मुंबई : लवकरच येऊ घातलेल्या मनपा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर सेनेच्या नगरसेवकांसाठी गळ टाकणार जाणार आहे. त्यासाठी ‘कॅग’ ऑडिट आधार घेऊन जाणार आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपा आड सेनेच्या नगरसेवकांसाठी गळ टाकणार. भाजपबरोबर गेले चौकशीचा ससेमिरा संपतो हा अनुभव लक्षात घेता भ्रष्ट नगरसेवक पटापट भाजपात उड्या मारणार एवढे निश्चित. पर्यायाने सेनेला देखिल मुंबईत खिंडार पडेल. भाजपला काहीही करुन मुंबई मनपा ताब्यात घ्यायची आहे. मुंबई पालिकेतील काही कामांत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे या कामांचे ‘कॅग’ ऑडिट केले जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली.
विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, मुंबई महापालिका संदर्भात अनेक सदस्य बोलले. कोविड सेंटर घोटाळे, रस्त्याची गुणवत्ता असे अनेक विषय आले. पण आता दर्जेदार कामांवर भर देण्यात येईल. रस्ते हा प्राधान्यक्रमाचा विषय आहे.
सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काने घरे
आश्रय योजनेतील भ्रष्टाचारासंदर्भात सुद्धा तपासून पाहण्यात येईल. आधीच्या सरकारने सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काने देऊ नये, असे म्हटले होते. मात्र, आमचे सरकार २९ हजार सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काने देईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली.