मुंबई : २९ ऑगस्ट २०२२: प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्राच्या क्षेत्रात कार्यरत आरोग्यकर्मींचे प्रतिनिधित्व करणारी भारतातील व्यावसायिक संघटना फेडरेशन ऑफ ऑब्सेट्रिशियन्स अँड गायनॅकोलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया (FOGSI) ने प्रसूतीसेवेच्या दर्जात सुधारणा घडवून आणण्याचे सरकारचे ध्येय साकारण्यास मदत करण्याच्या हेतूने नॅशनल अॅक्रेडिशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (NABH)/ अधिस्वीकृती आणि दर्जाचा पुरस्कार करणारी भारताची शिखर संस्था क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया (QCI) सोबत सहयोग साधत असल्याची घोषणा आज केली. या सहयोगामुळे ‘एक राष्ट्र एक दर्जा’ हे तत्व पाळले जात असल्याची खातरजमा केली जाईल. जिथे मॅटर्निटी सर्व्हिस प्रोव्हायडर्सचे (MSPs) चे मूल्यमापन NABH आणि FOGSI द्वारे संयुक्तपणे केले जाईल.
दर्जामधील सुधारणेच्या दृष्टीने साधण्यात आलेला हा महत्त्वपूर्ण क्षेत्रीय सहयोग असून शाश्वत विकास उद्दीष्ट्यांबरहुकुम (SDCs) मातामृत्यूंचे प्रमाण कमी करणे व भारतामध्ये अधिक सुरक्षित प्रसूतीसाठी आरोग्यव्यवस्था बळकट करणे हे या सहयोगाचे लक्ष्य आहे. या सामंजस्य करारांतर्गत हॉस्पिटल्स आणि प्रसूतीसेवा पुरविणा-या नर्सिंग होम्सच्या क्लिनिकल दर्जाचे मूल्यमापन केले जाईल व तिथे मातांना प्रसूतीदरम्यान आणि बाळाला जन्म दिल्यानंतरही सातत्यापूर्ण, सुरक्षित व
ंँ सन्मान जपणारी देखभाल दिली जाईल याची खातरजमा केली जाईल. देशातील सर्व MCH केंद्रांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचे आणि त्यांच्या कामकाजाच्या दर्जासाठी प्रमाण निकष निश्चित करण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून हा सहयोग साधण्यात आला असून आपल्या आरोग्यव्यवस्थेमध्ये बदल घडवून आणण्याच्या दिशेने उचललेले हे एक लक्षणीय पाऊल आहे.
पायाभूत स्तरावर दर्जाच्या आवश्यकतेवर भर देताना नॅशनल अॅक्रेडिशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (NABH) चे चेअरमन डॉ. महेश वर्मा म्हणाले, “सर्वोत्कृष्टता जपणारी संस्कृती निर्माण करण्याच्या, आरोग्ययंत्रणेत सुधारणा घडवून आणण्याच्या आणि दर्जामध्ये सातत्यपूर्ण सुधारणा व रुग्णसुरक्षेचा पुरस्कार करण्याच्या ध्येयाने आम्ही प्रेरित आहोत. मान्यता या आपल्या प्रमुख उपक्रमाच्या साथीने देशातील प्रसूती आरोग्यसेवेचा दर्जा वाढविण्यासाठी FOGSI बरोबर सहयोग साधत असल्याचा आम्हाला आनंद आहे.”
नॅशनल अॅक्रेडिशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (NABH)चे सीईओ डॉ. अतुल मोहन कोचर म्हणाले, “भारतामध्ये प्रूसतीदरम्यान होणा-या मातामृत्यूंची संख्या जगात सर्वाधिक आहे, त्यामुळे देशात प्रसूतीसेवेच्या दर्जात सुधारणा घडवून आणणे ही काळाची गरज आहे. आरोग्याच्या बाबतीत एकूणच चांगले परिणाम मिळवायचे असतील तर प्रसूतीशी निगडित आरोग्यसेवांच्या प्रमाण दर्जामध्ये सुधारणा घडवून आणणे महत्त्वाचे आहे असे आम्हाला ठामपणे वाटते. FOGSI बरोबर साधलेला हा सहयोग म्हणजे देशभरातील प्रसूतीसेवा परिसंस्था बळकट करण्याच्या दृष्टीने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”
FOGSI च्या प्रेसिडंट आणि FIGO च्या खजिनदार डॉ. एस शांता कुमारी म्हणाल्या, “आरोग्य यंत्रणांमध्ये दर्जाच्या प्रमाणनासाठीचे निकष निर्धारित करणे हे प्रसूतीदरम्यानच्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्याच्या आणि आरोग्यविषयक SGD लक्ष्ये प्राप्त करण्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरू शकते. मात्र भारतामध्ये प्रसूतीसाठी प्रसूतीकेंद्रांमध्ये दाखल होणा-या स्त्रियांची संख्या वाढत असूनही मातामृत्यूचे प्रमाण अद्यापही काळजी वाटावी इतके अधिक आहे. यातून या केंद्रांमध्ये दिल्या जाणा-या सेवांच्या दर्जामध्ये त्रुटी असल्याचे सूचित होते. चालू SRS डेटानुसार भारताच्या मॅटर्निटी मोर्टॅलिटी रेश्यो (MMR) मध्ये सुधारणा घडून आल्याचे दिसून आले असून २०११-१३ दरम्यान १६७ च्या घरात असलेला हा आकडा २०१७-१९ दरम्यान १०३ वर आला आहे. आपल्या आरोग्ययंत्रणांमध्ये काही सुधारणा झाल्याचे यातून अधोरेखित होते, तरीही अद्याप बरेच काम बाकी आहे. देशातील जवळ-जवळ ५० टक्के महिला या मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये बाळांना जन्म देतात, त्यामुळे प्रसूतीतज्ज्ञांच्या समुदायाने चिकित्सेसाठीच्या मानकांचा तत्काळ स्वीकार करण्याची गरज आहे. NABH बरोबरच्या सहयोगाचे आम्ही स्वागत करतो, या सहयोगामुळे भारतातील स्त्रियांना अधिक चांगल्या परिणामांचे आणि आरोग्याचे वचन मिळू शकेल.”