मुंबई, १० ऑगस्ट २०२२: बहुप्रतिक्षित व आशियातील प्रतिष्ठित टाटा मुंबई मॅरेथॉन (टीएमएम) पुन्हा नव्या जोमाने आणि नवीन आशा घेऊन परतली आहे. शहराशी अनोख्या आणि स्पर्धेच्या खास भावनेतून आणि जोडला गेलेला आशावादी अनुभव म्हणजे टीएमएम. जागतिक अॅथलेटिक्स एलिट लेबल रोड रेस नवीन वर्षाच्या तिसऱ्या रविवारी आयोजित करण्याची परंपरा आहे, १५ जानेवारी, २०२३ रोजी होणार्या या आयोजनाद्वारे ही परंपरा कायम राहील.
सतरा वर्षांपासून आयोजित होणार्या या टाटा मुंबई मॅरेथॉनने मुंबई आणि भारताच्या क्रीडा भावनेचे दर्शन घडवले आहे, याचसोबत आपण जीवनात अनेक भूमीका निभावत जगत असताना आपल्या प्रत्येकाला चांगले बनवणारी गोष्ट कोणती आहे हे देखील दर्शविले आहे. यावर्षी, आम्ही #हर दिल मुंबई हा उत्साह साजरा करत आहोत.
प्रोकॅम इंटरनॅशनल, पायनियर ऑफ डिस्टन्स रनिंग ऑफ इंडिया ने आज टाटा मुंबई मॅरेथॉनच्या १८ व्या आवृत्तीसाठी नोंदणीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. पूर्ण मॅरेथॉनसाठी नोंदणी ११ ऑगस्ट २०२२ रोजी ठिक सकाळी ७:०० वाजता http://tatamumbaimarathon.procam.in/ वर करता येईल याचबरोबर सर्व व्हर्च्युअल रन कॅटेगिरीसाठीही नोंदणी सुरू होईल.
टाटा मुंबई मॅरेथॉन ही शहराच्या लवचिकतेची, सहनशीलतेची आणि प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याच्या क्षमतेचे प्रतीक आहे असे एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र सरकार) म्हणाले. पोस्ट-पँडेमिक नंतर टीएमएमचे पुनरागमन होत आहे आणि ही केवळ धावपटूंसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी ही रोमांचक बातमी आहे. या कार्यक्रमाचे आयोजन करणे आणि जगाचे पुन्हा आमच्या दारात स्वागत करणे हा आमचा अभिमान आहे असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, बहुप्रतिक्षित टाटा मुंबई मॅरेथॉन दोन वर्षांनंतर परतत आहे. आज ही स्पर्धा जगातील टॉप १० मॅरेथॉनपैकी एक आहे आणि ही एक मोठी उपलब्धी आहे. सर्व वयोगट, जाती, पंथ यांना एकत्र घेऊन चालणारी ही मुंबई आणि भारताची शान आहे. टाटा मुंबई मॅरेथॉनचा संरक्षक या नात्याने, मी घोषणा करतो की या स्पर्धेच्या १८ व्या आवृत्तीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. या मॅरेथॉनला आमचा पाठिंबा आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, “एक मुंबईकर म्हणून मी सांगू इच्छितो की गणेश चतुर्थीनंतर टाटा मुंबई मॅरेथॉन हा सर्वात मोठा उत्सव आहे ज्याची आपण सर्वजण वाट पाहत आहोत.मी आवाहन करतो की या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी नावनोंदणी करावी.
रेस प्रमोटर्स प्रोकॅम इंटरनॅशनल हे महाराष्ट्र सरकार, बृहन्मुंबई महानगरपालिका , मुंबई पोलीस व इतर भागधारकांसह भारतातील सर्वात मोठ्या पुनरआगमनासाठी आणि या रनिंग सेलिब्रेशनसाठी सज्ज आहेत.
इक्बाल सिंग चहल, मुंबई महापालिका आयुक्त म्हणाले, जानेवारी मध्ये होणारे टाटा मुंबई मॅरेथॉनचे पुनरागमन आणि यावेळी मुंबईतील आनंदी आणि उत्साही वातावरण पाहणे निश्चीतच अनोखे असेल. या कार्यक्रमाची तयारी काही महिने अगोदरच सुरू होते, हा संपूर्ण विभाग शहरासाठी सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करण्यास उत्सुक असतो. हे जागतिक आयोजन या शहराचे एक अद्भुत प्रदर्शन असुन हे क्रीडा उत्कृष्टतेचे आणि वैभवाचे प्रतीक आहे.
टाटा मुंबई मॅरेथॉन २०२३ एडिशनच्या प्रत्यक्ष शर्यतींची सुरूवात प्रतिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून झेंडा दाखवून करण्यात येणार आहे. क्लासिक डिस्टन्स मॅरेथॉन, प्रचंड लोकप्रिय हाफ मॅरेथॉन, ओपन १० किमी, फस्ट माईल्डस्टोन म्हणून ओळखली जाणारी रोड रनिंग, सीनियर सिटीजन्स रन, ज्यामध्ये सिल्व्हर रूल द रोड, चॅम्पियन्स विथ डिसॅबिलिटी आणि कलरफुल ड्रीम रन या श्रेणी आहेत.
टाटा मुंबई मॅरेथॉनला सर्वसमावेशक शर्यत असल्याचा अभिमान आहे. यावर्षी अपंग व्यक्तींसाठी (पीडब्ल्यूडी) हाफ मॅरेथॉनमध्ये मर्यादित स्पॉट्स राखीव ठेवण्यात आले आहे
बॉलीवूड युवा आयकॉन टायगर श्रॉफ, जो की या इव्हेंटचा चेहरा आहे तो म्हणातो, टाटा मुंबई मॅरेथॉन ही केवळ एक शर्यत नाही, ही एक भावना आहे ज्याने लाखो धावपटूंचे जीवन समृद्ध केले आहे. याचे माझ्या हृदयात विशेष स्थान आहे कारण मी त्याची जादू प्रत्यक्ष पाहिली आहे. धावपटूंचा दृढनिश्चय विश्वासाच्या अटळ भावनेचे प्रतिबिंब आहे, यासाठी फियर टर्न टू फ्रिडम आणि #हर दिल मुंबई असे म्हणता येईल मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्ही यात सामील व्हा व नोंदणी करा.
रजिस्ट्रेशन डिटेल्स –
फुल मॅरेथॉन: उत्सुकांसाठी नोंदणी गुरुवार, ११ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी ७:०० वाजता सुरू होईल आणि बुधवार, ३० नोव्हेंबर, २०२२ पर्यंत किंवा जागा पुर्ण होईपर्यंत ही नोंदणी सुरू राहिल.
हाफ मॅरेथॉन: नोंदणी शनिवार, २० ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी ७:०० वाजता सुरू होईल आणि शुक्रवार, ३० सप्टेंबर,२०२२ रोजी बंद होईल. सर्टिफिकेट सबमीशनच्या व सर्वात वेगवान धावपटूच्या निकषावर स्लॉट निश्चित केले जातील.
फुल आणि हाफ मॅरेथॉनमध्ये अधिकाधिक महिलांना सहभागी होण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, दोन्ही श्रेणींमध्ये त्यांच्यासाठी मर्यादित जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेते. याची माहिती वेबसाइटवर उपलब्ध आहे.
ओपन १० के केवळ मर्यादित संख्येत महिला धावपटूंसाठी राखीव आहे. नोंदणी शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी ७:०० सुरू होईल आणि शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी किंवा सर्व उपलब्ध रेसिंग स्पॉट्स समाप्त झाल्यानंतर बंद होईल.
नोंदणीसाठी http://tatamumbaimarathon.procam.in/ ला भेट द्या
ड्रीम रन, सीनियर सिटिझन्स रन आणि चॅम्पियन्स विथ डिसेबिलिटी रजिस्ट्रेशन शुक्रवार, २६ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ७:०० वाजता उघडेल आणि उपलब्ध स्पॉट्स भरल्यांनंतर किंवा शनिवार, २९ ऑक्टोबर २०२२ रोजी हे बंद होईल.
टाटा मुंबई मॅरेथॉन व्हर्च्युअल रन:
जगभरातून कुठूनही टीएमएमसाठी उत्सुक असलेले सहभागी या शर्यतीची जादू अनुभवू शकतील आणि विशेष टाटा मुंबई मॅरेथॉन अॅपद्वारे इव्हेंटसोबत धावू शकतील. मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, १० किमी आणि ड्रीम रन (५ किमी) या व्हर्च्युअल शर्यतीच्या श्रेणी आहेत. यासाठी ११ ऑगस्ट २०२२ ते २ जानेवारी २०२३ दरम्यान नोंदणी करता येईल.
टीएमएम २०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी अनिवार्य आरोग्य निर्देश –
केवळ डब्ल्युएचओद्वारा मंजूर कोविड-१९ लसीकरणाचे (दोन्ही डोस) म्हणजेच पूर्णपणे लसीकरण केलेल्या व्यक्तीच यासाठी अर्ज करू शकतात. शर्यतीसाठी अर्ज करताना त्यांचे प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. केंद्र/राज्य सरकार ने निर्धारित केल्यानुसार ही गोष्ट अनिवार्य आहे.