मुंबई : गणेशोत्सव काळात अनेक नागरिक रात्री गणपती दर्शन आणि सजावट पाहण्यासाठी बाहेर जातात. यावेळी सार्वजनिक वाहतूक सुविधा नसल्याने नागरिकांची दरवर्षी मोठ्या प्रमाणात गैरसोय होते त्यामुळेच बेस्ट उपक्रमाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव काळात ३१ ऑगस्ट २०२२ ते ८ सप्टेंबर २०२२ पर्यंत बेस्ट उपक्रमाने २५ गणपती नाईट स्पेशल बस गाड्यांचे नियोजन केले आहे
या गणपती स्पेशल गाड्या रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत चालवल्या जातील. या गाड्यांचे क्रमांक व मार्ग खालीलप्रमाणे आहेत. सदर गाड्या दर १ तासाने चालवल्या जातील
बसक्रमांक बसमार्ग ( पासून) पर्यंत
१ मर्यादित : इलेक्ट्रिक हाऊस, कुलाबा आगार वांद्रे रेक्लेमेशन बस स्थानक
४ मर्यादित : ओशिवरा आगार सर जे.जे.रुग्णालय
७ मर्यादित : विक्रोळी आगार सर जे.जे. रुग्णालय
८ मर्यादित : शिवाजी नगर सर जे.जे. रुग्णालय
६६ मर्यादित : राणी लक्ष्मीबाई चौक कुलाबा आगार
२०२ मर्यादित : माहिम बस स्थानक बोरिवली स्थानक ( पश्चिम)
C-३०२ : राणी लक्ष्मीबाई चौक महाराणा प्रताप चौक (मुलुंड)
C-३०५ : बॅकबे आगार धारावी आगार
C-४४० : माहिम बस स्थानक बोरिवली स्थानक ( पूर्व)
सदर मार्गावर तसेच इतर भागात प्रवाशांच्या मागणीप्रमाणे अतिरिक्त बस वाढवण्याचा विचार केला जाईल. प्रवासी सुद्धा विशेष गाड्यांसाठी उपक्रमाकडे मागणी करू शकतात. गणेशोत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी उपक्रमाने या गाड्यांचे नियोजन केले असून यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सोयीचा होऊन पैसेही वाचतील अशी माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली आहे.