(बातमीदार – ईश्वरी सकपाळ)
प्रमुख ठळक मुद्दे:
– द युनिटी रन भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन, आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी एकता, शांतता आणि सौहार्दाला प्रोत्साहन
– १५ ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशच्या झाशी किल्ल्यावरून ध्वजवंदन
– २२ऑगस्ट रोजी लाल किल्ला, दिल्ली येथे समाप्ती होईल
– मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्ली या चार राज्यातून धाव
मुंबई, २०२२: भारताचे फिटनेस गुरू आणि स्टाइल आयकॉन मिलिंद सोमण भारताच्या स्वातंत्र्याची ७४ वर्षे साजरी करण्यासाठी युनिटी रनची दुसरी आवृत्ती सोलो रनसाठी सज्ज आहेत. यंदाच्या रनची थीम महिला सबलीकरण आहे. 15 ऑगस्ट 2022 रोजी राणी लक्ष्मीबाईच्या नेतृत्वाखालील १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा मुख्य आधार असलेल्या झाशीच्या किल्ल्यावरून झेंडा दाखविला आणि 22 ऑगस्ट 2022 रोजी लाल किल्ला, दिल्ली येथे समाप्त होईल. यात ग्वाल्हेर किल्ला, मराठा-मुघल युद्धाचे मोक्याचे ठिकाण आणि जगातील सातवे आश्चर्य, आग्रा येथील ताजमहाल येथे एक प्रमुख थांबा असणार आहे. कार्यक्रमासाठी टी-शर्टचे अनावरण युनियन बँक ऑफ इंडियाच्या मुंबईतील राष्ट्रीय मुख्यालयात करण्यात आले.
अल्ट्रामॅन आणि अनवाणी धावपटू मिलिंद सोमण ८ दिवसात ४५०किलोमीटरचे अंतर पूर्ण करणार आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आणि दिल्ली या चार राज्यांमध्ये तो धावणार आहे. मिलिंद या राज्यांमधील ऐतिहासिक खुणा आणि शहरांमधून धावणार आहे जसे: झाशीचा किल्ला, चित्रकूट, ग्वाल्हेरचा किल्ला, वृंदावन, आग्रा आणि बऱ्याच ठिकाणावरून धावणार आहेत.
युनिटी रनच्या दुसर्या आवृत्तीवर मिलिंद सोमण म्हणाले, “युनिटी रनची पहिली आवृत्ती यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, मी युनिटी रनच्या दुसऱ्या आवृत्तीची दुप्पट उत्साहाने वाट पाहत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. एकता, शांतता आणि सौहार्दाचा संदेश देणार्या युनिटी रनपेक्षा आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्याचा चांगला मार्ग आहे. युनिटी रन 2022 ही प्रगतीशील भारताच्या ७५ वर्षांची आणि तेथील लोकांच्या, संस्कृतीच्या आणि कर्तृत्वाच्या गौरवशाली इतिहासाला श्रद्धांजली आहे.”