मुंबई, २०२२: सिग्निफाय (Signify) (युरोनेक्स्ट: LIGHT) या लायटिंगमधील जागतिक अग्रणी कंपनीने नवी मुंबई, भारत येथील डीवाय पाटील स्पोर्टस् स्टेडियममध्ये कनेक्टेड लायटिंग सिस्टिम इंटरॅक्ट स्पोर्टस् (Interact Sports) स्थापित केली आहे. ५५,००० प्रेक्षक क्षमता असलेले हे बहुउद्देशीय स्टेडियम भारतातील या दर्जाचे सर्वात मोठे खाजगी मालकीचे स्टेडियम आहे आणि या स्टेडियममध्ये जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी क्रिकेट स्पर्धा ‘इंडियन प्रीमियर लीग’च्या तीन सत्रांचे २००८, २०१० व नुकतेच २०२२ मध्ये आयोजन करण्यात आले.
सिग्निफायने स्टेडियममध्ये ४०८ फिलिप्स स्पोर्टस् स्टार एलईडी ल्युमिनरीज स्थापित केल्या आहेत, ज्या त्यांच्या डीएमएक्स नेटवर्किंग कंट्रोल सिस्टिमसह सुसज्ज आहेत, ज्यामुळे प्रत्येक ल्यूमिनर वैयक्तिकरित्या पाहण्यास मिळते. स्टेडियममध्ये या ल्युमिनरीज पूर्णपणे स्विच ऑन करता येतात किंवा सामन्याच्या ब्रेक्सदरम्यान ते डिम करत अद्भुत रोषणाईने भरलेले शोज निर्माण करता येतात. हे सर्व अगदी सुलभपणे करता येऊ शकते, ज्याचे श्रेय सिग्निफायच्या इंटरॅक्ट स्पोर्टस् (Interact Sports) कनेक्टेड लायटिंग सिस्टिमला जाते. कंपनीने स्टेडियमला इत्यंभूत सोल्यूशन दिले, ज्यामध्ये लायटिंग डिझाइन, चाचणी, कार्यसंचालन आणि अधिक वॉरंटी सपोर्टचा समावेश आहे.
आज स्टेडियम्स बहुउद्देशीय हब बनत आहेत आणि डीवाय पाटील स्टेडियम देखील अत्यंत वैविध्यपूर्ण बनले आहे. हे स्टेडियम अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट व फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करत आहे आणि स्टेडियमसाठी संबंधित खेळाच्या मानकांनुसार विशिष्ट ल्युमिनेशन (रोषणाई) आवश्यकता पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. अद्ययावत लायटिंग सिस्टिमसह स्टेडियम आता मैदानावर खेळल्या जाणार्या सामन्यासाठी आवश्यक असलेल्या लायटिंग सेटिंग्जमध्ये सहजपणे स्विच होऊ शकते.
या प्रकल्पाबाबत बोलताना सिग्निफाय साऊथ एशियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक सुमित जोशी म्हणाले, ”आम्हाला आमच्या इंटरॅक्ट स्पोर्टस् (Interact Sports) कनेक्टेड लायटिंग सिस्टिमसह भारतातील सर्वात वैविध्यपूर्ण स्पोर्टस् स्टेडियमला रोषणाईसह प्रकाशमय करण्याचा अभिमान वाटतो. डीवाय पाटील स्पोर्टस् स्टेडियम देशभरातील चाहत्यांसाठी एक अतुलनीय आणि अविस्मरणीय खेळ पाहण्याचा अनुभव देते, जे इंडियन प्रीमियर लीगच्या नुकत्याच संपलेल्या हंगामात दिसून आले. सामन्यांदरम्यानच्या अनोख्या लाइट शोने अभूतपूर्व अनुभव निर्माण केला आणि स्टेडियमला भेट देणार्या क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचा नवीन स्तर निर्माण केला आणि मला खात्री आहे की, हा अनुभव त्यांच्या स्मरणात कायमस्वरूपी राहिल.”
८० वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आणि स्पोर्टस् लायटिंगमधील जागतिक अग्रणी म्हणून मान्यता असलेल्या सिग्निफायने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे, तसेच भारतासह जगभरातील प्रमुख स्टेडियम्समध्ये त्यांचे उच्च दर्जाचे व्यावसायिक लायटिंग सोल्यूशन्स यशस्वीरित्या स्थापित केले आहेत.