डोंबिवलीतील केळकर रोड नवीन व आलिशान शोरूमचे उदघाट्न केले
डोंबिवली, २९ ऑगस्ट २०२२: कल्याण ज्वेलर्स या भारतातील सर्वात मोठ्या ज्वेलरी कंपनीने आज डोंबिवली येथे नवीन शोरूमचे उद्घाटन केले. केळकर रोड, डोंबिवली येथे स्थित या नवीन व आलिशान शोरूमचे उदघाट्न कल्याण ज्वेलर्सचे ब्रँड अँबेसेडर-अभिनेता प्रभू गणेशन यांच्या हस्ते करण्यात आले.
कल्याण ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री टी एस कल्याणरमन म्हणाले,”आम्हाला डोंबिवली येथे मुंबईतील आमचे ८वे शोरूम लाँच करण्याचा अत्यंत आनंद होत आहे. वर्षानुवर्षे आम्ही राज्यातील प्रमुख बाजापेठांमध्ये लक्षणीय उपस्थिती निर्माण केली आहे आणि या नवीन शोरूमच्या लाँन्चसह आमचा महाराष्ट्रामध्ये ब्रँड अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा मनसुबा आहे. आमचा आरोग्यदायी वैयक्तिकृत खरेदी वातावरण देत आमचे ग्राहक व समुदायांची सुरक्षा व आरोग्याची मोठ्या प्रमाणात काळजी घेण्यासोबत दर्जात्मक खरेदी अनुभव देण्याचा मानस आहे.”
शोरूम ओपनिंग अद्वितीय स्टाईल मध्ये साजरे करत ज्वेलरी ब्रॅण्डने प्रत्येकी १ लाख रुपये किमतीच्या डायमंड ज्वेलरी खरेदीवर जवळपास १०,००० रू सूटची घोषणा केली आहे. तसेच कल्याण ज्वेलर्स घडणावळवर प्रतिग्रॅम जवळपास ३०० रूपयांची, तसेच गोल्ड एक्सचेंजवर प्रतिग्रॅम ५०रू सूट देणार आहे. कल्याण ज्वेलर्सच्या शोरूममध्ये सोन्याच्या किमतीचे मानकीकरण करणारा ‘विशेष कल्याण गोल्ड रेट’ सादर केला आहे. जो बाजारपेठेतील सर्वात कमी रेट आहे. भारतातील कल्याण ज्वेलर्सच्या शोरूममधून ग्राहक आकर्षक ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. या अद्वितीय ऑफर्स ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत सुरु राहतील.