मुंबई; 22 ऑगस्ट, 2022: बाजारपेठेतील नामांकित गुंतवणूकदार शंकर शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रसिद्ध गुंतवणुकदारांनी अन्नपूर्णा स्वादिष्ट लिमिटेड या कोलकाता-स्थित पाकिटबंद न्याहारी, अन्न आणि पेयपान उत्पादने उपलब्ध करून देणाऱ्या कंपनीच्या आगामी प्रारंभीक सार्वजनिक प्रस्तावात गुंतवणूक केली आहे. अन्नपूर्णा स्वादिष्टने 26 जुलै 2022 रोजी एनएसई इमर्जवर प्रस्तावित प्रारंभीक सार्वजनिक प्रस्ताव (आयपीओ) करिता ड्राफ्ट रेड हेंरिंग प्रॉस्पेक्ट (डीआरएचपी)ची नोंद केली.
शंकर शर्मा हे भारताचे सर्वात प्रसिद्ध गुंतवणूकदार असून फर्स्ट ग्लोबलचे संस्थापक आहेत. ते स्वत:च्या वैयक्तिक क्षमतेत पुढे आले आहेत. त्याशिवाय जीएमओ सिंगापूर पीटीईचे भूतपूर्व भागीदार अमीत भारतीया यांनीही वैयक्तिक क्षमतेत गुंतवणूक केली आहे. भारतीया हे सध्या जीएमओच्या इमर्जिंग मार्केट्स इक्विटी टीम अँड ओव्हरसीज फंडामेंटल रिसर्चचे पोर्टफोलिओ मॅनेजर आहेत.
अन्य नामांकित संस्थात्मक गुंतवणुकदारांत एनएव्ही कॅपिटल इमर्जिंग स्टार फंड आणि राजस्थान ग्लोबल सिक्युरिटीज, पात्र संस्थात्मक गुंतवणुकदाराचा समावेश आहे. हे एसएमई क्षेत्रातील एक सर्वात मोठे गुंतवणूकदार असून त्यांनी कंपनीच्या पूर्व-आयपीओ भागात गुंतवणूक केली.
अन्नपूर्णा स्वादिष्टच्या आयपीओत 43.22 लाख इक्विटी समभाग (दर्शनी मूल्य रू 10) प्रस्ताव बुक-बिल्डिंग मार्गाने समाविष्ट करून घेण्यात आले. कॉर्पोरेट कॅपिटल व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड, हा प्रस्तावाचा लीड मॅनेजर असून कंपनीच्या वतीने पूर्व-आयपीओ आणि आयपीओ-पश्चात प्रक्रिया चालवणार आहेत. स्कायलाईन फायनान्शियल सर्विस प्रायव्हेट लिमिटेडला या प्रस्तावाचा रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
या आयपीओमधून जमा होणाऱ्या रकमेचा विनियोग अन्नपूर्णा स्वादिष्ट आपल्या विकास योजनेकरिता करणार आहे – ज्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये अतिरिक्त निर्मिती युनिट्सच्या निर्मितीसह पूर्व ते ईशान्य राज्यांत उत्पादन श्रेणीच्या विस्तार अंतर्भूत असेल.
अन्नपूर्णा स्वादिष्टच्या कामकाजाची सुरुवात 2016 दरम्यान झाली. तिचे कामकाज 35 हून अधिक एसकेयुजपेक्षा अधिक उत्पादन श्रेणीपासून पॅलेट आधारित खाऊ ते मधल्या वेळेत खाण्यायोग्य बटाट्याचे न्याहारी पदार्थ, नमकीन, कँडी आणि केकचा समावेश आहे. सह-संस्थापक आणि अध्यक्ष श्रीराम बंगा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या कंपनीची पश्चिम बंगालमध्ये दोन निर्मिती केंद्रे आहेत. या निर्मिती केंद्रांत रू 1.00 ते रू 5.00 किंमतीचे गोड आणि चवदार पाकीटबंद पदार्थ थेट बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओधिशा आणि आसाममध्ये विकण्यात येतात. सध्या सुमारे 400 वितरक आहेत.
जून 2022 मध्ये अन्नपूर्णा स्वादिष्टने रू 11.05 कोटी (युएसडी 1.4दशलक्ष) च्या मासिक विक्रीची नोंद केली आणि सध्या 235 कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीने अलीकडे ओलंकार श्रेणी उत्पादनासह डायरेक्ट-टू-कस्टमर (डी2सी)मध्ये प्रवेश केला असून बिग बास्केटसोबत वितरणाकरिता भागीदारी करण्यात आली आहे.
To learn more about the company, visit http://www.annapurnasnacks.in.