बातमीदार (संतोष सकपाळ)
मुंबई : स्वातंत्र दिनाच्या ७५व्या वर्षी, आज 15 ऑगस्ट 2022 रोजी, कल्पतरू ग्रुप ने उत्सव ७५ @ ठाणे मोहिमेत भाग घेतला. यावेळी कल्पतरू पार्कसिटी येथे बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले होते. कल्पतरू च्या १०० एकर हुन अधिक भागात असलेयल्या एकात्मिक मिश्र टाउनशिप मधून 100 हून अधिक बाइकर्स असलेल्या रॅली ला झेंडा दाखवून सुरुवात झाली.
या बाईक रॅली निमित्ताने रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देण्यात आले. रवींद्र वाणी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कापूरबावडी वाहतूक विभाग, ठाणे हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
उत्साही दुचाकीस्वारांनी कल्पतरू पार्कसिटी ते ठाण्यातील दादा कोंडके अॅम्फी थिएटरपर्यंतचा त्यांच्या प्रवासादरम्यान शहरातील ऐतिहासिक स्थळांना भेटी देत जुन्या आठवणी जागवल्या.