मिंत्राने बहुप्रतिष्ठित सणासुदीच्या काळापूर्वी वारसा साडी ब्रॅण्ड ‘नल्ली’च्या लॉन्चसह आपला साडी पोर्टफोलिओ केला प्रबळ
मिंत्रावर उपलब्ध असणा-या साड्यांच्या काही सर्वात लोकप्रिय श्रेणींमध्ये साऊथ सिल्क, बनारसी, तुसार, ऑर्गेन्झा, लिनन्स, चंदेरी सिल्क आणि निर्मळ हातमाग सूती जसे सुंगुडी, वेंकटगिरी, चेट्टीनाड आणि कांची कॉटन यांचा समावेश
मिंत्रा बिग फॅशन फेस्टिवल इव्हेण्टसह सणासुदीचा काळ साजरा करण्यासाठी देखील सज्ज आहे साडी बेहेमोथ मिंत्राच्या सोशल कॉमर्स उपक्रमांसह एम-लाइव्ह व एम-स्टुडिओवर झळकण्यास सज्ज
बेंगळुरू, ऑगस्ट ६, २०२२: मिंत्रा या भारतातील फॅशन, सौंदर्य व जीवनशैलीसाठी आघाडीच्या व्यासपीठाने सणासुदीच्या काळापूर्वी आपला साडी पोर्टफोलिओ वाढवत प्रतिष्ठित साडी ब्रॅण्ड ‘नल्ली’च्या लॉन्चची घोषणा केली. तसेच मिंत्रा बिग फॅशन फेस्टिवल देखील आयोजित करणार आहे. हा सहयोग पहिल्यांदा त्यांच्या स्वत:च्या वेबसाइटव्यतिरिक्त ई-कॉमर्स बाजारस्थळामध्ये नल्लीच्या प्रवेशाला सादर करतो आणि देशभरातील लाखो साडीप्रेमींना १०००हून अधिक स्टाइल्स देईल. तसेच आगामी महिन्यांमध्ये इतर अनेक डिझाइन्स लॉन्च करण्यात येणार आहे.
१९२८ मध्ये स्थापना करण्यात आलेला नल्ली हा साडी ब्रॅण्ड म्हणून घराघरात प्रसिद्ध आहे आणि देशातील कापड व किरकोळ व्यवसायात आघाडीवर आहे. सेलिब्रिटी, आदरणीय पदाधिकारी आणि ब्रिटीश रॉयल्टी यांच्या समर्थनासह ब्रॅण्डचे जगभरात ४० हून अधिक स्टोअर्स आहेत, ज्यांना ग्राहकांचे व्यापक प्रेम व प्रशंसा मिळत आहे. कापडाच्या जगात एक अग्रगण्य नल्ली त्याच्या अपारंपरिक ‘एव्हरी डे व्हॅल्यू प्राइस’ धोरणासाठी ओळखली जातो, जो आकर्षक किंमतीत उत्पादनांच्या अतुलनीय गुणवत्तेवर अवलंबून आहे, जे सर्वोत्तम कार्यसंचालन व सानुकूल किंमत संरचनेमधून संपादित करण्यात आले आहे.
सर्वोत्तम रेशीम व निर्मळ सूती सादर करत नल्ली मिंत्रावर स्टाइल्स व विभागांची हाताने निवडलेली श्रेणी सादर करण्यास सज्ज आहे, ज्यामध्ये दर्जात्म्क सिल्क, तुसार, ऑर्गेन्झा व चंदेरीचा समावेश आहे. इव्हेण्ट्स व कौटुंबिक साजरीकरणांसाठी खरेदी करणा-या महिलांमधील लोकप्रिय आणि नववधूंचे पसंतीचे वेडिंग ट्राऊझू असलेल्या नल्लीच्या साड्या भारतीय शहरी महिलांमध्ये लोकप्रिय आहेत. सतत डिझाइन्स व ऑफरिंग्जमध्ये नाविन्यता आणणा-या ब्रॅण्डचा विशेषरित्या क्यूरेट केलेला रंग कल्ट-क्लासिक एमएस ब्ल्यू आहे, जो दिग्गज कर्नाटिक गायिका एमएस शुभलक्ष्मी यांनी डिझाइन केला आहे. ब्रॅण्डच्या लोकप्रिय निर्मळ हातमाग सुती साड्यांच्या कॅटलॉगमध्ये सुंगुडी, वेंकटगिरी, चेट्टीनाड आणि कांची कॉटनचा समावेश आहे, तसेच लोकप्रिय प्युअर जरी, हाफ फाईन जरी, जर्मन सिल्व्हर आणि पट्टू बॉर्डर्ससह रेशीम साड्यांचे सर्वात विस्तृत कलेक्शन देखील आहे. सुरुवातीला नल्ली येथील साड्यांची श्रेणी मिंत्रावर ११०० रूपये ते ११००० रूपयांच्या किंमतीत उपलब्ध असेल.
ई-कॉमर्स मार्केटप्लेससोबतच्या पहिल्याच सहयोगांतर्गत नल्ली देशभरातील मिंत्राच्या नेटवर्कचा फायदा घेईल आणि त्याचा ऑनलाइन प्रवास जलद करत पोहोच वाढवेल. हा ब्रॅण्ड एम-लाइव्ह व एम-स्टुडिओसह मिंत्राच्या उद्योग-परिभाषित सोशल कॉमर्स उपक्रमांद्वारे खरेदीदारांशी देखील संलग्न होईल, ज्यामुळे बहु-प्रसिद्ध वारसा ब्रॅण्डची दृश्यमानता अपवादात्मकरित्या वाढेल.
मिंत्रा सध्या प्रिमिअम साडी विभागातील १२५ हून अधिक ब्रॅण्ड्समधील १ लाखाहून अधिक स्टाइल्सचे विस्तृत कलेक्शन देते. मीना बाजार, सोच, द चेन्नई सिल्क, मोहे, फॅबइंडिया आणि पोथी हे या श्रेणीतील काही उल्लेखनीय ब्रॅण्ड आहेत. भारतातील एकूण साडी बाजारपेठ अंदाजे ५०,००० कोटी रूपये असण्यासह मिंत्राला प्रिमिअम साडी क्षेत्रामध्ये वार्षिक ५० टक्क्यांहून अधिक वाढ होण्याची अपेक्षा आहे. मिंत्राच्या माध्यमातून ई-कॉमर्समध्ये नल्लीचा प्रवेश प्रतिष्ठित ब्रॅण्डचा विकास व उपलब्धतेला चालना देण्यास सज्ज आहे, जेथे ब्रॅण्ड पारंपारिक व समकालीन साडी व एथनिक वेअर बाजारपेठांमध्ये सखोल प्रवेश करत आहे.