ऑनलाइन गेमिंग कंपन्या आता छोट्या शहरांमध्ये वाढीसाठी नवीन संधी शोधत
मुंबई : अलीकडच्या काळात भारतातील ऑनलाइन गेमिंग उद्योगात अभूतपूर्व वाढ झाली आहे आणि ही वाढ आगामी काळात ही कमी होईल अशी लक्षणे दिसत नाही आहे. लुमिकाई आणि रेडसीरने अलीकडेच प्रकाशित केलेल्या इंडिया गेमिंग अहवाल २०२१च्या नुसार भारतीय गेमिंगचे बाजारमूल्य हे आर्थिक वर्ष २०२६ (FY२६) पर्यंत ७ अब्ज डॉलर या मूल्यापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. भारतीय गेमिंग बाजारमूल्य हे सध्या २.२ बिलियन आहे.भारतीय गेमिंग मार्केटला प्रादेशिक गेमिंग समुदायांमध्ये मोठ्या प्रमाणात संधी आहे, कारण या समुदायांकडे अफाट प्रतिभा आणि कौशल्याची उपलब्धता आहे.
सुमारे दोन दशकांपूर्वी राजस्थानमधील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या सुनीता शर्मा या आपल्या कुटुंबाच्या चांगल्या आयुष्यासाठी आणि रोजगारासाठी आपल्या पती व कुटुंबासह गुजरातच्या सुरत शहरात आल्या. सुनीता या गृहिणी असून पाच मुलांच्या आई आहेत. सुनीता यांचा बहुतांश वेळ हा आपल्या पतीच्या छोट्या व्यवसायात मदत करण्यात आणि मुलांचे संगोपन करण्यात जातो. साल २०२० मध्ये सुनीताला त्यांच्या पतीने रम्मी या खेळाची ओळख करून दिली. सुनीताने पहिल्यांदा जंगली रम्मीवर मोफत गेम खेळायला सुरुवात केली. काही काळानंतर सुनीता यांच्यामध्ये जंगली रम्मी खेळण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला. मग त्यांनी हळूहळू रोख स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. सुनीता
यांनी आपली कौशल्ये आणि धोरणे यांचा योग्य वापर केला. तसेच यादरम्यान त्यांनी भारतातील हजारो कुशल रम्मी खेळाडूंना पराभूत करून ग्रँड फिनालेसाठीचा आपला प्रवास सुरू केला आहे.
रम्मी या खेळातील आपल्या कौशल्याचा पुरेपूर उपयोग करून सुनीता दीड करोडची रक्कम जिकूंन त्या आतापर्यंतची सर्वात मोठी रम्मी करोडपती बनल्या आहेत. सुनीता आणि त्यांच्या कुटुंबाला सुरुवातीला सुनीता यांच्या विजयावर विश्वासच बसत नव्हता. पण आता त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
यावेळी सुनीता शर्मा म्हणाल्या की, इतकी मोठी रक्कम जिंकणे हा विजय माझ्यासाठी स्वप्नपूर्तीसारखा आहे.दीड करोड जिंकणे ही माझ्यासाठी, माझे पती आणि आमच्या मुलांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. ही जिंकलेली रक्कम आमची सद्यस्थिती सुधारण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल तसेच आमच्या मुलांच्या भविष्यकाळासाठी ही रक्कम उपयोगी ठरले. गेल्या काही वर्षांत रम्मी, फँटसी स्पोर्ट्स आणि लुडो अॅप सारख्या ऑनलाइन कौशल्य-गेमिंग प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांच्या संख्येत खूप मोठी वाढ झाली आहे. वापरकर्त्यांची ही वाढ चित्रपट, ओटीटी आणि पॉडकास्टसारख्या इतर माध्यम श्रेणींपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. सुनीता शर्मा यांसारख्या खेळाडूंचा मोठा विजय हा मोठ्या शहरांसह लहान शहरांमध्ये या कौशल्य खेळांच्या लोकप्रियतेचा पुरावा आहे.
डिजिटल इंडिया उपक्रम आणि देशातील इंटरनेट पायाभूत सुविधांच्या वृद्धीनंतर भारतातील ऑनलाइन गेमिंग उद्योग हा वेगाने वाढला आहे. यामुळेच आजकाल भारतात लहान शहरे व ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी शिकण्याच्या आणि विकासाच्या संधी अनेक पटींनी वाढल्या आहेत. भारतातील लाखो लोक दररोज ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मवर त्यांची कौशल्ये वापरण्यासाठी व मनोरंजनासाठी नोंदणी करत आहेत. सुनीता शर्मा यांच्या प्रेरणादायी कामगिरी आणि विजयानंतर, ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना देशातील कमी प्रमाणात लक्ष दिले गेलेल्या लहान शहरे व ग्रामीण क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी एक नवीन दिशा मिळाली आहे. योग्य पध्दतीने उपयोग केल्यास ऑनलाइन गेमिंग हे भारतातील लहान शहरांमध्ये मनोरंजनाचे एक उत्तम साधन बनू शकते आणि यामुळे देशाचा डिजिटल साक्षरता दरही सुधारू शकतो.