● दिल्ली एनसीआरक्षेत्रातील सेक्टर १२ (नॉयडा) आणि मुंबईतील घाटकोपर (पश्चिम) ही ठिकाणेसर्वाधिक अपघात-प्रवण असल्याचेACKO च्या आकडेवारीतून उघड
● बहुतांश अपघातांसाठी दुसऱ्या गाडीचा ड्रायव्हर जबाबदार असला तरीही प्राण्यांचे रस्ता ओलांडणे, रस्त्यावरचे खड्डे, बेफामपणे गाडी चालविणे आणि दारुच्या नशेत गाडी चालविणे अशी इतर कारणेही दिल्ली व मुंबईतील रस्ते अपघातांसाठी जबाबदार
● भारताच्या प्रमुख महानगरांपैकी बेंगळुरू ठरले अपघातांचे प्रमाण सर्वात कमी असलेले शहर
● सर्व महानगरांमध्ये चेन्नईत प्राण्यांमुळे होणाऱ्या अपघातांचा प्रभाव अधिक
ऑगस्ट २०२२:रस्ते अपघातांची संख्या सर्वाधिक असलेले दिल्ली एनसीआर हे देशातील सर्वाधिक अपघात प्रवण क्षेत्र ठरले आहे. पण त्याचबरोबर भारताची आर्थिक राजधानी मुंबईसुद्धा या यादीमध्ये फार मागे नाही. ACKO या भारताच्या अग्रगण्य टेक-फर्स्ट विमापुरवठादार कंपनीने आज आपल्या ACKO ACCIDENT इंडेक्स २०२२ च्या द्वैवार्षिक अंकामध्ये ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद आणि मुंबई या प्रमुख महानगरांमधील अपघातांच्या स्थितीचे तपशील नोंदविणाऱ्या या सूचकांकातील आकडेवारीनुसार दिल्लीतील अपघातांचे प्रमाण २०.३टक्के इतके आहे तर मुंबईतील अपघातांचे प्रमाण १८.२टक्के इतके आहे. या अपघातांमागची कारणेही दोन्ही शहरांच्या बाबतीत बऱ्यापैकी सारखीच आहेत. यातील बहुतांश अपघातांसाठी ‘इतर ड्रायव्हर’ जबाबदार असल्याचे दिसून आले असले तरीही प्राण्यांचे रस्ता ओलांडणे, रस्त्यावरील खड्डे, बेफाम गाडी चालविणे तसेच दारूच्या नशेत गाडी चालविणे ही इतर कारणेही आढळून आली आहेत.
अपघात-प्रवण भागांविषयी सांगायचे झाले तर दिल्ली एनसीआर क्षेत्रातील सेक्टर १२ (नॉयडा) आणि मुंबईतील घाटकोपर (पश्चिम) हे भाग सर्वाधिक अपघात-प्रवण आहेत. दिल्लीतील एकूण अपघातांपैकीजवळ-जवळ ९टक्के अपघात हे सेक्टर-१२ मध्ये घडलेले आहेत तर मुंबईतील एकूण अपघातांपैकी जवळ-जवळ ५टक्के अपघात हे घाटकोपर (पश्चिम) येथून नोंदवले गेले आहेत. असे असले तरीही मुंबईमध्ये बहुतांश अपघात हे मुंबईच्या विविध भागांमध्ये सारख्याच प्रमाणात झाले असल्याचे या अहवालातून दिसून आले आहेत.
सर्व महानगरांमध्ये बेंगळुरूची कामगिरी सर्वात चांगली असल्याचे दिसून आले आहे. सर्वात कमी अपघात-प्रवण असलेल्या या शहरामध्ये नोंदविले गेलेले अपघातांचे प्रमाण १६टक्के इतके आहे. यातील बरेचसे अपघात हे बोम्मनहल्ली येथे नोंदवले गेले. तिथले अपघातांचे प्रमाण जवळ-जवळ ९टक्के इतके होते तर कल्याण नगर भागात जवळ-जवळ ८टक्के अपघात नोंदविले गेले. बेंगळुरूमध्ये बान्नेरघाट्टा ते हूडी या ५० किमीच्या पट्ट्यामध्ये अपघातांच्या घटना बऱ्याच प्रमाणात एकवटलेल्या दिसल्या. याच भागामध्ये वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असते.
याबरोबरच चेन्नईमध्ये अपघातांचे प्रमाण १८.६टक्के तर हैदराबादमध्ये ते १८.५टक्के असल्याचे दिसून आले.
या सूचकांकामधून निदर्शनास आलेला आणखी एक रोचक कल म्हणजे रस्ते अपघातांसाठी, विशेषत: चेन्नईतील गाड्यांना प्राणी हे मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत असल्याचे दिसून आले आहे. चेन्नईमध्ये अशा अपघातांची संख्या सर्वाधिक म्हणजे ३ टक्क्यांहून अधिक होती. दिल्ली आणि बेंगळुरू या दोन्ही ठिकाणी हे प्रमाण २टक्के इतके होते. सर्व महानगरांमध्ये कुत्र्यांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ५८.४टक्के इतके होते तर त्यापाठोपाठ गाईंमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या २५.४४टक्केइतकीहोती. ११.६टक्के अपघात हे उंदरांमुळे झाल्याचे दिसले.
ACKOच्या मोटर अंडररायटिंग विभागाचे सीनियर डिरेक्टर अनिमेश दास म्हणाले. “अपघातांसाठी आपण बरेचदा रस्त्यांच्या दुरावस्थेला जबाबदार ठऱवितो, मात्र या अहवालातून वेगळीच माहिती सामोरी आली आहे. रस्ते अपघात आणि त्यामुळे ओढावणारे मृत्यू टाळता येऊ शकतात आणि काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेल्या प्रतिरोधक उपाययोजना वापरल्या गेल्या तर अपघातांचा अदमास लागू शकतो. हा अॅक्सिडंट इंडेक्स म्हणजे आपल्या धोरणकर्ते आणि प्रशासकांसाठी पुढे केलेला फक्त एक मदतीचा हात आहे, जेणेकरून त्यांना भारतातील सर्वाधिक अपघात-प्रवण ठिकाणांमध्ये अपघात टाळणाऱ्या उपाययोजना राबविता याव्यात ज्यामुळे वाहतुकीचे नियमन करण्याच्या कामी मदत होऊ शकेल आणि अपघातांचे प्रमाण उल्लेखनीयरित्या कमी होऊ शकेल.”
इतर महानगरांचे तपशील:
हैदराबाद: या शहरातील बहुतांश अपघात हे मधापूरच्या टेक हबच्या परिसरातच झाल्याचे आढळले. शहरातील इतर अपघात-प्रवण क्षेत्रांमध्ये अपघातांचे प्रमाण थोड्या-बहुत प्रमाणात सारखेच आढळून आले. याला निझामपेठ भाग अपवाद
ठरला. तिथे सर्वात कमी अपघात नोंदविले गेले. हैदराबादमधील अपघातांचे एकूण प्रमाण १८.५टक्के इतके होते.
चेन्नई: या शहरातील बहुतांश अपघात हे गिंडीच्या गाड्यांची प्रचंड वर्दळ असलेल्या औद्योगिक पट्ट्यामध्ये नोंदविले गेले. इथल्या अपघातांचे प्रमाण जवळ-जवळ १९टक्के इतके होते तर अम्बात्तुर येथे १४टक्के अपघातांची नोंद झाली. पूनामल्ली येथे १३टक्के अपघातांची नोंद झाली. एकूण चेन्नईमध्ये अपघातांचे प्रमाण १८.६टक्के इतके नोंदविले गेले.
ACKO ही भारताची अग्रगण्य इन्श्युअरटेक कंपनी असून आपल्या ७० दशलक्षांहून अधिक आगळ्यावेगळ्या ग्राहकांना ती आपली सेवा प्रदान करते. अशाप्रकारचा या पहिल्याच रिपोर्टला ACKO जवळील डेटाबेसचे पाठबळ लाभले आहे व अपघातांचा कल दर्शविणारा हा एक सुनिश्चित सूचकांक आहे. यात पायाभूत सुविधा, नशेत गाडी चालविणे, बेजबाबदारपणे गाडी चालविणे, प्राण्यांनी रस्ता ओलांडणे आण इतर ड्रायव्हर्स अशा निकषांवर आधारित अपघातांच्या प्रमुख कारणांचा समावेश करण्यात आला आहे. भारतातील महानगरांमध्ये कशाप्रकारे ड्रायव्हिंग होते हे समजून घेण्यासाठी बहुविध माहितीस्त्रोतांचा धांडोळा घेऊन अत्यंत कष्टपूर्वक हा सूचकांक तयार करण्यात आला आहे.
अपघातांमागच्या काही सर्रास आढळून येणाऱ्या कारणांना उजेडात आणण्यासाठी आणि भारतातील कारमालकांना अधिक चांगले ड्रायव्हिंग करण्यास मदत करण्यासाठी ACKO ने हा रिपोर्ट तयार केला आहे.
या अहवालातील डेटा हा ACKO च्या डेटाबेसमधून घेण्यात आला आहे. आवश्यक तेव्हा आणि तिथे थर्ड पार्टी डेटा स्त्रोतांचाही वापर करण्यात आला आहे.