मुंबई , ऑगस्ट २०२२: पावसाच्या आगमनासह तापमानामध्ये थंडावा निर्माण होत असल्यामुळे वॉटर हिटर्स आरामदायी उबदार आंघोळीच्या आनंदासाठी आवश्यक घटक बनले आहेत. आज आरोग्य व स्वच्छतेला अधिक प्राधान्य दिले जात असल्यामुळे गरम पाण्यासह दिवसभर उर्जा मिळण्यासाठी किंवा दिवसाखेर ताजेतवाने होण्यासाठी इतर कोणताही सर्वोत्तम अॅण्टीडोट नाही. ८० वर्षांच्या संपन्न कार्यक्षमतेचा अनुभव आणत आणि ग्राहकांसाठी आपले स्मार्ट नवोन्मष्कार उंचावत क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स लि.ने त्यांची स्मार्ट स्टोरेज वॉटर हिटर सिरीज – ”सोलारियम क्यूब आयओटी” आणि ”सोलारियम केअर”चे अनावरण केले आहे. कंपनीच्या उच्च प्रमाणित व प्रशंसा करण्यात आलेल्या सोलारियम श्रेणीमधील नवीन प्रगत वॉटर हिटरमध्ये स्टाइलच्या आकर्षकतेसोबत स्मार्टनेस आहे, तसेच यामधील नवोन्मेष्कारी वैशिष्ट्ये सुलभ सोयीसुविधा देतात.
ही श्रेणी १५ लिटरच्या क्षमतेसाठी १७,००० रूपये आणि २५ लिटरच्या क्षमतेसाठी १८,५०० रूपये या किंमतीमध्ये येते. ही श्रेणी भारतातील बाजारपेठांमध्ये, तसेच ई-कॉमर्सवर उपलब्ध आहे.
क्रॉम्प्टनचे सोलारियम केअर स्टोरेज वॉटर हिटर्स ‘तुमच्या प्रियजनांसाठी परिपूर्ण केअर’ची खात्री घेण्यासाठी आहेत. सर्व स्वरूपांमध्ये केअर घेणार्या या उत्पादनांमध्ये सानुकूल किंवा प्री-सेट बाथिंग मोड्स आहेत, जसे १) बेबी केअर – अद्वितीय टेम्परेचर सेटिंग, जे तान्ह्या बाळांमधील नकळतपणे गरम पाण्यामुळे येणारे चट्टे किंवा भाजण्यापासून संरक्षण करते, त्यांच्या त्वचेसाठी अनुकूल आहे. २) हायजिन केअर – अद्वितीय टेम्परेचर सेटिंग, जे पाण्यामधील जीवाणू व विषाणूंना नष्ट करते आणि तुमच्या प्रियजनांसाठी स्वच्छ पाणी देते. ३) हेअर केअर – अद्वितीय टेम्परेचर सेटिंग, जे तुमच्या केसामधील धूळ व तेल दूर करण्यासाठी शॅम्पूसह टाळू मसाजकरिता सर्वोत्तम आहे आणि ज्यामधून तुमचे केस आरामदायीपणे धुतले जाण्याची खात्री मिळते. परिपूर्ण केअरिंग वॉटर हिटर असलेल्या या उत्पादनाची काही अतिरिक्त वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:
ही श्रेणी ६ लिटर, १० लिटर, १५ लिटर व २५ लिटर क्षमतांमध्ये येते, ज्यांची किंमत १२,५०० रूपये ते १४,८०० रूपयांपर्यंत आहे. ही श्रेणी भारतातील बाजारपेठांमध्ये, तसेच ई-कॉमर्सवर उपलब्ध आहे.
या आधुनिक नवोन्मेष्काराबाबत सांगताना क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स लि.च्या अप्लायन्स बिझनेसचे उपाध्यक्ष श्री. सचिन फर्तियाल म्हणाले, ”स्मार्ट सोल्यूशन्स आज तंत्रज्ञानाचे भविष्य आहेत, जेथे ग्राहक ते जगत असलेल्या जीवनशैलीमध्ये सतत आरामदायीपणा व सोयीसुविधेचा शोध घेत आहेत. वॉटर हिटर्स हे प्रत्येक घरातील आवश्यक अप्लायन्स आहेत, कारण ते थंड दिवसांमध्ये प्रत्येकाला पाहिजे असलेले त्वरित गरम पाणी देतात. क्रॉम्प्टनला वॉटर हिटर्सच्या गरजेसोबत स्मार्ट उत्पादने आपल्या जीवनामध्ये आणू शकणार्या सोयीसुविधा देखील माहित आहेत. म्हणून आधुनिक तंत्रज्ञान व पारंपारिक वॉटर हिटरच्या डिजिटायझेशनचे संयोजन करत आमचा या नवोन्मेष्काराला सर्व पिढ्यांसाठी अधिक सोईस्कर व त्रासमुक्त करण्याचा मनसुबा आहे. तुम्हाला आरामदायीपणा व सुलभ सुविधा देत आम्ही आशा करतो की, आमची नवीन स्मार्ट श्रेणी तुमचे जीवन अधिक आरामदायी व काहीसे परिपूर्ण करेल.”