दिल्ली: इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने विदेशी चलन घेऊन जाणाऱ्या दोन भारतीयांना)अटक केली आहे. त्यांच्याकडे असलेल्या बांगड्यांच्या पेट्यांमधून सुमारे 27.50 लाख रुपये जप्त करण्यात आले. हे परकीय चलन आहे. दोन्ही प्रवासी मुंबईतून दिल्लीमार्गे बँकॉकला निघाले होते. दिल्ली विमातळावर बॅगांच्या तपासणी दरम्यान सीमाशुल्क विभागाला संशय आला. त्यानंतर बॅगा तपासल्या असता त्यामध्ये परकीय चलन आढळून आले. याघटनेनंतर सीमाशुल्क विभागाने दोघांनाही अटक केली आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी सुरु आहे. अटक करण्यात आलेले दोघे नेमके कॊण आहेत, त्याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. एएनआय या वृत्त संस्थेने या घटनेचा व्हिडीओ ट्विट करत ही माहिती दिली आहे.
सीमा शुल्क विभागाने दिल्ली विमानतळावर आरोपींची बॅगा तपासत असताना त्यामध्ये हे पैसे आढळून आले आहेत. आरोपीनी बॅगेत बांगड्यांच्या खोक्यात तळाला या विदेशी चलनाच्या नोटा चिटकवून ठेवल्या होत्या. त्यावर बांगड्यांचे सेट ठेवण्यात आले होते. सीमा शुक्क विभागाच्या अधिकाऱ्यांना बांगड्याचा दोन वेगवेगळ्या बॉक्समध्ये हे पैसे आढळून आले आहेत. यामध्ये , 19,200 किमतीचे यूएस डॉलर आणि 15,700 किमतीचे युरो सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी जप्त केले.
एएनआय शेअर केला व्हिडीओ
एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विटर शेअर केलेल्या दोन मिनिटांच्या व्हिडिओमध्ये ही बाब स्पष्ट होत आहे. सुटकेसमध्ये काळजीपूर्वक पॅक केलेल्या बांगड्या दिसत होत्या. जेव्हा एक बॉक्स उघडन्यात आला तेव्हा त्यामध्ये लाल रंगाच्या आणि सोन्याचे बांगड्या दिसत होत्या. मात्रत्याच्या कव्हर खाली हे पैसे लपवण्यात आले होते.