मुंबई १६ ऑगस्ट २०२२ – फायबरवेब (इंडिया) लिमिटेड ही १०० टक्के निर्यात योग्य उत्पादन (EOU) आणि बिगर विणलेल्या कापड निर्मितीतील अग्रगण्य कंपनी असून कंपनीने तिचे आर्थिक वर्ष 23 च्या पहिल्या तिमाहीचा अलेखापरिक्षीत निकाल जाहीर केला आहे.
Q1 FY23 प्रमुख आर्थिक एका दृष्टीक्षेपात:
- चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीतील एकूण उत्पन्न १७.४५ कोटी रुपये होते.
- चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत ईबिटा (EBITDA) २.९० कोटी रुपये होता.
- चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत कर पश्चात नफा (PAT) १.७० कोटी रुपये होता.
- चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत प्रती समभाग कमाई (EPS) ०.५९ रुपये इतकी होती.
यावेळी बोलताना फायबरवेब (इंडिया) लिमिटेडचे संचालक श्री भावेश पी. शेठ म्हणाले की,
“गेल्या तिमाहीने अधिक मूल्यवर्धित उत्पादनांवर लक्ष केंद्रित करण्याच्या आमच्या प्रयत्नांना परिणाम देण्यास सुरुवात केली आहे. आम्ही या तिमाहीत नवीन मूल्यवर्धित उत्पादने सादर केली ज्यामुळे आम्हाला शिपिंगच्या वाढलेल्या उच्च मालवाहतूक शुल्काचा सामना करण्यास मदत झाली. जर आम्ही या उत्पादनांवर लक्ष केंद्रित केले नसते आणि केवळ मूलभूत उत्पादनांचा पुरवठा केला नसता तर या तिमाहीत समस्या निर्माण झाली असती.
आमचा अनुभव आणि बाजारपेठेची समज यामुळे आम्हाला ही मूल्यवर्धित उत्पादने वेळेत विकसित करण्यात मदत झाली आहे. ही उत्पादने आमच्या सर्व प्रमुख ग्राहकांनी स्वीकारली आहेत आणि या उत्पादनांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा आमचा मानस आहे.
एकदा मालवाहतूक सामान्य झाल्यावर आम्ही पाहू की, ही मूल्यवर्धित उत्पादने आमच्या नफ्यातील मार्जिन सुधारतील .”