मुंबई, भारत १८ ऑगस्ट २०२२: नेक्स्ट जनरेशन, कार्बन न्यूट्रल इलेक्ट्रिक बस आणि वजनाने हलक्या व्यावसायिक वाहन कंपनी स्विच मोबिलिटी लिमिटेड (‘स्विच’)ने आज स्विच EiV 22 या भारतातील पहिल्या आणि अद्वितीय इलेक्ट्रिक डबल डेकर वातानुकूलित बसचे अनावरण केले. भारतात डिझाइन केलेली, विकसित आणि उत्पादित केलेली आणि स्विचच्या जागतिक इलेक्ट्रिक बस अनुभवाचा उपयोग करून बनवलेली स्विच EiV 22 नवीनतम तंत्रज्ञान, अति-आधुनिक डिझाइन, सर्वोच्च सुरक्षा आणि सर्वोत्तम आराम वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. नूतनीकृत आयकॉनिक बस देशातील सार्वजनिक वाहतुकीत क्रांती घडवून आणण्यासाठी डिझाइन करण्यात आली असून शहरांतर्गत बस मार्केटमध्ये नवीन मानके स्थापित करेल.
स्विच EiV 22 ही पॅकेजिंगच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे. त्यामुळे ती जगातील पहिली स्टँडर्ड फ्लोअर, वातानुकूलित, इलेक्ट्रिक डबल डेकर असून त्यामध्ये मागील ओव्हरहॅंगवर विस्तीर्ण दरवाजा आणि मागील पायऱ्या आहेत. डबल डेकरमध्ये हलक्या वजनाची अॅल्युमिनियम बांधणी आहे. त्यामुळे जास्त प्रवासी ते वजन गुणोत्तर मिळते आणि प्रति प्रवासी प्रति किमी वाजवी खर्च येतो.
भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी म्हणाले, “देशाच्या वाहतूक व्यवस्थेत दीर्घकालीन दृष्टीकोनातून परिवर्तन करण्याची गरज आहे. शहरी वाहतुकीत सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करून एकात्मिक ईव्ही दळणवळण परिसंस्थेच्या रुपातून आम्ही कमी कर्बठसा आणि उच्च प्रवासी घनता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. हरित उपाय सुविधांसाठी ग्राहकांच्या वाढत्या मागणीसह ईव्ही अंगिकाराच्या दिशेने सरकारची दृष्टी आणि धोरणे मदत करणारी आहेत. डबल डेकरला पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि मोठ्या स्तरावर प्रवासी आणि समाजाच्या फायद्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान सादर करण्यासाठी कटिबद्ध राहिल्याबद्दल मी अशोक लेलँडची उपकंपनी असलेल्या स्विच मोबिलिटीचे अभिनंदन करू इच्छितो.”
हिंदुजा ग्रुप ऑफ कंपनीज (इंडिया)चे अध्यक्ष श्री. अशोक हिंदुजा या सादरीकरणावर भाष्य करताना म्हणाले, “आज मुंबईत स्विच EiV 22 सादर करणे हा हिंदुजा ग्रुपमधील आम्हा सर्वांसाठी अतिशय अभिमानाचा क्षण आहे. अक्षय ऊर्जा, वित्त आणि शून्य उत्सर्जन वाहतूक यांच्या माध्यमातून नेट झीरो उद्दिष्ट गाठण्यासाठी अर्थव्यवस्थेला पाठबळ देण्याचा समूहाचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. आमची नवीन शून्य उत्सर्जन डबल डेकर बस भारत आणि जगासाठी असलेली आमची वचनबद्धता आणखी मजबूत करताना स्वच्छ आणि अधिक शाश्वत भविष्य निर्माण करेल याबद्दल आम्हाला विश्वास वाटतो.”
स्विच मोबिलिटीचे अध्यक्ष श्री. धीरज हिंदुजा या सादरीकरणाबद्दल बोलताना म्हणाले, “आम्ही भारतात प्रतिष्ठित डबल डेकर परत आणत असताना हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. अशोक लेलँडने पहिल्यांदा मुंबईत १९६७ मध्ये डबल डेकर सादर केली तेव्हा ते भारतीय उत्पादकांमध्ये अग्रणी होते आणि स्विच हा वारसा पुढे नेत आहे. भारत आणि यूके या दोन्ही देशांमध्ये डबल डेकरमध्ये आमच्या मजबूत कौशल्यासह आणि १०० हून अधिक स्विच इलेक्ट्रिक डबलसह यूकेच्या रस्त्यांवर सेवेत असताना आम्हाला केवळ डबल डेकर या आयकॉनला पुन्हा जिवंत करण्यातच आनंद होत आहे असे नाही तर भारत आणि जगासाठी हा फॉर्म फॅक्टर तयार करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला त्यातून बळकटी मिळत आहे.”
स्विच मोबिलिटी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि स्विच मोबिलिटी लिमिटेडचे सीओओ श्री महेश बाबू भारतीय बाजारपेठेसाठी ईव्ही डबल डेकर क्षेत्रामध्ये ब्रँडच्या प्रवेशाबद्दल बोलताना म्हणाले, “आम्हाला भारतातील पहिली आणि अद्वितीय स्विच EiV 22 इलेक्ट्रिक डबल डेकरचे अनावरण करताना आनंद होत आहे. प्रतिष्ठित डबल डेकरचा वारसा कायम ठेवत नवीन युगाच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही अनेक आव्हाने पेलण्याचा प्रयत्न केला आहे. स्विच EiV 22 भारतीय परिस्थितीला अनुरूप पद्धतीने डिझाइन आणि विकसित केली आहे. त्याच वेळी ती ग्राहकांना उत्कृष्ट आराम आणि आनंद प्रदान करते. मुंबई आणि डबल डेकर्स हे सार्वजनिक वाहतुकीचे समानार्थी शब्द आहेत आणि आम्हाला खात्री आहे की स्विच EiV 22 मुंबईकरांसाठी केवळ गोड आठवणीच परत आणणार नाही तर भारतात काळाची गरज असलेल्या सार्वजनिक वाहतुकीच्या क्षेत्रात शाश्वतता आणत वेगळा ठसा उमटवेल.”
सिंगल डेकर बसच्या तुलनेत स्विच इलेक्ट्रिक डबल डेकर एका फेरीत जवळपास दुप्पट प्रवाशांची वाहतूक करू शकते आणि कर्ब वजनात फक्त १८% वाढ होते. डबल डेकरचे आर्किटेक्चर जून २०२२ मध्ये सादर केलेल्या स्विच EiV 12 प्रमाणेच 650 V प्रणाली वापरते, जे स्विच e1 मध्ये देखील समान आहे.
समकालीन शैलीदार आणि अंतर्गत आणि बाह्य सुंदर रचनेसह डबल डेकरमध्ये विस्तीर्ण पुढचे आणि मागील दरवाजे, दोन जिने आणि नवीनतम सुरक्षा मानकांचे पालन करणारा आपत्कालीन दरवाजा आहे. एसी भारतातील उष्ण हवामानात प्रभावी शीतकरण देते तर नमूद केलेल्या फूटप्रिंट मध्ये जास्तीत जास्त ६५ प्रवाशांसाठी बसायची व्यवस्था यामध्ये आहे. प्रत्येक आसनावर हलक्या वजनाची उशी आहे आणि आतील भाग प्रवाशांच्या सोयीसाठी कारप्रमाणे आरामदायी आहेत. ही अत्याधुनिक इलेक्ट्रिक बस प्रति बसलेल्या प्रवाशासाठी कमी रस्ता, टर्मिनल आणि डेपो फ्लोअर जागा व्यापत असल्यामुळे शहरी प्रवासासाठी एक आदर्श उपाय सुविधा आहे.
पॉवरिंग स्विच EiV 22 हा 231 kWh क्षमता, 2-स्ट्रिंग, लिक्विड कूल्ड, ड्युअल गन चार्जिंग सिस्टमसह उच्च घनता NMC केमिस्ट्री बॅटरी पॅक आहे. हे शहरांतर्गत वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक डबल डेकरला २५० किमी पर्यंतची श्रेणी पुरवत सक्षम करते.
स्विच इंडियाने यापूर्वीच मुंबईत २०० इलेक्ट्रिक डबल डेकर बसेसची ऑर्डर मिळवली आहे आणि देशातील प्रमुख भागांमध्ये इलेक्ट्रिक डबल डेकर विभागामध्ये प्रबळ जागा शोधत आहे.
बसचे घटक भारतात तयार केले जातात जे FAME II अनुपालन साध्य करण्यास सक्षम होतील.