मुंबई, २२ ऑगस्ट २०२२ – एल अँड टीच्या उर्जा व्यवसायाच्या हायड्रोकार्बन- ऑनशोअर विभागाला इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून (आयओसीएल) मोठे कंत्राट मिळाले आहे.
आयओसीएल पानीपत रिफायनरी एक्सपान्शन (पी-२५) प्रकल्प राबवत असून त्याद्वारे शुद्धीकरणाची क्षमता १५ एमएमटीपीएवरून २५ एमएमटीपीएपर्यंत वाढवली जाणार आहे. क्षमता वाढवण्यामागे पेट्रोलियम उत्पादनांना असलेली मागणी पुरवणे, नफा वाढवणे आणि दीर्घकाळात स्पर्धात्मकता टिकवून ठेवण्याचे उद्दिष्ट आहे.
या पी- २५ प्रकल्पासाठी रेसिड्यू हायड्रोक्रॅकर युनिट (आरएचसीयू) स्थापन करण्यासाठी अभियांत्रिकी, खरेदी, बांधकाम आणि अमलबजावणी (ईपीसीसी) पद्धतीचे कंत्राट देण्यात आले आहे. आरएचसीयूला अक्सेन्सकडून (फ्रान्स) २.५ एमएमटीपी क्षमतेसह परवाना मिळाला आहे आणि त्यातून व्हॅक्यूम रेसिड्यू (व्हीआर) हाय व्हॉल्व्ह कमर्शियल उत्पादनापर्यंत (प्रामुख्याने डिझेल) अद्ययावत केला जाणार आहे. हे कंत्राट आंतरराष्ट्रीय बिडिंगमधून लम सम टर्नकी (एलएसटीके) पद्धतीनुसार देण्यात आले आहे.
यापूर्वी एल अँड टीने यापूर्वी पानीपत रिफायनरीच्या पी- २५ प्रकल्पासाठी डीएचडीटी युनिट (५.० एमएमटीपीए, शेलचा परवाना) स्थापन करण्यासाठी ईपीसीसी कंत्राट मिळवले होते.
हे कंत्राट मिळाल्याबद्दल श्री. सुब्रमण्यम सर्मा, पूर्ण वेळ संचालक आणि वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष (उर्जा) म्हणाले, ‘आयओसीएल- पानीपत या मोठ्या विस्तार प्रकल्पाचा भाग होताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या क्षमतांवर विश्वास ठेवल्याबद्दल मी आयओसीएलचे आभार मानतो. हे गुंतागुंतीचे प्रक्रिया युनिट एचएसई व दर्जाच्या उच्च पातळीसह वितरित करण्यासाठी आम्ही बांधील आहोत.’
एल अँड टी उर्जा व्यवसायाच्या हायड्रोकार्बन विभाग ऑफशोअर, ऑनशोअर, बांधकाम सेवा, मॉड्युलर फॅब्रिकेशन आणि अडव्हान्स्ड व्हॅल्यू इंजिनियरिंग अँड टेक्नोलॉजी (अडव्हन्ट) अंतर्गत संघटित असून त्याद्वारे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय ग्राहकांना सर्वसमावेशक डिझाइन टु बिल्ट सुविधा दिल्या जातात. तीन दशकांचा प्रदीर्घ अनुभव असलेला हा व्यवसाय प्रकल्प व्यवस्थापन, कॉर्पोरेट प्रशासन, दर्जा, एचएसई आणि कार्यकारी गुणवत्ता अशा विविध क्षेत्रांत जागतिक मापदंड प्रस्थापित करत आहे.