेट देणाऱ्या देशांमध्ये भारत अग्रस्थानी राहिला आहे. यंदाच्या ६७व्या आवृत्तीसाठीही भारतीय अभ्यागतांची नोंदणी क्रमांक एकवर आहे आणि अद्याप नोंदणी सुरूच आहे. बीजीजेएफ हा विशेषत: भारतीय प्रदर्शकांसाठी एक अतिशय महत्त्वाचा व्यापार मंच आहे. मुख्यतः शेजारचा देश असल्यामुळे, दोन्ही देशांना केवळ राहणीमान आणि खानपानाच्या सवयींच्या बाबतीतच नव्हे तर फॅशन आणि जीवनशैलीच्या बाबतीतही जवळजवळ समान संस्कृती आणि वारसा लाभलेला आहे. भारतीय खरेदीदार किंवा आयातदारासाठी हे प्रदर्शन थायलंडने अद्वितीयपणे तयार केलेल्या रत्न आणि दागिन्यांच्या नवीनतम श्रेणीत व्यवहाराचे जवळचे आणि तयार व्यासपीठ प्रदान करते.
बीजीजेएफ हा केवळ आशियातीलच नव्हे तर जगभरातील सर्वात मोठा रत्न आणि आभूषणांचा मेळा आहे. डीआयटीपीने थायलंडच्या रत्न आणि आभूषण उद्योगाला जागतिक स्तरावर चालना देण्यासाठी सतत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बीजीजेएफ २०२२चे आयोजन इम्पॅक्ट चॅलेंजर हॉल, मुआंग थोंग थानी, बँकॉक येथे होत असून, ८०० हून अधिक प्रदर्शक आणि १,८०० दालनांतून येथे रत्न व आभूषणे प्रदर्शित केली जातील. यंदाच्या आवृत्तीतून १० हजारांहून अधिक अभ्यागत आणि १,२०० दशलक्ष थाई बाट्सची कमाई अपेक्षित आहे. जगभरातील प्रस्थापित खेळाडू आणि उद्योजक थायलंडमधील उत्पादक, खरेदीदार, आयातदार, वितरक आणि निर्यातदारांसह रत्न, दागिने, मौल्यवान खडे, सोने, चांदी ते पॅकेजिंग, उपकरणे, साधने आणि यंत्रसामग्रीच्या सर्व श्रेणींमध्ये व्यावसायिक संबंध जोडण्यास उत्सुक असतील. महामहिम, श्री डोनाविट पूलसावत, कॉन्सुल–जनरल, रॉयल थाई कॉन्सुलेट–जनरल, मुंबई या संबंधाने म्हणाले, “भारताच्या पर्यटन आणि व्यापार या दोन्ही बाबींना थायलंडसाठी करोना साथीपूर्वी आणि नंतरही विशेष स्थान आहे. भारताने थायलंडच्या रत्ने आणि आभूषण उत्पादनांच्या निर्यातीत मोठे योगदान दिले आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील तुम्हा सर्वांसमवेत असणे आणि बीजीजेएफ च्या
…