पुणे, : दीपक फर्टीलायजर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन्स लिमिटेड (डीएफपीसीएल) ने
इन्स्टीट्यूट फॉर सप्लाय मॅनेजमेंट – चीफ प्रोक्योअरमेंट ऑफिसर (आयएसएम-सीपीओ) अवॉर्डस् 2022 सन्मान
पटकावला आहे. या पुरस्काराकरिता 15 वर्गवाऱ्यांत निर्मिती, तंत्रज्ञान आणि बँकिंग सेवा क्षेत्रातील 85 हून अधिक
संघटनांनी सहभाग नोंदविला होता. डीएफपीसीएल’ने ‘एक्सलन्स इन सप्लाय चेन इनिशिएटीव्ह’, ‘आऊटस्टँडिंग
क्रॉस फंक्शनल कोलॅबरेशन’ आणि ‘एक्सलन्स इन यूज ऑफ टेक्नोलॉजी’ अशा तीन वर्गवारीत पुरस्कार जिंकला.
या मिळालेल्या यशाबद्दल बोलताना डीएफपीसीएल एक्झिक्युटीव्ह व्हाईस प्रेसिडंट अरुण भानूमूर्ती – स्ट्रॅटेजी अँड
ट्रान्सफॉरमेशन म्हणाले, “इन्स्टीट्यूट ऑफ सप्लाय मॅनेजमेंटकडून पुरस्कार प्राप्त होणे ही मोठ्या अभिमानाची बाब
आहे. हा प्रोक्योअरमेंट क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानला जातो. आमचे या क्षेत्रातील सहयोगी घटक आम्हाला ‘पार्टनर
ऑफ चॉईस’ (पसंतीचा भागीदार) करत असून हा गौरव म्हणजे आमच्या भविष्यगामी पर्याय विकासाची वचनबद्धता
जपल्याची पावती समजतो. अशाप्रकारचे मान-सन्मान आम्हाला आमच्या प्रत्येक कमात एक पाऊल पुढे जाण्यासाठी
इंधनासारखे काम करतात, प्रक्रियेत नवनवीन उद्योग मापदंड निर्माण करणे शक्य होते.”
डीएफपीसीएल’ने सर्वसमावेशक मागणी-प्रणीत पुरवठा साखळी सादर केल्याबद्दल ‘एक्सलन्स इन सप्लाय चेन
इनिशीएटीव्ह’ अवॉर्ड जिंकला, ज्याचा सकारात्मक परिणाम मागणी अंदाज, लॉजिस्टीक आणि सप्लाय चेन रिस्क
सर्वोत्तमतेला चालना देणाऱ्या संपूर्ण चक्रावर झाला. कंपनीने ‘आउटस्टँडिंग क्रॉस फंक्शनल कोलॅबोरेशन’ श्रेणीमध्ये
आपली प्रकल्प मालिका प्रदर्शित केल्याबद्दल उपविजेतेपद पटकावले. ज्यामुळे सहयोग सुलभ झाला आणि सहयोगी
दृष्टिकोनातून संघटनेच्या यशाचा टप्पा निश्चित करण्यात आला. डीएफपीसीएल एक्सलन्स इन यूज ऑफ टेक्नॉलॉजी
श्रेणीतीलदेखील उपविजेते आहेत. ज्यामुळे त्यांना संघटनेतंर्गत कार्ये, संघ आणि भौगोलिक प्रदेशात यशस्वीपणे
प्रभावी परिणाम सिद्ध करणे शक्य झाले.
द इन्स्टीट्यूट फॉर सप्लाय चेन मॅनेजमेंट (आयएसएम) ही जगातील पहिली आणि सर्वात मोठी विना-नफा तत्त्वावर
आधारित व्यावसायिक पुरवठा व्यवस्थापन संघटना आहे. आयएसएम’ची स्थापना 1915 मध्ये झाली असून तिचे
100 देशांत 50,000पेक्षा अधिक सदस्य आहेत. सीपीओ अवॉर्डस्’ने उद्योग-आधारित नाव कमावले आहे. तसेच
प्रोक्योअरमेंट क्षेत्रात सर्वोत्तम सन्मान म्हणून उत्क्रांत झाला आहे.