• मागील ३ वर्षात या कार्यक्रमात भारतभरातील ४००० हून अधिक सहभागींनी नोंदणी केली आहे आणि आता अधिकाधिक महिला आणि तरुण कृषी उद्योजकांना सक्षम करण्यावर भर दिला जाईल
• हा उपक्रम आता २४ राज्यांमध्ये राबवला जाईल
• बायरच्या सहभागी उपक्रमामुळे तुम्हाला खालील संधी मिळतात :
o पिकांबद्दलचे संपूर्ण कृषीशास्त्र शिकता येते आणि बायरच्या उत्पादनांची संपूर्ण तांत्रिक माहिती मिळवता येते
o या उपक्रमाच्या माध्यमातून सूक्ष्म उद्योजक म्हणून लाभही मिळवता येतात
o कृषी क्षेत्राला नवे स्वरूप देत ग्रामीण भागातील पिकांची उत्पादकता वाढवता येईल
_________________________________________________________________________________
नवी दिल्ली, …. ऑगस्ट २०२२: बायर या हेल्थकेअर आणि कृषी क्षेत्रातील जीवन विज्ञान विभागात मुलभूत उपलब्धता असलेल्या जागतिक स्तरावरील कंपनीने आपला सहभागी उपक्रम अधिक व्यापक करण्याची घोषणा केली आहे. एक सर्वसमावेशक कृषी परिसंस्था उभारून ग्रामीण महिला आणि तरुणांना सक्षम करण्याच्या उद्देशाने हे धोरण आखण्यात आले आहे. ‘बायर सहभागी प्रोग्राम’ ची सुरुवात २०१९ मध्ये झाली आणि आजघडीला सबंध भारतातून ४००० हून अधिक सहभागी या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. या उपक्रमातून ग्रामीण उद्योजक (सहभागी) बायरशी जोडले जातात तसेच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची अनोखी संधीही बायरसाठी निर्माण करतात.
सहभागी हा एक ग्रामीण सूक्ष्म उद्योजकता विकास उपक्रम आहे. यात शेतकरी, महिला आणि ग्रामीण तरुणांना सक्षम करून त्यांना मार्गदर्शक बनण्यासाठी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना योग्य पर्यायांची शिफारस करण्यासाठी सक्षम केले जाते. सहभागी उपक्रम अधिक व्यापक करण्यासाठी अधिकाधिक सहभागींना सोबत घेऊन भारतभरातील शेतकऱ्यांना जोडणारी आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणारी एक बळकट संपर्कसाखळी तयार केली जाईल. कृषी क्षेत्राची माहिती असलेली आणि स्मार्टफोन वापरू शकेल अशी १८ वर्षांवरील कोणीही व्यक्ती सहभागी बनू शकते. या उपक्रमात तरुण कृषी उद्योजक बायरसोबत जोडले जात आहेत तसेच बायर कंपनीचा विश्वास आहे की कृषी क्षेत्रातील मूल्य साखळी आणि आपल्या कुटुंबाला आकार देण्यात महिलांचा मोठा वाटा असतो. योग्य विकल्प निवडीवर स्त्रियाींचा प्रभाव असल्याने हा उपक्रम वृद्धिंगत करण्यासाठी स्त्रिया योग्य भागीदार ठरतात.
स्मार्टफोन्सचा वाढता वापर आणि नवनवीन डिजिटल तंत्रज्ञान यामुळे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे नवीन पर्याय निर्माण होत आहेत आणि परिणामी या उपक्रमाला अधिकच चालना मिळत आहे. स्थानिक वातावरणानुसार अल्पभूधारक शेतकऱ्यांना योग्य पर्याय सुचवण्यासाठी सहभागींना सुयोग्य प्रशिक्षण देऊन सज्ज केले जाते. सहभागींच्या साह्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांना बायरची उत्पादने डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध होतात. हा उपक्रम सध्या २४ राज्यांमध्ये ४७० जिल्हे आणि १९८० उपजिल्ह्यांमध्ये राबवला जातो.
या उपक्रमाबद्दल बोलताना बायरच्या भारत, बांग्लादेश आणि श्रीलंकेतील कृषी विज्ञान विभागाचे राष्ट्रीय विभागीय प्रमुख (क्रॉप सायन्स डिव्हिजनचे कंट्री डिव्हिजनल हेड) सायमन-थर्स्टन विबुश म्हणाले, “कृषी पद्धतींमध्ये बदल करून स्थानिक समुदायाला लाभ मिळवून द्यावेत, असा आमचा व्यापक स्तरावरील प्रयत्न आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून, शाश्वत आणि जबाबदार शेतीला प्रोत्साहन देणाच्या संधी आम्ही सूक्ष्म उद्योजकांना उपलब्ध करून देत आहोत आणि त्यातून ग्रामीण उत्पादकतेलाही चालना मिळत आहे. या सहभागींसोबत बायर यापुढेही काम करेल आणि त्यांच्या गावांमध्ये आधुनिक कृषी आणि लागवड पद्धतींचा अवलंब, बायर उत्पादनांची सखोल माहिती आणि शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार पिके आणि उत्पादनांसंदर्भात सल्ला देऊन एक शाश्वत परिसंस्था उभारण्यासाठी प्रयत्नशील असेल.”
बायरने ग्रामीण जनतेला अधिक माहिती पुरवण्यासाठी आणि सहभागी उपक्रमात नोंदणीसाठी 18001204049 हा टोल फ्री क्रमांकही सुरू केला आहे.