• About Us
  • Contact Us
  • Advertise
  • Privacy & Policy
newshindindia
  • Home
  • Business
  • Education
  • Finance
  • Entertainment
  • Editor’s Picks
  • Sports
  • Lifestyle
  • New Products
  • Real Estate
  • More
    • Technology
    • Tourism
    • General
    • Health
    • Public Interest
No Result
View All Result
  • Home
  • Business
  • Education
  • Finance
  • Entertainment
  • Editor’s Picks
  • Sports
  • Lifestyle
  • New Products
  • Real Estate
  • More
    • Technology
    • Tourism
    • General
    • Health
    • Public Interest
No Result
View All Result
newshindindia
No Result
View All Result
Home Business

आयसीआयसीआय लोम्बार्डने आरोग्य, वाहन व व्यावसायिक विभागात १४ नवीन उत्पादने सादर केली

newshindindia by newshindindia
August 27, 2022
in Business, Finance, Public Interest, Technology
0
आयसीआयसीआय लोम्बार्डने आरोग्य, वाहन व व्यावसायिक विभागात १४ नवीन उत्पादने सादर केली
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नाविन्यपूर्ण आणि तंत्रज्ञान सक्षम विमा ऑफरची व्यापक श्रेणी ग्राहकांच्या अनुभवात क्रांती घडवून आणेल

मुंबई,  : आयसीआयसीआय लोम्बार्ड, या भारतातील अग्रगण्य खाजगी विना-आरोग्य विमा कंपनीने आरोग्य, मोटर, प्रवास आणि कॉर्पोरेट विभागांमध्ये प्रवाशांसह/अ‍ॅड-ऑन आणि अपग्रेडसह १४ नवीन किंवा वर्धित विमा उपायांची नवीनतम श्रेणी सादर केली आहे. शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषदेत जाहीर केलेल्या अनेक ऑफर, ग्राहकांच्या विस्तृत स्पेक्ट्रमसाठी सर्व श्रेणींमध्ये उत्पादनांची विस्तृत श्रेणी दिसून येते. उत्पादन संच ग्राहकांना विम्याचा अनुभव घेण्याच्या पद्धतीत बदल करेल, त्यांना अखंड प्रवास आणि तंत्रज्ञान-सक्षम उपाय प्रदान करेल.

विमा उद्योगात आता नवीन प्रकारच्या जोखिमी उदयास येताना दिसत आहेत. त्यामध्ये महामारी असो, हवामान बदल असो किंवा माहितीबाबती गोपनीयता असो आणि यासाठी ग्राहकांच्या बदलत्या वर्तनानुसार आणि नवीन तांत्रिक उपाय व संधींच्या आगमनानुसार चालणाऱ्या सर्वसमावेशक कव्हरेजची आवश्यकता आहे. यामागील मुख्य विचार हा इर्डाच्या (विमा नियामक आणि विकास प्राधिकरण) ‘वापर आणि फाइल’ या चौकटीच्या क्रांतिकारी घोषणेनुसार असून त्याला अनुसरुनच नवीन ऑफरिंग देण्यात आल्या आहेत.

आयसीआयसीआय लोम्बार्डच्या उत्पादन पोर्टफोलिओच्या विस्ताराविषयी बोलताना, आयसीआयसीआय लोम्बार्डचे कार्यकारी संचालक संजीव मंत्री म्हणाले, ‘आम्ही, आयसीआयसीआय लोम्बार्डमध्ये लाखो ग्राहकांना त्यांच्या विशिष्ट गरजांसाठी सुलभ आणि अत्याधुनिक जोखीम समाधाने प्रदान करण्यात नेहमीच आघाडीवर आहोत. नव कल्पकता आणि लवचिकता, हे आमच्या संस्थात्मक गुणसूत्राचा एक भाग आहेत आणि आमच्या सर्वसमावेशक ऑफर ग्राहकांच्या असंख्य गरजा पूर्ण करण्यासाठी, वय; भौगोलिक; सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी किंवा लिंग यांच्यातील प्रमाणानुसार तयार करण्यात आला आहे. आमच्याकडे अक्षरशः प्रत्येक विभागासाठी एक उत्पादन आहे आणि नियामक सुधारणांमुळे आम्ही नवीन उत्पादने विकसित आणि लॉन्च करण्याच्या आमच्या गतीला वेग दिली आहे, हे सांगताना मला आनंद होत आहे. माझा विश्वास आहे की, विमा उद्योगातील सध्याचा काळ हा नावीन्यपूर्ण शोध आणि शक्यतांची पुनर्कल्पना करण्यासाठी एक रोमांचक काळ आहे. १४ नवीन उत्पादने आणि सुधारणांसह, आयसीआयसीआय लोम्बार्डला देशाची एक प्रख्यात आणि सर्वसमावेशक जोखीम विमा कंपनी म्हणून पुढे नेले आहे.’

विभागानुसार विमा ऑफरच्या विस्तृत श्रेणीतील ठळक मुद्दे आणि विस्तृत तपशील येथे आहेत:

गोल्डन शील्ड : ज्येष्ठ नागरिकांसाठी अनिश्चित आरोग्य-संबंधित जोखमींविरूद्ध आर्थिक सुरक्षा प्रदान करते. हा एक असा वि

भाग आहे, ज्यामध्ये विमा उद्योगाद्वारे आजवर कमी सेवा दिली गेली आहे. आमचे उत्पादन सानुकूल करण्यायोग्य पॉलिसी प्रदान करते, ज्यात संपूर्ण हॉस्पिटलायझेशन खर्चाचा समावेश होतो. हा खर्च वृद्ध वयातील ग्राहकांसाठी अधिक संबंधित असतात. संरक्षण कवचमध्ये खोलीचे भाडे, आयसीयू, डॉक्टरांचे शुल्क, भूल, रक्त, ऑक्सिजन, ऑपरेशन थिएटर शुल्क, औषधे आणि बरेच काही यांचा समावेश आहे. यामध्ये २४ तासांपेक्षा कमी हॉस्पिटलायझेशन आवश्यक असलेल्या डे-केअर प्रक्रिया/उपचारांसाठी आणि स्टेम सेल थेरपी, बलून सायन्युप्लास्टी, ओरल केमोथेरपी, रोबोटिक शस्त्रक्रिया, मेंदूच्या खोल उत्तेजनासह बऱ्याच काही आधुनिक उपचारांसाठीचा वैद्यकीय खर्च समाविष्ट आहे. हे उत्पादन एक अद्वितीय अॅड-ऑन केअर कव्हरेजसह येते, ज्यामध्ये आरोग्यसेवा व्यावसायिकांकडून सेवा प्रदान होते व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेताना कुटुंबातील सदस्यांना माहिती ठेवण्यास मदत करते.

हेल्थ अॅडव्हंटएज : जागतिक नागरिकांसाठी ही एक प्रमुख ऑफर आहे. यामध्ये देशांतर्गत आणि जगभरातील आंतरराष्ट्रीय कव्हरेजचा समावेश आहे. यामध्ये हॉस्पिटलायझेशनपूर्व आणि रुग्णालय उपचारानंतर, अमर्यादित दूरसंचार सल्ला, हवाई रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सहाय्य सेवांचा समावेश आहे.

बीफिट : ही कॅशलेस ओपीडी पॉलिसी म्हणून नुकतीच आणि उद्योगात अशा प्रकारचा पहिलाच विमा सादर केला गेला आहे. बीफिट (BeFit) हे खोकला/सर्दी किंवा हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता नसलेल्या किरकोळ दुखापतींसारख्या सामान्य आजारांना कवच प्रदान करते. हे नुकसानभरपाई आरोग्य उत्पादनांसाठी अॅड-ऑन रायडर आहे. नियमित ओपीडी सल्लामसलत, निदान चाचण्या, फिजिओथेरपी आणि फार्मसी बिलांसाठी समग्र कवच याद्वारे सक्षम होते. हा विमा सुरुवातीला २० ठिकाणी लॉन्च केला गेला होता. आता ५० ठिकाणी पोहोचला आहे.

सर्वसमावेशक आरोग्य विमा (CHI) आणि हेल्थ बूस्टर : आमच्याकडे सीएचआय, हेल्थ बूस्टर, क्रिटीशिल्ड (CritiShield) आणि फॅमिलीशिल्ड (FamilyShield) सारखी अनेक विभागातील आणि वयोगटातील उत्पादने आहेत, जी कंपनीच्या निरंतर काळजी तत्वज्ञानाच्या अनुषंगाने किरकोळ आरोग्य उत्पादनांमध्ये सर्वसमावेशकरित्या पसरली आहेत.

मोटार फ्लोटर विमा : ग्राहक त्यांच्या सर्व वाहन विम्यासाठी एकल पॉलिसी, एकच नूतनीकरण तारीख आणि एकच प्रीमियम, अशा सोयीचा आनंद घेऊ शकतात. या उत्पादनाची निवड करणाऱ्या ग्राहकांना या ऑफरअंतर्गत विमा उतरवलेल्या त्यांच्या एकाहून अधिक वाहनांसाठी परवडणारा प्रीमियम प्रदान केला जातो.

टेलीमॅटिक्स अॅड-ऑन : हे अॅड-ऑन कवच मूळ वाहन विमा उत्पादनाला ‘अॅसेट कम यूसेज’ आधारित उत्पादनामध्ये रूपांतरित करते. हे मूळ वाहन विम्यासाठी आकारला जाणारा प्रीमियम अंशतः वापरावर अवलंबून असेल.

० पे-एज-यू-यूज (PAYU) प्लॅन : ग्राहकांना वापरावर अवलंबून वेगवेगळ्या ‘किलोमीटर प्लॅन’ मधून निवडण्याची लवचिकता यांत प्रदान केली जाते. म्हणून, विम्याचा प्रीमियम फक्त वाहन वापरल्याच्या मर्यादेपर्यंत किंवा ग्राहकाने वापर केल्याच्या अंदाजापर्यंत मर्यादित आहे.

o पे-हाऊ-यू-यूज (PHYU) योजना : या योजनेंतर्गत, वाहन चालविण्याच्या वर्तन गुणांनुसार प्रीमियम शुल्कात बदल होतो. उत्तम ड्रायव्हिंग वर्तन असलेले ग्राहक पॉलिसीच्या मूळ प्रीमियमवर आकर्षक सवलतींचा लाभ घेऊ शकतात.

इमर्जन्सी मेडिकल एक्स्पेन्स कव्हर (EME) : ईएमई हे अॅड-ऑन असून वाहनातील रहिवाशांना वैद्यकीय खर्च आणि अपघात झाल्यास रुग्णालयाच्या दैनंदिन रोख खर्चाच्या लाभाला संरक्षण देते.

इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट (EMI) प्रोटेक्ट : ईएमआय कवच हे अॅड-ऑन असून वाहन अपघातात गुंतलेल्या प्रकरणांसाठी लागू होते. ज्या विमाधारकाचे वाहन गॅरेजमध्ये दुरुस्तीखाली आहे अशा एकूण देय मासिक हफ्त्याच्या रक्कमेचा समावेश होतो.

क्लब रॉयल होम इन्शुरन्स : विमाधारकाच्या केवळ निवासी युनिट्सशीच नव्हे तर त्यांचे कुटुंब, पाळीव प्राणी आणि नियुक्त कर्मचार्‍यांसाठीदेखील संपूर्ण संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी हे कवच असून केवळ उच्चभ्रू बेससाठी तयार केलेले आहे. हे उत्पादन एकाच पॉलिसीमध्ये अनेक मालमत्ता आणि स्थानांचा विमा उतरवण्याच्या व्यवहार्यतेसह घरमालकांसाठी आहे. हे अॅड-ऑनच्या विस्तृत श्रेणीसह एक व्यापक उत्पादन आहे, जे आवश्यकतेनुसार सानुकूलित केले जाऊ शकते.

व्हॉयेजर ट्रॅव्हल इन्शुरन्स : हे या उत्पादनांतर्गत नवीन कवच आहे. स्वयं-चालित सुट्टी, समुद्र पर्यटन इत्यादी विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करते आणि प्रवाशांची बदलती जीवनशैली आणि प्राधान्ये प्रतिबिंबित करते. समूह आणि कॉर्पोरेट कव्हरेजसाठी एकच उपाय असलेले हे उत्पादन एक वर्षापर्यंतच्या देशांतर्गत आणि परदेशातील प्रवासाला संरक्षण प्रदान करते.

दायित्व फ्लोटर : लघु व मध्यम उद्योजक किंवा स्टार्टअपसाठी व्यापक दायित्व संरक्षणाचा यांत समावेश आहे. ज्यामध्ये सायबर, कर्मचारी अप्रामाणिकता, संचालक, व्यावसायिक नुकसानभरपाई किंवा व्यावसायिक सामान्य उत्तरदायित्व यांचा समावेश आहे.

ड्रोन विमा : ड्रोन उत्पादक/ऑपरेटर्स किंवा लॉजिस्टिक कंपन्यांना कॅटरिंग आणि पेलोडसह ड्रोनची होणारी चोरी/तोटा किंवा नुकसानीविरुद्ध सर्वसमावेशक विमा ऑफर यांत आहे.

किरकोळ सायबर दायित्व विमा : व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक किंवा प्रतिष्ठेचे नुकसान होऊ शकणाऱ्या कोणत्याही सायबर फसवणुकीपासून किंवा डिजिटल जोखमींपासून यांत संरक्षण मिळते.

आयसीआयसीआय लोम्बार्ड ही कंपनी नवकल्पनांवर आधारित आहे आणि ही उपरोक्त उत्पादने त्याचाच एक मजबूत पुरावा आहे. आयसीआयसीआय लोम्बार्ड विविध तंत्रज्ञान-सक्षम उपाय ऑफर करते. २४ लाखाहूच अधिक डाउनलोड असलेले आयएल टेककेअर (IL TakeCare) अॅप हे त्याचे सक्षम उदाहरण आहे. हे वापरकर्त्यांना पॉलिसी खरेदी करण्यास, दावे हाताळण्यास आणि त्याच प्लॅटफॉर्मवर त्यांचे नूतनीकरण करण्याची सोय देते. हे सर्व कायम राखताना अखंड ग्राहक अनुभव महत्त्वाचा ठरतो. या व्यतिरिक्त आयसीआयसीआय लोम्बार्डमध्ये आरआयए (रिस्पॉन्सिव्ह इंटेलिजेंट असिस्टंट), एक एनएलपी- सक्षम चॅटबॉटदेखील आहे, जो अंतिम-वापरकर्त्यांचा अनुभव द्विगुणित करतो.

Previous Post

शिंदे गटाकडून ‘दसरा मेळावा’ हायजॅक करण्याची तयारी, भाजपच्याही पडद्यामागून हालचाली

Next Post

एआयएमएस’तर्फे व्यवस्थापन शिक्षणविषयक परिसंवाद

newshindindia

newshindindia

Next Post
एआयएमएस’तर्फे व्यवस्थापन शिक्षणविषयक परिसंवाद

एआयएमएस’तर्फे व्यवस्थापन शिक्षणविषयक परिसंवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 86.2k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
NIAची देशभरात मोठी कारवाई! ६ राज्यांत १३ ठिकाणांवर छापे; नांदेड, कोल्हापुरातून २ संशयितांना अटक

NIAची देशभरात मोठी कारवाई! ६ राज्यांत १३ ठिकाणांवर छापे; नांदेड, कोल्हापुरातून २ संशयितांना अटक

July 31, 2022

ओम्नी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत केडीए हॉस्पिटल अंतिम फेरीत

November 25, 2022
दि क्लास ऑफ २०२२: भारताची पहिली एनईपीसाठी तयार बॅच विजयभूमी युनिव्हर्सिटीमध्ये लिबरल प्रोफेशनल करिक्युलम पदवीसह सज्ज

दि क्लास ऑफ २०२२: भारताची पहिली एनईपीसाठी तयार बॅच विजयभूमी युनिव्हर्सिटीमध्ये लिबरल प्रोफेशनल करिक्युलम पदवीसह सज्ज

September 29, 2022
एनएमपीएल: वाशी वॉरीअरची विजयी सलामी

एनएमपीएल: वाशी वॉरीअरची विजयी सलामी

February 28, 2023

नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या भारतीय नवोन्मेष निर्देशांक 2021 मध्ये कर्नाटक, मणिपूर आणि चंदिगढ अव्वल स्थानी

0

प्रौढांच्या लसीकरण संदर्भात अपोलो – आयएमए वैज्ञानिक सत्राचे आयोजन

0
प्रौढांच्या लसीकरण संदर्भात अपोलो – आयएमए वैज्ञानिक सत्राचे आयोजन

प्रौढांच्या लसीकरण संदर्भात अपोलो – आयएमए वैज्ञानिक सत्राचे आयोजन

0

जीवन विमा आणि हमीपूर्ण लाभ देणारे वन प्रीमियम पेमेंट – ‘गॅरण्‍टीड वन पे अ‍ॅडवाण्‍टेज प्‍लान’ कॅनरा एचएसबीसी लाइफ इन्‍शुरन्‍सचा नॉन-लिंक्‍ड नॉन-पार्टिसिपेटिंग इंडिव्हिज्‍युअल सेव्हिंग्‍ज लाइफ इन्‍शुरन्‍स प्‍लान*

0
धड आत, पाय बाहेर; रुग्णाला नेताना लिफ्ट अचानक तुटली, वाचवताना डॉक्टरही… Video VIRAL

धड आत, पाय बाहेर; रुग्णाला नेताना लिफ्ट अचानक तुटली, वाचवताना डॉक्टरही… Video VIRAL

June 4, 2023
“तो आम्हाला…”,.. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांचा एकेरी उल्लेख केला

“तो आम्हाला…”,.. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांचा एकेरी उल्लेख केला

June 4, 2023

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी तेलंगणामधील हैदराबाद येथे तिसऱ्या जी 20 आरोग्य कार्यगटाच्या बैठकीच्या उद्घाटन सत्राला केले संबोधित

June 4, 2023
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींचं निधन; हिंदी मराठी चारशे सिनेमांमध्ये अभिनय

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींचं निधन; हिंदी मराठी चारशे सिनेमांमध्ये अभिनय

June 4, 2023

Recent News

धड आत, पाय बाहेर; रुग्णाला नेताना लिफ्ट अचानक तुटली, वाचवताना डॉक्टरही… Video VIRAL

धड आत, पाय बाहेर; रुग्णाला नेताना लिफ्ट अचानक तुटली, वाचवताना डॉक्टरही… Video VIRAL

June 4, 2023
“तो आम्हाला…”,.. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांचा एकेरी उल्लेख केला

“तो आम्हाला…”,.. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांचा एकेरी उल्लेख केला

June 4, 2023

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी तेलंगणामधील हैदराबाद येथे तिसऱ्या जी 20 आरोग्य कार्यगटाच्या बैठकीच्या उद्घाटन सत्राला केले संबोधित

June 4, 2023
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींचं निधन; हिंदी मराठी चारशे सिनेमांमध्ये अभिनय

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींचं निधन; हिंदी मराठी चारशे सिनेमांमध्ये अभिनय

June 4, 2023
newshindindia

News Hind India is the best news website. It provides news from many areas.

Follow Us

Browse by Category

  • Articals
  • Automobile
  • BHAKTI DHAM
  • Book launch
  • Breaking News
  • Business
  • CRIME NEWS
  • DRAMA
  • Editor’s Picks
  • Education
  • Entertainment
  • Finance
  • General
  • Health
  • HINDI MOVIE
  • INCIDENT
  • INTERNATION NEWS
  • IPO AND MARKET NEWS
  • JOB AND VACANCY
  • Lifestyle
  • MARATHI CINEMA
  • New Products
  • New store
  • OTT
  • Political
  • political news
  • Public Interest
  • Real Estate
  • social news
  • SONG LAUNCH
  • Sports
  • STORE LAUNCH
  • T.V. SERIAL
  • TAKE OF NEWS
  • Technology
  • Tourism
  • Trailer Launch
  • Uncategorized

Recent News

धड आत, पाय बाहेर; रुग्णाला नेताना लिफ्ट अचानक तुटली, वाचवताना डॉक्टरही… Video VIRAL

धड आत, पाय बाहेर; रुग्णाला नेताना लिफ्ट अचानक तुटली, वाचवताना डॉक्टरही… Video VIRAL

June 4, 2023
“तो आम्हाला…”,.. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांचा एकेरी उल्लेख केला

“तो आम्हाला…”,.. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांचा एकेरी उल्लेख केला

June 4, 2023
  • About Us
  • Contact Us
  • Advertise
  • Privacy & Policy

© 2022 News Hind India - Rights Reserved by NewsReach.

No Result
View All Result

© 2022 News Hind India - Rights Reserved by NewsReach.