मुंबई,
‘लालबागचा राजा’चे थेट दर्शन
• वी मुंबईतील सर्वात वेगवान नेटवर्क असल्याचा ओपनसिग्नलचा निर्वाळा.
• दहा दिवसांच्या गणेशोत्सवामध्ये भक्त मिळवू शकणार ‘लालबागचा राजा’चे आशीर्वाद, वी ऍप आणि वी मुव्हीज अँड टीव्ही ऍपवर, शेमारूमीच्या सहयोगाने.
• मुंबईतील वी स्टोर्समध्ये एलईडी स्क्रीन्स लावल्या जातील ज्यावर ‘लालबागचा राजा’चे थेट दर्शन घडवले जाईल.
‘गणपती बाप्पा मोरया’ लवकरच अवघ्या आसमंतात हा एकच गजर ऐकू येईल. ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान साजरा केला जाणार असलेला गणेशोत्सव म्हणजे श्रीगणेश भक्तांसाठी जणू पर्वणी आणि म्हणूनच हा सण सर्वत्र अतिशय उत्साहात, जल्लोषात साजरा केला जातो. जगात कुठेही असताना देखील श्रीगणेशाचे आशीर्वाद मिळवण्याची सुवर्णसंधी आपल्या ग्राहकांना मिळवून देण्यासाठी भारतातील आघाडीचा टेलिकॉम ब्रँड वी ने मुंबईतील लोकप्रिय आणि सर्वाधिक भाविक ज्याच्या दर्शनासाठी आतुर असतात अशा लालबागचा राजाचे थेट दर्शन वी ऍप आणि वी मुव्हीज अँड टीव्ही ऍपवर घडवण्याचे ठरवले आहे. हा उपक्रम शेमारूमीच्या सहयोगाने चालवला जाणार आहे.
गणेशोत्सवाच्या सर्व दहा दिवसांमध्ये वी ग्राहकांना त्यांच्या मोबाईल हॅंडसेट्सवर वी मुव्हीज अँड टीव्ही ऍपवर तसेच वी ऍपवर, मुंबईच्या सर्वात वेगवान नेटवर्क वी वर दररोजच्या व्हर्च्युअल आरत्यांमध्ये सहभागी होता येईल. दररोजच्या आरत्यांचे थेट प्रक्षेपण भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १ वाजता व सायंकाळी ८.३० वाजता केले जाईल. याशिवाय वी ऍप आणि वी मुव्हीज अँड टीव्ही ऍपवर वी ग्राहकांना गणपतीवर तयार करण्यात आलेल्या डॉक्युमेंटरीज देखील पाहता येतील.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी दर्शकांना विसर्जन यात्रेचे थेट प्रक्षेपण पाहता येईल व आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देता येईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री दहा वाजेपर्यंत हे प्रक्षेपण सुरु राहील. मुंबईतील काही निवडक वी स्टोर्समध्ये येणारे लोक आणि इतर सर्वांसाठी एलईडी स्क्रीन्स लावून त्यावर लालबागचा राजाचे थेट दर्शन घडवण्याची व्यवस्था देखील वी ने केली आहे.