मुंबई, ऑगस्ट २०२२ : डायलिसिसवर असलेल्या रुग्णांच्या देखभालीची व्याख्या नव्याने घडविण्यावर भर देणारे भारताचे सर्वात मोठे डायलिसिस नेटवर्क नेफ्रोप्लसने आपल्या सेंटर्सशी जोडलेल्या तसेच इतरही सर्व डायलिसिस रुग्णांसाठी प्रेरणादायी ठरणा-या ‘गेस्ट गॉट टॅलेंट’ या बहुप्रतिक्षित कार्यक्रमाच्या चौथ्या पर्वासाठी ‘कॉल टू एंट्री’ अर्थात नावनोंदणीसाठीचे आवाहन जारी केले आहे. डायलिसिस रुग्णांकडून जिची अत्यंत उस्तुकतेने वाट पाहिली जाते अशी ही डिजिटल स्पर्धा म्हणजे नेफ्रोप्लसद्वारे आपल्या ‘गेस्ट्स’ना म्हणजे डायलिसिसवर असलेल्या व्यक्तींना आपल्या कौशल्यांचे आणि कल्पकतेचे प्रदर्शन करण्याची संधी देणारा व त्यांच्या जगण्याला एक नवा अर्थ मिळवून देणारा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. १ ऑगस्ट २०२२ पासून या आगळ्यावेगळ्या स्पर्धेसाठी नावनोंदणी सुरू झाली असून ती महिनाभर चालू राहणार आहे.
या स्पर्धेमध्ये सहभागी होणे अगदी सहजसोपे आहे. सहभागींना आपले कौशल्य दाखविणारा एका मिनिटाचा ऑडिओ, व्हिडिओ किंवा एखादे छायाचित्र अपलोड करायचे आहे आणि फेसबुकवरील www.facebook.com/NephroPlusDialysisNetwork/, इन्स्टाग्रामवरील (https://www.instagram.com/nephroplus/), ट्विटरवरील (https:// https://twitter.com/nephroplus,) अशा नेफ्रोप्लसच्या सोशल मीडिया हॅण्डल्सना टॅग करायचे आहे किंवा creatives@nephroplus.com येथे आपल्या प्रवेशिका मेल करायच्या आहेत. ही स्पर्धा सर्व डायलिसिस रुग्णांसाठी खुली आहे व इच्छुक स्पर्धकांनी आपले नाव, संपर्काचे तपशील, डायलिसिस सेंटर आणि शहर या माहितीसह आपल्या प्रवेशिका दाखल करायच्या आहेत. हा टॅलेंट हंट कार्यक्रम संपेपर्यंत दर आठवड्याला स्पर्धकांकडून आलेल्या एंट्रीज नेफ्रोप्लसद्वारे त्यांच्या सोशल मीडिया पेजवर अपलोड केल्या जातील.
सर्व प्रवेशिका परीक्षक मंडळाच्या मान्यवर सदस्यांकडून पडताळल्या जातील. स्पर्धकांची सर्जनशीलता, सादरीकरण, प्रभावीपणा आणि त्यामागील कष्ट या निकषांच्या आधारे काटेकोरपणे मूल्यमापन केल्यानंतर तीन विजेत्यांची निवड केली जाईल व त्यांना पारितोषिक दिले जाईल.
या शुभारंभी स्पर्धेचा माहौल तयार करताना नेफ्रोप्लसचे संस्थापक आणि सीईओ श्री. विक्रम वुप्पाला म्हणाले, “नेफ्रोप्लसमध्ये सर्व डायलिसिस रुग्णांना दर्जेदार डायलिसिस सेवा सहजतेने आणि परवडणा-या किंमतीत उपलब्ध व्हावी हा आमचा हेतू आहे आणि आमचे डायलिसिस गेस्ट्सनी गेल्या दशकभराहून अधिक काळापासून या हेतूवरील आमची श्रद्धा वारंवार दृढ केली आहे.